पिंपरी | चिखली भजन सेवा कार्यक्रम उत्साहात

चिखली, (वार्ताहर) – स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे संस्कृती संवर्धन व विकास महासंघ विभागाचे संस्कृती संवर्धन भजन महासंघ (चिखली विभाग) ‘चैत्रगौरीचे हळदी कुंकू’ श्री शनी मंदिर, पूर्णानगर येथे झाले. मुख्यतः संभाजीनगर, शाहूनगर, पूर्णानगर व शिवतेजनगर भागातील महिलांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती. महिला भजन महासंघाच्या सर्व विभागातील महिला उपस्थित होत्या. चैत्र गौरी संस्कृती संवर्धन भजन महासंघातर्फे भजन सेवेचा … Read more

पिंपरी | चिखली येथे मोटर गॅरेजला आग

पिंपरी, (वार्ताहर) – चिखली पाटीलनगर भागातील व्यंकटेश मोटर गॅरेजला मंगळवारी मध्यरात्री (दि. 7) 12 वाजून 28 मिनिटाला आग लागल्याची माहिती तळवडे अग्निशामक विभागाला मिळाली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी जात आग आटोक्यात आणली. व्यंकटेश मोटर गॅरेजचे मालक लिंगप्पा रामराव यंपाळे यांनी चिखली येथील सोमनाथ मोरे यांच्या जागेत गॅरेज सुरू केले होते. या गॅरेजमध्येच यंपाळे रात्री झोपले होते. … Read more

पिंपरी | चोविसावाडीत कचरा संकलन केंद्र उभारू नका

चिखली, (वार्ताहर) – चोविसावाडी चर्‍होली येथे पिंपरी चिंचवड महापालिकेकडून आरक्षित जागेवर कचरा संकलन केंद्राचे काम सुरू करण्याचे प्रयोजित आहे. या कचरा संकलन केंद्राच्या शेजारीच तनिष ऑर्चिड फेज -1, तनिष ऑर्चिड फेज -2, डेस्टिनेशन ओशियान, ग्लोबल हाईट या आणि इतर सहकारी गृह रचना संस्था आहेत. हा सर्व रहिवासी परिसर असून या भागामध्ये 30 पेक्षा जास्त सहकारी … Read more

पिंपरी | निरोगी आयुष्यासाठी ज्येष्ठांनी नियमित व्यायाम करावा – वसंत ठोंबर

चिखली, (वार्ताहर) – जेव्हा जेव्हा आपण निरोगी जीवनशैलीचा विचार करतो तेव्हा नियंत्रित आणि अत्यंत पौष्टिक आहार, हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे. तणावमुक्त जीवन, जमेल तसा व्यायाम, मित्र मैत्रिणींबरोबर संवाद करणे, फिरणे, योगा बरोबर हास्य योग व सकारात्मक दृष्टिकोन ही ज्येष्ठ नागरिकांच्या आनंदी व निरोगी जीवन जगण्याची महत्त्वाची सूत्रे आहेत, असे मत वसंत ठोंबर यांनी व्यक्त केले. … Read more

पिंपरी | चिखली, मोशीत दूषित पाणीपुरवठा

चिखली, (वार्ताहर) – मागील महिन्यापासून चिखली व मोशी परिसरातील बहुतांश भागामध्ये महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने दूषित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते महापालिकेच्या संबंधित विभागाला वारंवार तक्रार करत आहेत. परंतु महापालिका प्रशासन यावर कायमस्वरुपी उपाययोजना करताना दिसून येत आहे. दूषित पाणीपुरवठ्याने नगारिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. मोशी परिसरातील गावठाण, विविध सोसायट्या, वाड्या-वस्त्यांना महापालिकेकडून … Read more

पिंपरी | आकुर्डी-चिखली मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात

चिखली, (वार्ताहर) – शहरातील सुस्थितीतील रस्ते तोडून प्रशस्त पदपथ, सायकल मार्ग तयार केले जात आहेत. कोट्यवधींचा खर्च करून तयार केलेले पदपथ विक्रेते, दुकानदारांच्या साहित्यांनी व्यापलेले आहेत. आकुर्डी-चिखली मार्गावरील पदपथांना अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. पादचार्‍यांना सेवा रस्त्यावरूनच चालावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोट्यवधींचा खर्च करूनही पादचारी रस्त्यावरच असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे अतिक्रमणांवर कारवाई … Read more