#UP Election 2022: वाराणसीतील प्रचार सभेत ममता व जयंत चौधरी होणार सहभागी

नोएडा -गुरुवारी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि आरएलडी प्रमुख जयंत चौधरी यांच्या संयुक्त प्रचार सभेत पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याहीं सहभागी होणार आहेत. वाराणसीच्या हरहुआ ब्लॉकमधील ऐर्हे गावात दुपारी ही संयुक्त सभा होणार आहे.वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदीय मतदारसंघ आहे. तेथे विधानसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात … Read more

#UP Election 2022 : उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या निवडणुकांची घोषणा

लखनौ -उत्तर प्रदेशच्या विधान सभांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच आता उत्तर प्रदेशातील विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाने रविवारी या निवडणुकांची घोषणा केली. एकूण 35 स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेचे 36 सदस्य निवडले जाणार आहेत. विद्यमान सदस्यांच्या सदस्यत्वाची मुदत 7 मार्च रोजी संपत आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक … Read more

#UP Election 2022 : अवैध हत्यारांऐवजी उत्तर प्रदेशात क्षेपणास्त्रांचे उत्पादन

चंदौली, (उत्तर प्रदेश) -उत्तर प्रदेशात पूर्वी लोकांना घाबरवण्यासाठी आणि ठार मारण्यासाठी अवैध हत्यारे तयार केली जात होती. मात्र आता देशाचे रक्षण करण्यासाठी तोफगोळे आणि क्षेपणास्त्रांची निर्मिती केली जात आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशात संरक्षण साहित्य उत्पादन कॉरिडॉर उभारला जात आहे, या संदर्भाने ते बोलत होते. उत्तर प्रदेशातील भाजप सरकारच्या … Read more

#UP Election 2022 : अयोध्येत आला नव्या रंगाचा फलक

नवी दिल्ली-उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच अयोध्याचे जिल्हाधिकारी नितीशकुमार यांनी भगवा फलक काढून हिरव्या रंगाचा फलक लावल्याने सत्ताबदलाची चर्चा होवू लागली आहे. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे पाच टप्पे पूर्ण झाले असून दोन टप्प्याचे मतदान बाकी आहे. 3 मार्च रोजी सहाव्या तर 7 मार्च रोजी सातव्या टप्प्यासाठी मतदान केले जाईल. यानंतर 10 मार्च रोजी निकाल येणे आहे. … Read more

#UP Election 2022 : लक्षवेधी : डॉनच्या ‘शुटर’ मुलाचा फिल्मी स्टाईल प्रचार

वंदना बर्वे नवी दिल्ली -एखाद्या चित्रपटात निवडणूक लढणारा बाहुबली जसा निवडणुकीचा प्रचार करतो तसाच प्रचार डॉन मुख्तार अन्सारी यांचा मुलगा अब्बास अन्सारी करताना दिसत आहे. ओ. पी. राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पार्टीने अब्बास अन्सारी यांना मउ सदर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. अब्बास अन्सारी स्वत: एक शुटर आहेत आणि त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय शुटींग स्पर्धांमध्ये भाग … Read more

#UP Election 2022 : प्रत्येक मत भाजपला विक्रमी विजय मिळवून देईल

गाझीपूर -उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दिलेले प्रत्येक मत भारतीय जनता पक्षाला विक्रमी विजय मिळवून देईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथील सभेत बोलताना केले. ते म्हणाले की उत्तरप्रदेशातील जनता परिवारवादी पक्षांना त्यांची जागा दाखवून देईल. मोदी म्हणाले की परिवारवादी पक्षांनी त्यांच्या स्वार्थी राजकारणामुळे उत्तरप्रदेशला बदनाम केले आहे. निवडणुकीच्या निमीत्ताने अशा राजकीय घराणेशाहीला शिक्षा … Read more

#UP Election 2022 : भाजप खासदार संघमित्रा मौर्य यांच्याविरोधात गुन्हा दाखल

कुशीनगर -भाजपच्या खासदार संघमित्रा मौर्य यांच्याविरोधात भाजपच्याच नेत्यांकडून हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संघमित्रा मौर्य यांचे वडील स्वामी प्रसाद मौर्य हे समाजवादी पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत. संघमित्रा यांनी आपल्या वडिलांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर स्वामी प्रसाद मौर्य यांच्या “रोड शो’ दरम्यान वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक झाली होती. त्यावेळी अनेक वाहनांच्या काचा फुटल्या होत्या. याप्रकरणी खासदार संघमित्रा … Read more

आज योगी आदित्यनाथ गोरखपूरमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार

नवी दिल्ली : देशात सध्या पाच राज्याच्या निवडणुकांचे वारे वाहत असल्याचे दिसत आहे. त्यातही सर्वात जास्त उत्तर प्रदेशच्या निवडणूका या देशात चर्चेच्या असल्याचे पाहायला मिळत आहे.  मुख्यमंत्री आणि भाजपाचे उमेदवार योगी आदित्यनाथ आज गोरखपूर (शहर) मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी दाखल करणार आहेत. योगी आदित्यनाथ अर्ज भरताना  त्यांच्यासोबत गृहमंत्री अमित शाह … Read more

उत्तर प्रदेशात डॉक्‍टरांना शासकीय रुग्णालयात दहा वर्षे सेवेची सक्ती

लखनौ – दहावी-बारावीनंतर हमखास प्राधान्य दिले जाणारे व्यावसायिक करिअर म्हणून मेडिकल-इंजिनीअरींगकडे पाहिले जाते. अनेक राज्यांमध्ये वैद्यकीय पदवी मिळवल्यानंतर एक वर्ष शासकीय रुग्णालयांत सेवा करणे, हे अनिवार्य असते. मगच तुम्हाला तुमची खासगी प्रॅक्‍टीस करता येते. मात्र, उत्तर प्रदेश सरकारने एक नव्याने काढलेला आदेश वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना चिंताजनक ठरू पहात आहे. उत्तर प्रदेशात शासकीय रुग्णालयांमध्ये … Read more

अयोध्येत दिवाळीला होणार झगमगाट

नवी दिल्ली – तब्बल 492 वर्षांनंतर राम जन्मभूमी परिसरात पहिल्यांदा भव्य दिवाळी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून आगामी दीपावलीनिमित्त प्रभु श्रीरामचंद्रांच्या अयोध्येत तब्बल 5 लाख 50 हजार लाख दिवे लावण्यात येणार आहेत. यापूर्वी फक्त मर्यादित परिसरात दिवाळी साजरी केली जात असे. शिवाय फक्त मंदिरातील पुजाऱ्यांना दिवे लावण्याची परवानगी होती. यंदाच्या वर्षी देशात कोरोना व्हायरसंचं सावट … Read more