इस्रोच्या ‘एक्सपोसॅट मिशन’ने नवीन वर्षाची सुरुवात ; श्रीहरिकोटातून प्रक्षेपण, भारत बनणार ब्लॅक होल-न्यूट्रॉन स्टारचा अभ्यास करणारा दुसरा देश

ISRO XPoSat Mission : सरत्या वर्षाला निरोप देऊन आज जगभरात नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले. दरम्यान, भारतातही या नवीन वर्षाचे स्वागत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने दमदारपणे केली आहे.  इस्रो (ISRO) ने आज वर्षातील पहिली अंतराळ मोहीम सुरू केली आहे. इस्रोने 1 जानेवारी रोजी म्हणजेच आज सकाळी 9.10 वाजता ‘क्ष-किरण पोलारिमीटर उपग्रह’ (एक्सपोसॅट) मिशनचे … Read more

“50 वर्षे लागू शकतात ती कामे मोदींनी 3 महिन्यात पूर्ण केली” – अमित शहा

अहमदाबाद  – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. त्यासाठी त्यांनी संसदेची नवी इमारत, चांद्रयान-3 मोहीम, जी-20 शिखर परिषद आणि महिला आरक्षण विधेयकाचा आधार घेतला. त्यातील एक-एक काम करण्यास 50 वर्षांचा अवधी लागला असता. मात्र, मोदींनी ती चारही कामे अवघ्या 3 महिन्यांत पूर्ण केली, असे प्रशंसोद्गार शहांनी काढले. मोदींच्या कार्याचा … Read more

जगातील सर्वात महागड्या कारची किंमत चांद्रयान-3 मोहिमेच्या दुप्पट ? जाणून घ्या कोणते मॉडेल आहे?

भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केल्यानंतर जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांना संबोधित करताना मिशन यशस्वी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. या मोहिमेच्या पूर्ततेसह, इस्रोने 615 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हे कार्य पूर्ण करून अनेक नवीन विक्रम रचले. त्यामुळे चांद्रयान-3 मोहीम इतर कोणत्याही मोहिमेच्या … Read more

चांद्रयान-3 मिशन यशस्वी झालं, याचं श्रेय कोणाला द्यायचं? राजकीय नेत्यांमध्ये लागली चढाओढ

नवी दिल्ली  – चांद्रयान-3 लॅंडिंगच्या ऐतिहासिक यशानंतर आता त्याच्या राजकीय नफा-तोट्याची चर्चा सुरू झाली आहे. याचे श्रेय भाजपने शास्त्रज्ञांबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. दुसरीकडे, कॉंग्रेसचे म्हणणे आहे की, पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या धोरणांमुळे देश आज या टप्प्यावर पोहोचला आहे. चांद्रयान-3 ने हे यश अशा वेळी मिळवले जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्‍सच्या बैठकीत … Read more

शाब्बास पोरा…! चांद्रयान-३ च्या मोहिमेत हिंगोलीच्या तरुणाचेही योगदान

हिंगोली (शिवशंकर निरगुडे) :  भारताचे चांद्रयान-३ चंद्रावर सॉफ्ट लँड झाल्यानंतर भारतीय शास्ज्ञज्ञांचे जगभरात कौतुक होत आहे. चांद्रयान मोहिमेमध्ये तब्बल १६ हजार ५०० शास्त्रज्ञांनी आपले योगदान दिले आहे. या सर्व शास्त्रज्ञांच्या पथकामध्ये हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा येथील महेश काळपांडे या तरुण शास्त्रज्ञाचाही समावेश होता. चांद्रयानाचे लँडिंग यशस्वी होताच महेश काळपांडे यांच्या वडिलांनी फोन करून त्याचे अभिनंदन केले. … Read more

चंद्राच्या कक्षेत प्रवेश करताच चांद्रयान-3 चा इस्रोला मिळाला ‘हा’ पहिला संदेश; ‘या’ दिवशी उतरणार चंद्रावर

नवी दिली : इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेबाबत महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. चांद्रयान-3 ने या मोहिमेचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. चांद्रयान-3 ने यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला असल्याची माहिती इसरॉकडून देण्यात आली आहे. याबाबत इस्रोने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. इस्रोने ट्विटमध्ये, ‘चांद्रयान-3 चे पुढील ऑपरेशन 6 ऑगस्ट 2023 रोजी सुमारे 23.00 वाजता पार … Read more

चांद्रयान मोहिम यशस्वी व्हायला हवी; इस्रोचे माजी अध्यक्ष माधवन नायर यांना आशा

बेंगळुरू – चंद्रावरची चांद्रयान-3 मोहीम प्रत्येक प्रकारे यशस्वी झाली पाहिजे जेणेकरून भारत अंतराळ संशोधनात एक मोठा टप्पा पार करू शकेल. चंद्राच्या पृष्ठभागावर नियोजित सॉफ्ट लॅंडिंग हे अतिशय कठीण आणि गुंतागुंतीची समस्या आहे. पण त्यावर मात केली जाईल, असे वाटते. ही मोहीम इस्रोसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी चांद्रयान-2 लॅंडरच्या सॉफ्ट-लॅंडिंग दरम्यान आलेल्या समस्येचे … Read more

Chandrayaan-3 : जुलैमध्ये होणार ‘चांद्रयान-3’चे प्रक्षेपण, मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात

नवी दिल्ली – महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेअंतर्गत, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात चांद्रयान-3 प्रक्षेपित करू शकते. अंतराळयानाशी संबंधित सर्व आवश्‍यक चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्या आहेत. यूआर राव सॅटेलाइट सेंटरमध्ये वाहनाला पेलोड जोडण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. इस्रोने सीई-20 क्रायोजेनिक इंजिनसाठी आवश्‍यक गरम चाचणी देखील पूर्ण केली आहे. इस्रोच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने … Read more