पुणे जिल्हा | बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू

पिंपळवंडी/आळेफाटा, (वार्ताहर) – काळवाडी (ता.जुन्नर) येथे बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि. 8) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली असून परिसरात शोककळा पसरली आहे. काळवाडी येथे यात्रेनिमित्त मामाच्या गावी आलेला रुद्र महेंद्र फापाळे (वय 8, रा. मूळगाव बदगीबेलापूर, ता.अकोले) सकाळी साडेआठच्या सुमारास आजोबा रोहिदास काकडे यांच्यासोबत शेतात गेला होता. जनावरांसाठी कडबा कुट्टी … Read more

हिंगोली जिल्ह्यात शेतात काम करताना वीज पडून मुलाचा मृत्यू

हिंगोली – (शिवशंकर निरगुडे)  : शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून तरुण मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वेलतुरा येथे घडली आहे. महेश मदन सानप असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे हिंगोली जिल्ह्यात गेल्या 20 दिवसापासून पावसाने चांगलीच उघडीप दिली होती मात्र मंगळवारी मुसळधार पाऊस पडला.  महेश … Read more

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये कराडला चिमुकल्याचा मृत्यू

कराड  – मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला. येथील वाखाण भागात जगताप वस्तीवर सोमवारी दि. 27 रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मोकाट कुत्र्यांनी घरासमोरील अंगणात असणाऱ्या चिमुकल्यावर झडप घालून त्याला फरपटत ऊसात नेले. परिसरातील नागरिकांनी केलेल्या तासाभराच्या शोध मोहिमेनंतर मुलाचा मृतदेह शेतात आढळून आला. राजवीर राहुल ओव्हाळ (रा. … Read more

मुंबईत इमारत कोसळून चिमुकल्याचा मृत्यू

मुंबई – मुंबईतील कुर्ला येथे इमारतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त इमारत मुंबईच्या कुर्ला परिसरातील विनोबा भावे पोलीस ठाण्याजवळील आहे. या इमारतीच्या पहिल्या माजल्यावरचा काही भाग आज दुपारी तळमजल्यावर असलेल्या हॉटेलवर कोसळला. या … Read more

पुणे : भिंत अंगावर पडून मुलाचा मृत्यू

येरवडा – घरातील आतील बाजूस असलेल्या कमी उंचीच्या भिंतीला लटकून झोका खेळणाऱ्या मुलाच्या अंगावर ती भिंत पडून त्याचा मृत्यू झाला. मोहंमद आरिफ खान (10) असे मुलाचे नाव असून, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे. कळस येथील खान कुटुंबातील “छकुला’ मोहंमद हा इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत होता. वडील रिक्षाचालक तर … Read more