दिल्लीत मोठ्या प्रमाणात ‘चाइल्ड पोर्नोग्राफी’, पोलिसांची कारवाई, 36 आरोपींना अटक

नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजेंस फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स युनिटने राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोच्या इनपुटवर राजधानीत बाल पोर्नोग्राफी आणि पेडोफिलिया नेटवर्कच्या विरोधात ऑपरेशन मासूम सुरू केले. चाइल्ड पोर्नोग्राफीच्या विरोधात मोठ्या मोहिमेचा भाग म्हणून दिल्ली पोलिसांनी 1050 एफआयआर नोंदवले. यासोबतच 36 जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपी व्हॉट्‌सऍप आणि इतर प्लॅटफॉर्मद्वारे बाल लैंगिक शोषणाचे साहित्य … Read more

Pune Big Crime | पु्ण्यात गरिब मुलांना पैशाचे अमिष दाखवून ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’, दिड वर्षात तब्बल 4500 व्हिडीओ अपलोड

पुणे – सांस्कृतिक राजधानी असल्याचा टेंभा मिरवणाऱ्या पुणे जिल्ह्यातून लहान मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या दररोज सहा ते सात व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. गेल्या दीड वर्षात असे साडे चार हजार व्हिडिओ अपलोड झाल्याचे केंद्र सरकारच्या गृहखात्याने पुणे पोलिसांना कळवले. त्यामुळे पुणे पोलिसांचे धाबे दणानले असून या सर्व समाजकंटकांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी … Read more

मुलांच्या हातात मोबाइल देतायं… सावधान; वडिलांनी पाहिला आपल्याच अल्पवयीन मुलीचा पॉर्न व्हिडिओ

वडिलांनी पाहिला आपल्याच अल्पवयीन मुलीचा पॉर्न व्हिडिओ अन्‌… पोलीस तपासात आले धक्‍कादायक वास्तव समोर पिंपरी – वडिलांनी आपल्याच अवघ्या अकरा वर्षांच्या मुलीचा पॉर्न व्हिडिओ पाहिला अन्‌ त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. याबाबत मुलीला विचारणा करून वडिलांनी सायबर सेलकडे धाव घेतली. सायबर सेलने केलेल्या चौकशीत धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. करोनामुळे ऑनलाइन शिक्षणासाठी प्रत्येक पालकांना आपल्या मुलांच्या … Read more

लहान मुलांचे अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर विकणाऱ्या दोघांना अटक

नवी दिल्ली – लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे चित्रिकरण समजामाध्यमांद्वारे विकणाऱ्या दोघांना केंद्रीय अन्वेषण पथकाने अटक केली, अशी माहिती रविवारी देण्यात आली. लहान मुलांच्या लैंगिक शोषण थांबवण्यसाठी निर्माण केलेल्या विशेष पथकाने शिक्षणाने अभियंता असणाऱ्या निरजकुमार यादव आणि कुलजितसिंह माकन यांच्या मुसक्‍या आवळल्या. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 22 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. … Read more

चाईल्ड पोर्नोग्राफी रोखण्यासाठी “ऑपरेशन ब्लॅकफेस’

संजय कडू पुणे  – देशातून पॉर्न हबवरील रहदारीत 95 टक्के वाढ झाली आहे. “बाल लैंगिक अत्याचार सामग्री’ नावाच्या अहवालात लॉकडाऊनपूर्वीच्या तुलनेत देशातील पॉर्न हबवरील वाहतुकीत (सर्च) 95 टक्के वाढ झाली आहे. दरम्यान, राज्याच्या गृहमंत्रालयाने चाईल्ड पोर्नोग्राफीची गंभीर दखल घेतली आहे. जानेवारीच्या मध्यापासून चाईल्ड पोर्नोग्राफी विरुद्ध लढण्यास “ऑपरेशन ब्लॅकफेस’ सुरू केले. यामध्ये महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर गुन्हे … Read more

चाईल्ड पोर्नोग्राफीविरोधातील कारवाईत महाराष्ट्र अव्वल

125 गुन्ह्यांमध्ये 40 जणांना अटक  नव्या अत्याचारविरोधी कायद्यात या गुन्ह्याचाही करणार समावेश मुंबई : महिला अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी राज्यात करण्यात येणाऱ्या नवीन कायद्याअंतर्गत लहान मुलांच्या अश्‍लील व लैंगिक अत्याचाराच्या अश्‍लिल क्‍लिप सोशल मिडियावर व्हायरल करण्यासंदर्भातील गुन्ह्यांचाही (चाईल्ड पोर्नोग्राफी) समावेश करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत केली. चाईल्ड पोर्नोग्राफीविरोधील कारवाईमध्ये महाराष्ट्र देशात … Read more

‘चाईल्ड पोर्न’चे आणखी चार गुन्हे दाखल

नऊ गुन्हे दाखल : अल्पवयीन मुलांच्या अश्‍लील चित्रफीत पिंपरी – मागील काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड पोलीस अल्पवयीन मुलांच्या अश्‍लील चित्रफीत सोशल मीडिया व संकेतस्थळांवर अपलोड करणाऱ्यांचा शोध घेत आहेत. मागील महिनाभरात पाच जणांवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर गुरुवारी पुन्हा चार जणांवर याच प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरात … Read more

शिक्षकाने दाखवली लहान विद्यार्थीनीला पोर्न फिल्म

औरंगाबाद : लहान विद्यार्थीनीला स्वत:च्या मोबाईलवर पोर्न फिल्म दाखवण्याचा धक्कादायक प्रकार येथे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या मुलीच्या पालकांनी दामिनी पथकाकडे या प्रकाराची तक्रार केली आहे. आपल्यता केबीनमध्ये बोलावून या मुलीशी चावट संवाद साधत या शिक्षकाने तिला पोर्न फिल्म दाखवली. त्यावेळी त्याने आक्षेपार्ह कृत्य केल्याचे पालकांचे म्हणणे आहे. हा प्रकार सहा जानेवारीला घडला. मात्र … Read more