किशोरवयीनांच्या आरोग्य क्षेत्रात गुंतवणुकीची गरज; केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांचे प्रतिपादन

जिनिव्हा  – सध्या जिनिव्हा येथे सुरू असलेल्या ७७ व्या जागतिक आरोग्य संमेलनादरम्यान, भारताने नॉर्वे, संयुक्त राष्ट्र बाल निधी (युनिसेफ), संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी (यूएनएफपीए) तसेच माता, नवजात आणि बाल आरोग्यासाठी भागीदारी (पीएमएनसीएच) यांच्या सहकार्याने महिला, बालके आणि किशोरवयीन यांचे आरोग्य या विषयावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नवनवी माहिती आणि शोध सामायिक करणे, माता, … Read more

Pune: ओवी सापडली.., पण अर्थ जाणून घ्यावा; शहरातील ‘त्या’ घटनेतून पालकांच्या मानसिकतेचा शोध

जयंत जाधव सिंहगडरस्ता – पुणे शहरामध्ये दोन दिवस समाज माध्यमावर एकच विषय होता, हरवलेली ओवी कधी सापडणार? त्यासाठी पूर्ण यंत्रणा कामाला लागली होती. पुणे शहराचे पोलीस आयुक्त आणि त्यांचे सर्व सहकारी, सामाजिक कार्यकर्ते ओवीला शोधत होते अखेर त्या रात्री दहाच्या सुमारास ओवी रांजणगावला सापडली आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. परंतु, या घटनेतून पौगंडावस्थेतील मुला, मुलींची … Read more

पुणे जिल्हा : रोजा करणाऱ्या बालकांचा सन्मान

तळेगाव ढमढेरे : पवित्र रमजान महिन्यात तळेगाव ढमढेरे येथील बालचिमुकल्यांनी रोजाचा उपवास धरला आहे. या बालकांचा शिरूर तालुका आरपीआय पक्षाच्या वतीने सन्मान करण्यात आला. लाखनी येथील लहान मुलांमध्ये यंदा रमजान महिन्याचे विशेष आकर्षण दिसून येत आहे. फझल इरफान अत्तार, अलीअमजा तौसिफ़ शेख, अहान समीर मिर्झा या लहान मुलांनी रोजा केला आहे. सूर्यास्ताच्यावेळी त्यांनी खजूर खाऊन … Read more

Pune: पुनर्वसन केलेल्या बालकांना शिक्षणासाठी मदत

पुणे – पुनर्वसन केलेल्या बालकांना बजाज संस्थेच्या वतीने शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा हात देण्यात आला. यावेळी मुलांना शालेय साहित्यासह शाळेची फी भरण्यासाठी आर्थिक मदतही करण्यात आली. हा कार्यक्रम विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय येथे पार पडला. पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, विभागीय सुरक्षा आयुक्त (रेल्वे सुरक्षा दल) आणि साथी संस्था यांच्या विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी … Read more

nagar | ग्रामपंचायतचा धुराळा चिमुकल्यांच्या नाकातोंडांत

कोल्हार, (वार्ताहर)- राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीच्या कामाला नुकतीच परवानगी मिळाली असून सदर ठिकाणी असलेली जुनी इमारत पाडण्यात आली आहे. जुन्या काळातील असलेले हे बांधकाम पाडण्यात आल्याने येथून दगड, माती, चुनामिश्रित वाळू जेसीबीच्या साहाय्याने भरून याची विल्हेवाट ही जिल्हा परिषदेच्या शाळेत लावण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उडालेला धुराळा शाळेतील चिमुकल्यांच्या नाकातोंडात जात … Read more

नगर | नगरला ४५ हजार बालकांचे लसीकरण

नगर, (प्रतिनिधी) – अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने पाच वर्षाखालील बालकाला पल्स पोलिओ चा डोस देता येईल यासाठी शहरात २८१ बुथवर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. याचबरोबर पुढील पाच दिवस घरोघरी जाऊन बालकाचे पोलिओचे लसीकरण केले जाणार आहे. सर्वांच्या सहकार्यातून पोलिओ मुक्त भारत ही संकल्पना यशस्वी झाली आहे. शहरातील सुमारे ४५ हजार पालकांना पोलिओ लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले … Read more

Bangladesh Fire | ढाक्याच्या शॉपिंग मॉलला लागलेल्या आगीत ४४ जणांचा मृत्यू

Bangladesh Fire

Bangladesh Fire | बांगलादेशची राजधानी ढाका येथे गुरुवारी रात्री उशिरा आगीचा तांडव पाहायला मिळाला. येथील सहा मजली शॉपिंग मॉलला लागलेल्या आगीत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. आगीत भाजलेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोग्य मंत्री समंथा लाल सेन यांनी … Read more

गाझातील बालकांसाठी श्रीलंका उभारणार कल्याणनिधी

कोलोंबो – युद्धग्रस्त गाझातील बालकांच्या कल्याणासाठी श्रीलंका १ दशलक्ष डॉलरचा कल्याण निधी उभारणार आहे. श्रीलंकेच्या सरकारच्यावतीने आज ही माहिती देण्यात आली. हा निधी उभारण्यासाठी श्रीलंका सरकार आणि सर्व मंत्रालयांनी काटकसरीचे धोरण अवलंबले आहे. यानुसार रमझान महिन्यात सर्व इफ्तार पार्ट्या रद्द केल्या जाणार आहेत. या इफ्तार पार्ट्यांचा खर्च चिल्ड्रेन ऑफ गाझा फंडामध्ये जमा करण्यात येणार आहे, … Read more

पुणे | आरटीई कायद्यात बालकांच्या वयोमर्यादेत सुधारणा करावी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यात बालकांसाठी ६ ते १४ वयोमर्यादा दिलेली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यामध्ये ही वयोमर्यादा वयवर्षे ३ ते १८ केली आहे. यामुळे आरटीई कायद्यातील बालकांच्या वयोमर्यादेत सुधारणा करावी, अशी मागणी सिस्कॉम या संघटनेच्या अध्यक्षा वैशाली बाफना यांनी शिक्षण आयुक्त … Read more

नगर | बालकांच्या मदतीसाठी प्रशासन तत्पर

नगर (प्रतिनिधी) – आजची बालके हे उद्याच्या उज्ज्वल देशाचे भविष्य आहेत. या बालकांच्या विकासातुनच आपला देश अधिक बलशाली होणार असल्याने जिल्ह्यातील बालकांना सर्व प्रकारची मदत करण्यासाठी प्रशासन तत्पर असल्याची, ग्वाही जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली. स्नेहालय संकुल येथे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या … Read more