रशिया-युक्रेननंतर आता ‘या’ दोन देशांमध्ये होणार युद्ध; अमेरिकेच्या सीआयएचा अंदाज

वॉशिंग्टन – अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएचे संचालक विल्यम बर्न्स यांनी म्हटले आहे की, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या तैवानशी संबंधित महत्त्वाकांक्षा कमी लेखू नयेत. अमेरिकेला हे माहित आहे आणि शी जिनपिंग यांनी आपल्या सैन्याला 2027 पर्यंत तैवानवर हल्ला करण्याचे आदेश दिल्याचे गुप्तचरांकडूनही कळले आहे. याचा अर्थ असा नाही की शी जिनपिंग यांनी 2027 मध्येच हल्ल्याची … Read more

सीआयए’ने आखली होती विकीलीक्‍सचे संस्थापक ज्युलियन असांजे यांना ठार मारण्याची योजना

न्यूयॉर्क – विकीलीक्‍सचे संस्थापक ज्युलियन असांज यांना ठार मारण्याची योजना अमेरिकेची गुप्तचर संघटना “सेंट्रल इंटिलीजन्स एजन्सी’ अर्थात “सीआयए’ने केली होती, अशी माहिती एका अहवालातून उघड झाली आहे.  असांज हे लंडनमधील इक्वाडोरच्या दूतावासात बंदिस्त असताना त्यांचे अपहरण करण्याची, विषप्रयोग करण्याची अथवा त्यांची हत्या करण्याची योजना होती. असे या अहवालात म्हटले आहे. अमेरिकेच्या 30 माजी अधिकाऱ्यांच्या दूरध्वनी … Read more

करोनाचे जन्मस्थळ लवकरच सापडणार? – बायडेन यांचे अमेरिकन गुप्तचर यंत्रणेला ‘महत्वपूर्ण’ आदेश

वॉशिंग्टन – करोनाचा जगाला विळखा घालणारा विषाणू नेमका तयार झाला कुठे हे कोडे संपूर्ण जगाला अद्याप सुटलेले नाही. चीनकडे जरी बोट दाखवले जात असले तरी ठोस हाती काही लागलेले नाही. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनेही मिठाची गुळणी धरली आहे. मात्र, जोपर्यंत त्याचे उत्पत्ती स्थळ सापडत नाही, तोपर्यंत त्याचा कायमचा बंदोबस्त करणारे औषधही सापडणार नाही, अशी धारणा … Read more

भारत, पाकिस्तानमध्ये सीआयए करवी हेरगिरी

“वॉशिंग्टन पोस्ट’ आणि “झेडडीएफ’च्या वृत्तात गौप्यस्फोट वॉशिंग्टन : अमेरिकेची गुप्तहेर संस्था “सीआयए’च्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये अनेक वर्षांपासून हेरगिरी केली जात असल्याचा दावा अमेरिकेतील एका वर्तमानपत्राने केला आहे. गुप्तहेरांचे संदेश जतन करण्याची जबाबदारी असलेल्या स्वीत्झर्लंडमधील कंपनीच्या माध्यमातूनच “सीआयए’ही हेरगिरी करते आहे. गुप्तहेर, सैनिक आणि राजकीय मुत्सद्यांचे हे गुप्त संदेश वाचण्यासाठी ही कंपनीच “सीआयए’ला … Read more