पुणे | मार्केटमध्ये हापूसची जादू ओसरल्याचे चित्र

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पूर्वमोसमी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका रत्नागिरी हापूसच्या आवक आणि विक्रीवर देखील झाला आहे. मागील आठवड्यापासून आवक घटली असून, ती आणखी कमी होत राहणार आहे. सद्यस्थितीत येथील बाजारात दररोज दीड ते दोन हजार पेट्यांची आवक होत आहे. आवक कमी असूनही भाव आवाक्यात आहेत. तरीदेखील ग्राहकांनी आंबा खरेदीकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत … Read more

पुणे जिल्हा | अवकाळीमुळे वातावरणात बदल; शेतकऱ्यांचे झाले नुकसान

सोरतापवाडी, (वार्ताहर)- अवकाळी पावसाने पूर्व हवेलीत वातावरणात बदल झाला असून शेतकरी मात्र हवादिल झाला आहे. लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी काचंन, सोरतापवाडी, नायगाव, पेठ, कोरेगाव मूळ, वळती, तरडे, शिंदवणे, टिळेकरवाडी, भवरापूर, आदी गावांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला आहे. सर्व पिके नष्ट होतील या … Read more

पुणे जिल्हा | काऱ्हाटीत संसर्ग आजार बळावले गावकरी घायाळ

काऱ्हाटी, (वार्ताहर)- बारामती तालुक्यातील काऱ्हाटी परिसरात उन्हाची तीव्रता ४१ डिग्री सेल्सिअस असल्यामुळे काऱ्हाटीवासियांना याचा मोठा फटका बसत आहे. नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे वातावरणामुळे उष्णतेच्या लाटेने तीव्रता निर्माण झाली आहे. काऱ्हाटी, माळवाडी, फोंडवाडा, जळगाव, सुपेसह परिसरातील नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्णतेमुळे घराच्या बाहेर निघणे ही कठीण झाले आहे. … Read more

वातावरण बदलाचा पतधोरणावर परिणाम; रिझर्व्ह बँकेच्या मासिक अभ्यास अहवालातील माहिती

मुंबई – यापूर्वी वातावरण बदलाचा विचार पत धोरण तयार करताना क्वचितच केला जात होता. मात्र सध्या वातावरण बदलल्यामुळे अनेक आर्थिक बाबीवर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत पत धोरण तयार करताना वातावरण बदलाचा विचार करावा लागत आहे, असे रिझर्व्ह बँकेच्या मासिक अभ्यास अहवालात म्हटले आहे. नकारात्मक वातावरण बदलामुळे अर्थातच संबंधित देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. … Read more

पिंपरी | कान्हे परिसरात गालफुगीचे रुग्ण

कान्हे, (वार्ताहर) – वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य संसर्गजन्य आजाराचा फैलाव वाढत असताना विशेषतः लहान मुलांना गालफुगीचा त्रास सुरू झाला आहे. कान्हे, नायगाव, कामशेत परिसरात गालफुगीचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. आठवडाभर या रोगाचा प्रादुर्भाव राहत असून रुग्णांनी जास्तीत जास्त घरात आराम करावा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत. तसेच हा आजार संसर्गजन्य असल्याने रुग्णांनी शिंकताना, खोकताना काळजी … Read more

थंडी-पावसाच्या खेळानंतर वाढणार तापमान ! देशातील वातावरणात पुन्‍हा बदल होण्‍याची शक्‍यता

नवी दिल्ली – देशासह महाराष्‍ट्रात काही दिवसांपासून थंडी आणि पावसाचा खेळ सुरू आहे. यामुळे वातावरणात अनेक बदल पाहायला मिळत आहेत. हिवाळ्यात पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. आता पुढील काही दिवस तापमानात वाढ होणार असल्‍याची शक्‍यता हवामान खात्‍याने वर्तविली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यासह देशातील नागरिकांना अवकाळी पाऊस आणि थंडीपासून … Read more

हवामान बदलामुळे शास्त्रज्ञांची चिंता वाढली ! उत्तराखंडमधील हिमनद्या वितळतायत वेगाने

नवी दिल्ली – उत्तराखंडमधील हवामान बदलामुळे (climate change) शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे. यंदा हवामानातील (Weather) बदल आणि तापमानात झालेली वाढ यामुळे येथील हिमनद्या झपाट्याने वितळत आहेत. यामुळे भिलंगणा तलावाचा आकार वाढू लागला आहे. अशा स्थितीत या तलावाला भविष्यात कोणतीही समस्या निर्माण होऊ नये, यासाठी वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन (Wadia Institute of Himalayan) जिऑलॉजीचे शास्त्रज्ञ उपग्रहाद्वारे … Read more

हवामान बदलाचा वाढता प्रकोप; 122 वर्षांनंतर विक्रमी उष्णता

नवी दिल्ली  – सन 1901 नंतर ऑगस्ट महिन्यात प्रथमच सर्वात उष्ण आणि कोरडे तापमान नोंदवण्यात आले. आता देशाच्या अनेक भागांमध्ये सप्टेंबर महिन्यातही तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवले जात आहे. ऑगस्ट महिन्यात देशातील अनेक भागांतील तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला होता. याबाबत हवामान तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली होती. हा हवामान बदलाचा वाढता प्रकोप मानला जात आहे. … Read more

पृथ्वीच्या अंतरंगावरही क्लायमेट चेंजचा परिणाम ; जमिनीत होणाऱ्या बदलामुळे उंच इमारतींना धोका

वॉशिंग्टन : गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक पातळीवरच क्लायमेट चेंज किंवा तापमान वाढीचा विषय जास्त गंभीर बनत चालला आहे. पृथ्वीवरील विविध घटकांना या तापमान वाढीचा फटका बसत असताना आता एका नवीन अभ्यासानुसार पृथ्वीच्या अंतरंगालासुद्धा या क्लायमेट चेंजचा धोका निर्माण झाला आहे. हवामानातील बदलामुळे आणि तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागल्याने पृथ्वीच्या गाभ्यातही बदल होऊ लागले आहेत. … Read more

Climate Change : हवामान बदलाचे तोटे आणखी एक दशकभर सहन करावे लागणार

नवी दिल्ली :- उशीराने येणारा मोसमी पाऊस आणि अवकाळी पावसाने होणारे नुकसान अशा आपत्तींना मानवनिर्मित कारणेच जबाबदार असून जागतिक हवामान बदलाचे तोटे आणखी किमान एक दशकभर तरी सहन करावे लागतील, असे पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाच्या अभ्यासातून स्पष्ट होत आहे. पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाच्या अभ्यासानुसार कर्नाटक राज्याच्या सागरी रेषेजवळील 22 टक्के जमीन हळूहळू पाण्याखाली जात आहे. … Read more