पुणे जिल्हा : चांडोली येथे ट्रकच्या धडकेने एकाचा मृत्यू

– मंचर पोलिसांनी घेतले ट्रकचालकाला ताब्यात मंचर – चांडोली बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील गाव कारभारी प्रभाकर काशिनाथ थोरात यांचे कळंब (ता.आंबेगाव) येथे रविवार, दि. ९ रोजी दुपारी पायी चालत असताना अपघाती निधन झाले. अपघात करणाऱ्या ट्रकचालकाला मंचर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चांडोली बुद्रुक वेताळ मळ्यातील प्रभाकर काशिनाथ थोरात हे कळंब येथील हॉटेल इंद्रसमोर चांडोली बुद्रुक … Read more

करोनामुळे बाप-लेकाचा मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

मंचर – करोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात हाहाकार माजवला होता. सध्या परिस्थिती आटोक्यात असली तरीही धोका अजून टळलेला नाही. या महासाथीने अनेकांचे नातलग हिरावले. एकाच कुटुंबातील दोघा-तिघांचा करोनामुळे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आंबेगाव तालुक्यातील चोंडोली बुद्रुक येथेही अशीच एक हृदयद्रावक घटना घडली. करोनामुळे बाप-लेकाचा काही तासाच्या फरकाने मृत्यू झाला आहे. घरातील दोन्हीही कर्ते पुरूष गेल्याने … Read more

आमदार दिलीप मोहिते यांच्या प्रयत्नातून चांडोली, आळंदी ग्रामीण रुग्णालयात ‘रेमडेसिवीर’ उपलब्ध

-रामचंद्र सोनवणे राजगुरूनगर – खेड तालुक्यातील करोना रुग्णांना वेळेत उपचार व्हावेत आणि अत्यवस्थ रुग्णांना रेमडीसिवीर औषध उपलब्ध व्हावेत यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशी संपर्क करून चांडोली ग्रामीण रुग्णालय, आळंदी ग्रामीण रुग्णालयात तत्काळ  रेमडीसिवीर औषधसाठा उपलब्ध करण्यात आला असल्याची माहिती आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिली. खेड तालुक्यात करोनाचा संसर्ग वाढला … Read more

मंचर : चांडोलीत मेंढपाळावर बिबट्याचा हल्ला

मंचर (प्रतिनिधी) – चांडोली बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील मेंढपाळ बबन भागा सुळ या 65 वर्षीय मेंढपाळांवर ( shepherd ) बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची केल्याची घटना बुधवार (दि. 9) सायंकाळी 6 वाजता घडली. (Leopard attack on a shepherd in Chandoli) गेल्या पंधरा दिवसात चार नागरिकांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्हा … Read more

चांदोलीत अतिवृष्टी; चोवीस तासात धरणक्षेत्रात ८८ मिलीमीटर पावसाची नोंद

शिराळा (प्रतिनिधी) :पावसाचे आगर म्हणुन संबोधल्या जाणार्‍या चांदोली परीसरात गेल्या चार पाच दिवसापासुन अतिवृष्टी होत आहे.गेल्या चोवीस तासात चांदोली धरणक्षेत्रात ८८ मिलीमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद येथील पर्जन्य मापन केंद्रावर झाली आहे मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. चांदोली धरणाच्या सांडव्यातुन व वीजगृहातुन वारणानदी पात्रात सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग स्थीर ठेवण्यात आला असुन सध्या … Read more

चांडोलीतील ग्रामीण रुग्णालयातील भोंगळ कारभार दिलीप मोहिते पाटलांनी आणला चव्हाट्यावर

राजगुरूनगर-तालुक्यातील नागरिकांसाठी जीवनदायी असलेल्या येथील चांडोली (राजगुरुनगर) रुग्णालयात भोंगळ कारभार सुरु आहे. देशात करोना विषाणूचा हाहाकार असून सर्वच डॉक्टर रुग्णांना सेवा देण्यात सज्ज आहेत. देवदूत म्हणून काम करत आहेत. मात्र याला चांडोली (राजगुरूनगर) ग्रामीण रुग्णालय अपवाद ठरत आहे. वैद्यकीय अधिक्षकांच्या खुर्चीवर चक्क लेखनिक झोपलेला सापडल्याने रुग्णालयाच्या सेवेबाबत उदासीन कारभार चव्हाट्यावर आला आहे आठ पैकी केवळ … Read more

चांडोली, भराडी परिसरात बिबट्याची दहशत

मंचर – आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील चांडोली बुद्रुक आणि भराडी येथे बिबट्याच्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. बिबट्याने चांडोली बुद्रुक येथील शेळीला ठार तर भराडी येथील कालवडीवर हल्ला करून जखमी केल्याची घटना रविवारी (दि. 17) घडली. वनखात्याने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. चांडोली बुद्रुक-काळेमळा येथील शेतकरी अंकुश बाबुराव काळे यांच्या … Read more

चांदोली राष्ट्रीय अभयारण्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

शिराळा – सांगली, सातारा, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर व शिराळा तालुक्‍याच्या पश्‍चिमेला असणारे चांदोली राष्ट्रीय अभयारण्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने चांदोली अभयारण्यात दाखल होत आहेत. चांदोली अभयारण्य पाहण्यासाठी एक दिवसाची परवानगी मिळते, मात्र राहण्यासाठी नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अभयारण्यातील स्थळे पर्यटकांना पाहता येतात. अभयारण्यात मोटरसायकलला परवानगी नाही. … Read more