पुणे जिल्हा | कोरेगाव भीमात पुन्हा अल्पवयीन युवतीचा विवाह व अत्याचार

शिक्रापूर, (वार्ताहर) – कोरेगाव भीमा (ता.शिरुर) येथे पंधरा दिवसांपूर्वी एका अल्पवयीन युवतीचा बालविवाह करुन युवतीवर अत्याचार केल्याची घटना घडलेली असताना पुन्हा नववीमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन युवतीचा विवाह करून युवतीवर अत्याचार केल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे युवतीच्या आई, वडिलांसह पती व सासूवर बालविवाहासह बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोरेगाव भीमा (ता.शिरूर) … Read more

अहमदनगर – बालविवाहाचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना राबवू

अकोले – अकोले तालुक्यातील बालविवाहाचे प्रमाण कमी करण्यासाठी लवकरच बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या तालुक्यातील ग्रामसेवकांची व लग्नातील घटकांची बैठक घेऊन हे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना राबवू, अशी ग्वाही आ.डॉ.किरण लहामटे यांनी दिली. स्नेहालय युवा निर्माण, उडान प्रकल्प व रोटरी क्लब अकोले सेंट्रलच्या वतीने अकोले येथे बालविवाह जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी … Read more

“लॉकडाऊन काळात बालविवाहाचे प्रमाण वाढले..’; रुपाली चाकणकर यांचा दावा

लातूर – कोविड-19 साथीच्या काळात लॉकडाऊन लागू केल्यानंतर राज्यात बालविवाहांचे प्रमाण वाढले आहे असा निष्कर्ष राज्य महिला आयोगाकडून काढण्यात आला आहे. महिला आयोगाच्या प्रमुख रुपाली चाकणकर यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्या म्हणाल्या की, एकट्या लातूरमध्ये 37 बालविवाह थांबवण्यात आले असून यातील दोन घटनांसंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मात्र वाढलेल्या बालविवाह … Read more

अरे बापरे! …अन्‌ मध्यरात्री उरकला बालविवाह; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात लग्न झटपट आटोपण्याचे प्रकार

मुलीचे वय अवघे 14, तर मुलाचे 24 वर्षे बीड – बीड जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढले आहेत. तर प्रशासनाकडून देखील जनजागृती करून बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र असे असताना नागरिक वेगवेगळ्या शक्कल लढवून बालविवाह उरकत आहेत. आता असाच काही प्रकार बीड तालुक्‍यातील खंडाळा येथे समोर आला आहे. लोकांना बालविवाह होत असल्याची माहिती … Read more

धक्कादायक! दहावीचा पेपर सुरु असतानाच अल्पवयीन मुलीचा लावला विवाह; 50 व्यक्तींवर गुन्हा दाखल

बीड :  राज्यातील बीड जिल्ह्यातुन एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात अल्पवयीन मुलीला परीक्षेला जाऊ न देता तिचा बालविवाह  लावण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी 50 व्यक्तींवर पोलिसांनी कारवाई केली आहे. ग्रामसेवकाच्या तक्रारीवरुन 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन दिवसांपूर्वी गंगाखेड तालुक्यात एकाच दिवशी चार बालविवाह … Read more

बालविवाह रोखण्यासाठी आसाम सरकार आणणार POCSO कायदा

गुवाहाटी – महिलांनी योग्य वेळी माता बनले पाहिजे, अन्यथा त्यांना शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आमचे सरकार मुलींचे लवकर लग्न होण्यासाठी कटिबद्ध आहे. तसेच राज्यात बालविवाह रोखण्यासाठी आसाम सरकार पोक्‍सो कायदा आणण्याच्या तयारीत आहे, असे प्रतिपादन आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शनिवारी केले आहे. एका सरकारी कार्यक्रमात बोलताना सरमा म्हणाले की, 14 वर्षांपेक्षा … Read more

गावात बालविवाह झाल्यास सरपंचावर गुन्हा; महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या…

नाशिक – शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात बालविवाहाचे प्रमाण अधिक असल्याने या घटनांना पायबंद घालण्यासाठी राज्य महिला आयोगाने कठोर पाऊल उचलले आहे. त्यानुसार आता ज्या गावाच्या हद्दीत बालविवाह झाल्यास सरपंच व सदस्यांविरुद्ध बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाणार आहे. तसा प्रस्तावच आयोगाने राज्य सरकारला सादर करणार असल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी … Read more

पुणे : प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्यावर बालविवाह उघड

पुणे- अल्पवयीन असल्याचे माहिती असतानादेखील मुलीचे लग्न लावून दिल्याप्रकरणात मुलीच्या आई-वडील आणि सासरच्यांवर लोणी-काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मुलीची नुकतीच प्रसुती झाल्यानंतर समोर आला. ससूनच्या डॉक्‍टरांनी याबाबत फिर्यादी दिली आहे. डॉ. अपेक्षा यशवंत करमणकर (28) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादी या ससून रुग्णालयात स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून कर्तव्य करत … Read more

बालविवाह रोखण्यासाठी यंत्रणेने सतर्क राहावे – जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

पुणे – करोना निर्बंध हटविल्यानंतर राज्यात विवाह सोहळे मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, या विवाह सोहळ्यांमध्ये बालविवाह होतात, ते रोखण्यासाठी यंत्रणा सतर्क करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत. अक्षयतृतीयेच्या पार्श्वभूमीवर बालविवाहाची प्रकरणे रोखावे, समुपदेशन करावे, वेळप्रसंगी कठोर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश डॉ. देशमुख यांनी दिले आहेत. बालविवाह आयोजित करणे हा … Read more

पुण्यात बालविवाह करत मुलीला मारहाण : मनपाचा कंत्राटदार जेरबंद

पुणे- बालविवाह करुन मारहाण केल्याप्रकरणी महापालिकेच्या सफाई कंत्राटदारावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या 36 वर्षीय आईने तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी महिलेच्या 15 वर्षाच्या मुलीला दोन वर्षापूर्वी दिनेश शिंदे याने पळवून नेले होते. यानंतर तिच्यासोबत बालविवाह केला. ती पतीसोबत सासरी नांदत असताना तिला मारहाण करुन ती अल्पवयीन असल्याचे माहिती … Read more