nagar | पोलीस ठाण्याचा आवारात हाणामारी

पाथर्डी, (प्रतिनिधी)- तालुक्यातील पिंपळगाव टप्पा येथील सहा जणांनी पोलीस ठाण्याच्या आवारात हाणामारी करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याने पोलिसांनी फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला आहे. अनिल सिताराम फुंदे याने गोरक्ष शिरसाट, सतीश शिरसाट व शोभा शिरसाट यांच्याविरुद्ध जेसीबी अडवून चावी काढून घेतली, अशी तक्रार दाखल केली आहे. एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्या आईच्या गळ्यातील पाच … Read more

बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत हाणामारी, छतावरून दगडफेक, अनेक जण जखमी

Mamata Banerjee । पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात रामनवमीच्या मिरवणुकीत हाणामारी झाली. या घटनेत 20 जण जखमी झाले आहेत. रामनवमीनिमित्त मिरवणूक काढत असताना शक्तीपूर परिसरात ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. परिसरातील व्हिडिओंमध्ये लोक त्यांच्या छतावरून मिरवणुकीवर दगडफेक करताना दिसत आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या … Read more

पुणे जिल्हा : भीमाशंकरला पुजाऱ्यांच्या दोन गटांत हाणामारी

खेड पोलिसांकडून 36 जणांवर गुन्हा दाखल राजगुरूनगर,  – बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरात पूजा करण्याच्या कारणावरून पुजाऱ्यांच्या दोन गटांत तुफान हाणामारी झाली. सोमवारी (दि. 16) घडलेल्या या प्रकारावरून दोन्ही बाजूच्या 36 पुजाऱ्यांवर खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे मंदिर आवारात पोलीस उपस्थित असताना हा प्रकार घडला आहे. शंकर गंगाराम कौदरे (वय 65, … Read more

पुणे जिल्हा : मांडकी येथे रस्त्यासाठी हाणामारी

धुळोबावस्तीत महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे वाद पेटला परस्पर विरोधी तक्रारीवरून दोन्ही गटांवर गुन्हा काहीजण किरकोळ जखमी; परिसरात भीतीचे वातावरण नीरा – पुरंदर तालुक्‍यातील मांडकी येथील धुळोबावस्तीतील लोकांना मांडकी गावात जाण्यासाठी मागील दोन वर्षापासून रस्ता नाही. या ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे यासाठी अर्जही केला होता; मात्र त्यांच्या अर्जावर कोणतीही सुनावणी झाली नाही किंवा त्यांना मार्गदर्शनही करण्यात आले नाही, त्यामुळे … Read more

पाकमध्ये कोळसा खाणीच्या वादावरून दोन गटात तुंबळ हाणामारी ; १६ जणांचा मृत्यू तर दोघे जखमी

लाहोर : पाकिस्तानातील दारा आदमखेल कोहाट येथील कोळसा खाणीच्या सीमा वादात दोन जमातींमध्ये मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये जवळपास १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोघेजण जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या माध्यमांनी याविषयी माहिती दिली आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळसा खाणींच्या हद्दवाढीच्या वादातून सुनिखेल आणि अखोरवाल या दोन राष्ट्रांमध्ये मोठा वाद निर्माण झाला … Read more

Tripura : भाजप व मार्क्‍सवादी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्‍चक्री

आगरतळा :– त्रिपुरात माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्या गोमती जिल्ह्यातील विडिलोपार्जित घराजवळ भाजप आणि मार्क्‍सवादी पक्षाच्या समर्थकांमध्ये जोरदार धुमश्‍चक्री झाली त्यात काही जण जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री जामजुरी भागात झालेल्या चकमकीत सहभागी असल्याच्या आरोपावरून एका व्यक्‍तीला अटक करण्यात आली आहे, बाकीच्यांचा शोध घेतला जात आहे. देब यांच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या वडिलोपार्जित घरात चार … Read more

South Korea : दक्षिण कोरियातील सत्ताधाऱ्यांमध्ये कुत्र्यांवरून संघर्ष

सेउल – दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्यामधील संघर्ष काही नवा नाही. गेल्या दोन महिन्यांपासून या दोन देशांमध्ये किरकोळ प्रमाणात लष्करी संघर्षही सुरू झाला आहे. पण आता एक वेगळाच संघर्षाचा विषय या दोन देशांबाबत समोर आला आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग यांनी काही वर्षांपूर्वी एक कुत्र्यांची जोडी दक्षिण कोरियाच्या सत्ताधाऱ्यांना भेट दिली होती. त्या … Read more

शिवसेना-शिंदे गटात प्रभादेवीत जोरदार राडा; 25 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल; महेश सावंत यांच्यासह 5 अटकेत

मुंबई : प्रभादेवीत मध्यरात्री झालेल्या शिवसेना-शिंदे गटात जोरदार राडा झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणी आता दादर पोलिसांनी 25 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.  मारहाण झालेले शिंदे गटातील संतोष तेलवणे यांच्या फिर्यादीवरून दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश सावंत, शैलेश … Read more

कर्नाटक: ‘टिपू सुलतान विरुद्ध सावरकर’ पोस्टरवरून वाद; शिवमोग्गा शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

नवी दिल्ली : कर्नाटकातील शिवमोग्गा येथे दोन गटांमध्ये चांगलीच हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शिवमोग्गा शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हा गोंधळ टिपू सुलतान विरुद्ध स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावावरून … Read more

भाजप-राष्ट्रवादीत काट्याची टक्‍कर

राजवर्धन पाटील यांच्या निवडीमुळे इंदापुरातील युवा वर्गात चैतन्य नीलकंठ मोहिते इंदापूर – राज्याच्या राजकारणात सातत्याने चर्चेत असणारे भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्‍यात सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसला आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत पुरते घायाळ करण्यासाठी भारतीय जनता पार्टीची जम्बो कार्यकारिणी नव्या दमाची निर्माण केलेली दिसून येत आहे. भाजपची जम्बो कार्यकारिणी आगामी पंचायत समिती, … Read more