पुणे : शहरात थंडीचा कडाका वाढला

पुणे : शहरातील किमान तापमान पुन्हा 10 अंशापर्यंत खाली आल्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. विशेषत: एनडीए, पाषाण, हवेलीच्या काही भागात हुडहुडी भरणारी थंडीचा अनुभव नागरिक घेत आहे. गुरूवारी (दि. 28) शहराच्या मध्यवर्ती भागात किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. तर उपनगरातील काही भागात 10 ते 11 अंशांच्या आसपास किमान तापमान होते. दरम्यान, पुढील … Read more

नगर : स्थगित असलेली शहरातील कोट्यवधींची कामे होणार पूर्ववत

न्यायालयाने सरकारच्या कारभारावर ओढले ताशेरे : आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांना यश जामखेड : आमदार रोहित पवार यांच्या लढ्याला यश आले असून न्यायालयाने स्थगिती उठवल्यानंतरही कामे पूर्ववत झाली नसल्याने न्यायालयाने सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. यावेळी राज्याचे मुख्य सचिव यांनी लेखी स्वरूपात कळवले की, सर्व कामांची स्थगिती तत्काळ स्वरूपात उठवण्यात येईल, त्यामुळे न्यायालयात वारंवार केलेल्या पाठपुराव्याला … Read more

नगर : जर्सी गाय व कालवड चोरीला

राहुरी : अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या दरम्यान ५५ हजार रुपये किंमतीची एक जर्सी गाय व एक कालवड चोरुन नेली. राहुरी काॅलेज परिसरात ९ डिसेंबर ला ही चोरी झाली. कृष्णा रामदास पोपळघट हे राहुरी शहरात आझाद चौक, लोहा गल्ली येथे राहत असून त्यांची शेतजमीन राहुरी काॅलेजजवळ आहे. त्यांच्याकडे दोन जर्सी जातीच्या दोन गायी असून, कृष्णा पोपळघट यांचे … Read more

नगर : हरिष वाघमारे यांना पुरस्कार प्रदान

नेवासा  – भेंडा (ता.नेवासा) येथील हरिष रामदास वाघमारे यांना वर्ल्ड चैरिटी वेल्फेअर फाऊंडेशन, दिल्ली यांच्यावतीने देण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार – 2023 देऊन सन्मानित करण्यात आले आहे. वाघमारे यांनी वृक्ष लागवड, संवर्धन व जनजागृती, पाणी बचत मोहीम, पर्यावरण संबंधित केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. आजतागायत त्यांना आंतरराष्ट्रीय- राज्यस्तरीय … Read more

पुणे : शहराच्या पश्‍चिम भागात मंगळवारी पाणीबंद

पुणे – महापालिकेकडून येत्या मंगळवारी (दि.21) रोजी वारजे जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत जलवाहिन्यांची जोडणी तसेच काही जलवाहिन्यांच्या तातडीच्या देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे शहराच्या पश्‍चिम भागातील बहुतांश उपनगरांमध्ये पाणी बंद ठेवण्यात येणार आहे. यात, वारजे, उत्तमनगर, शिवणे, कोथरूड, कर्वेनगर, पाषाण, औंध, बाणेर, बालेवाडीचा समावेश आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी (दि.22) रोजी उशिरा आणि कमी दाबाने पाणी … Read more

पुणे : शहरात हुडहुडी; किमान तापमान 14 अंशांच्या खाली

पुणे – शहरात हुडहुडी वाढत असून, शुक्रवारी (दि. 17) किमान तापमानात आणखीन घट झाल्यामुळे थंडीचा जोर वाढलेला होता. पहाटे धुके आणि दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा असल्याने थंडी जाणवत आहे. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवसानंतर थंडीचा जोर आणखीन वाढण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. दरम्यान, हवामानातील बदलामुळे पुढील 72 तास हवामान कोरडे … Read more

नगर : शहरात लक्ष्मीपूजन उत्साहात

विजेचा लपंडाव; फटाक्‍यांच्या आतषबाजीत आसमंत न्हाऊन नगर – सनईचे मंगलदायी सूर, दारांसमोर रेखाटलेल्या सुबक रांगोळ्या, पाना-फुलांच्या तोरणांनी सजलेले प्रवेशद्वार अन्‌ आकाशकंदिलांचा प्रकाश, दीपमाळांचा झगमगाट अशा उत्साही वातावरणात आज (रविवार) सायंकाळी लक्ष्मी आणि कुबेर पूजन झाले. यानिमित्ताने घराघरात, दुकानांमध्ये आणि कार्यालयात श्रीलक्ष्मीची, वह्या आणि खातेपुस्तिकांची पूजा झाली अन्‌ त्यानंतर मुक्‍तहस्ते झालेल्या फटाक्‍यांच्या आतषबाजीत अवघा आसमंत न्हाऊन … Read more

पुणे : शहरातील 20 चौकांची होणार फेररचना

पुणे – शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून 15 रस्ते आदर्श रस्ते म्हणून विकसित करण्यात येत आहेत. या रस्त्यांवरील सुमारे 20 चौकांची फेररचना केली जाणार आहे. जी 20 अंतर्गत या रस्त्यांची महापालिका दुरुस्ती करून त्यासाठी यापूर्वीच निविदा काढलेल्या आहेत. या निविदांमधून हे काम केले जाणार आहे. तर यासाठीचा निधीही महापालिकेस आधीच प्राप्त झाला आहे. … Read more

अहमदनगर – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणारी बैठक रद्द

नगर  – महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे व सफाई कामगारांच्या वारसा हक्‍कांच्या नियुक्‍तीबाबत मुंबई मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणारी बैठक अचानक रद्द करण्यात आली. त्यामुळे महापालिका कर्मचारी नाराज झाले आहेत. दरम्यान, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह मुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिवांशीही चर्चा केली. सातव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचला असून लवकरच यावर … Read more

पुणे: आता “लॅप’मधून होणार शहराचा विकास

पुणे : राज्य शासनाने मेट्रो स्थानकांच्या 500 मीटर परिघात टीओडी झोनची तरतूद लागू केली असून टिओडीचा प्रभावी वापर करून शहरात नियोजनबद्ध विकास करण्यासाठी आता मेट्रो स्थानकांच्या एक किलोमीटरच्या परिघात स्थानिक क्षेत्र आराखडा (लॅप) राबविण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठीचा आराखडा, नियमावली तसेच आवश्‍यक असलेल्या घटकांचा अहवाल तयार करण्यात येणार असून याची जबाबदारी महापालिकेकडे देण्यात … Read more