गुन्ह्यांची उकल करण्यास सीआयडीचा ‘ठसा’

नऊ महिन्यांत 57 गुन्ह्यांची उकल पुणे – राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडीच्या) अंगुली मुद्रा केंद्राने (फिंगर प्रिंट) राज्यातील विविध प्रकारच्या 57 गुन्ह्यांची उकल बोटांच्या ठशांवरून केली. जानेवारी ते सप्टेंबर 2020 या नऊ महिन्यांत ही कामगिरी केली आहे. तर, 2019 मध्ये फिंगर प्रिंटच्या मदतीने 182 गुन्हे उघडकीस आले. जिवंत तसेच मृत व्यक्‍तीची ओळख त्या व्यक्‍तीच्या बोटांच्या ठशांवरून … Read more

राज्यात महिला अत्याचारांत वाढ

2018 मध्ये 3 लाख 46 हजार 291 गुन्हे दाखलः मुंबई शहर अव्वल सीआयडी गुन्हे अहवालातून बाब समोर  पुणे – पुरोगामी महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांत वाढ झाल्याचे निरीक्षण राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) नोंदविले आहे. 2018 मध्ये राज्यात या गुन्ह्यांत 10.95 टक्‍क्‍यांनी वाढ झाली असल्याचे अहवालात म्हटले आहे.  देशात 2018 मध्ये 31 लाख 32 हजार 954 … Read more

पालघर हत्याप्रकरणी सीआयडीची दोन आरोपपत्रे

पालघर: पालघर सामूहिक हत्याप्रकरणी राज्याच्या सीआयडीने 126 जणांविरोधात दोन आरोपपत्रे दाखल केली आहेत. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या या घटनेमध्ये दोन साधू आणि त्यांच्या चालकाची जमावाने केलेल्या मारहाणीत हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी राज्याच्या “सीआयडी’ने 4,955 आणि 5,925 पानांची दोन आरोपपत्रे बुधवारी पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुका प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दाखल केली. याप्रकरणी सबळ पुरावा मिळवण्यासाठी “सीआयडी’ने 808 संशयित … Read more

‘सीआयडी’ घडविणार रेखाचित्रकार

पुणे – गुन्ह्यातील संशयिताच्या वर्णनावरून काढलेल्या रेखाचित्राचा पोलिसांना नेहमीच फायदा झाला आहे. त्यामुळे असे रेखाचित्र काढणारे चित्रकार तयार करण्याचे काम राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) हाती घेतले आहे. रेखाचित्रकारांचा पाच दिवसांचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. सध्या सीआयडीमधील दहा प्रशिक्षणार्थींची तुकडीला पाच दिवसांचा बेसिक अभ्यासक्रम शिकविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या मदतीला … Read more

तरुणांना फ्लॅटवर बोलवून तरुणीची सीआयडी शाळा

भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये तरुणांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीत सामील असलेली तरुणी मुलांना तिच्या रिकाम्या फ्लॅटवर बोलावत असे. आणि तिच्या साथीदाराच्या मदतीने बनावट छापा टाकून तरुणांची लूट करीत होती. भोपाळच्या अयोध्या नगर पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून, तिला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक संजय साहू यांनी सांगितले … Read more