सलग चौथ्या दिवशी ढगाळ वातावरण

पिंपरी -पिंपरी-चिंचवड शहरात सलग चौथ्या दिवशी ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना दिवसभर उकाडा सहन करावा लागला. थंडी जाऊन उन्हाळ्याची चाहून लागत असतानाच गेल्या काही दिवसांपासून अचानकच वातावरणात बदल होऊ लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी शहरातील काही भागांमध्ये तुरळक पाऊस पडला होता. तर बुधवारी मावळ परिसरात काही भागांमध्ये पाऊस झाला. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे शेतकरी, वीट भट्टी व्यावसायिक … Read more

पुढील दोन दिवस हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज

पिंपरी – दक्षिणेकडील आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टी परिसरातही चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्याने, गेली दोन दिवसांपासून दोन दिवस शहर व परिसराचे हवामान ढगाळ आहे. तर हीच स्थिती आणखी दोन दिवस राहणार असल्याचे पुढील दोन दिवस शहराचे हवामान अंशत: ढगाळ राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दक्षिणेकडील आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टी परिसरातही चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. ही … Read more

पुण्यात हलकासा पाऊस, दिवसभर ढगाळ वातावरण

पुणे  – थंडीची चाहूल लागत असतानाच, ऐन डिसेंबरमध्ये नागरिकांनी ढगाळ वातावरण अनुभवले. शहराच्या काही भागात हलका पाऊसदेखील झाला. तर, मुंबई आणि उपनगरांतदेखील काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला.     मागील 24 तासांत कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे होते. तर शहरात वातावरण ढगाळ होता. शुक्रवारी … Read more

पुणे शहरातील किमान तापमानात वाढ

आठवडाभर वातावरण ढगाळ; राज्यातील थंडी गायब : हवामान विभागाकडून नोंद पुणे – बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्याचे प्रमाण कमी झाले असले तरीही दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यातील थंडी गायब झाली असून, पुण्यासह संपूर्ण राज्यात किमान तापमानात वाढ झाल्याची नोंद हवामान विभागाने घेतली. उत्तरेतून महाराष्ट्राच्या दिशेने वाहणाऱ्या … Read more

पुढील तीन दिवस राहणार ढगाळ वातावरण

पिंपरी – यावर्षी जास्त काळ ठाण मांडून राहिलेला मॉन्सून परतला आहे. यामुळे आता शहरात ढगाळ वातावरण असून, दिवसा उकाडा तर रात्री वातावरणातील गारव्यात वाढ होत आहे. आणखी तीन दिवस असे संमिश्र वातावरण राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यंदा मॉन्सून केरळमध्ये 1 जूनला दाखल झाला होता. त्यानंतर 11 जून रोजी मॉन्सून राज्यात दाखल झाला त्यानंतर … Read more

उकाड्यावर ‘मुसळधार’ फुंकर!

सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने पुण्याला धुतले  पुणे – गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहर आणि उपनगरांत आर्द्रता वाढली आहे. परिणामी, उकाड्यात प्रचंड वाढ झाली होती. उन्हाळ्याप्रमाणे अक्षरश: घामाच्या धारा वाहत असताना शहरात शनिवारी सायंकाळी मुसळधार पावसाने सुमारे तासभर हजेरी लावली. यामुळे वातावरणात कमालीचा गारवा पसरला.  शहर परिसरात गेल्या अनेक दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी सायंकाळच्या सुमारास जोरदार … Read more

ढगाळ हवामानामुळे शेतकरी चिंतेत

पिकांवर रोग, अळ्यांचा प्रादुर्भाव : दूषित हवामानाचा बसतोयं फटका टाकवे बुद्रुक – मावळ तालुक्‍यात गेल्या आठवड्यापासून ढगाळ हवामान तयार होत आहे. या ढगाळ हवामानाचा शेतातील विविध पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. तालुक्‍यातील परिसरात गहू, हरभरा, ज्वारी पिकांवरोबरच विविध ठिकाणी तरकारी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. ढगाळ हवामानामुळे पिकांवर किडी, अळ्यांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. … Read more