पुणे जिल्हा | इन्स्टाग्राममुळे पिस्तूल विक्रीचे रॅकेट उघड

बारामती, (प्रतिनिधी)- इन्स्टाग्रामच्या स्टेटसवरुन बारकाईने तपास झाल्यानंतर पिस्तुलाची देवाणघेवाण करणारी एक साखळीच बारामतीत असल्याचे उघड झाले. कोयत्याचे चित्र ठेवणा-या युवकाविरुध्द बारामती तालुका पोलिसांच्या तपासानंतर त्याच्याकडे पिस्तूल असल्याचेही पुढे आले. त्यातून साखळीच पुढे आली आहे. पिस्तूल विक्रीच्या रॅकेटमधील तीन जणांच्या मुसक्या आवळल्या तर एकजण फरार आहे. आकाश शेंडे (रा. सावळ) , रोहित वणवे (रा. लाकडी, ता. … Read more

nagar | निवडणुकीच्या धामधूमीत ९३ लाख ३० हजारांचे सोने जप्त

नगर, (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीत ९३ हजार ५० हजार ९७ रुपयांचे किमतीचे सोने व रोख रक्कम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केली आहे. निवडणुक काळात कोणत्याही व्यक्तीला ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम जवळ बाळगता येत नाही. मात्र, संबंधितीत व्यक्तीकडून १ किलो ३११.२८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, तसेच ३४ हजार ७०० रुपये रोक रक्कम, तर … Read more

पुणे | नालेसफाईचा यंदाही बोजवारा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – नालेसफाईची कामे मागील वर्षी उशीरा सुरू झाल्याने नाले सफाईचा उडालेला बोजवारा आणि यावर्षी लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेचे कारण देत महापालिका प्रशासनाकडून मार्च महिन्यातच नालेसफाईच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या निविदा मंजूर करत कार्यादेश देण्यात आले. मात्र, त्यानंतरही या कामाला गती मिळालेली नाही. परिणामी, यंदाही पावसाळ्यात पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता स्वत: … Read more

nagar | आचार संहिता भंगाच्या ११४ तक्रारी

नगर, (प्रतिनिधी) – जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागू झालेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आचार संहिता नियंत्रण कक्षाकडे आतापर्यंत ११४ तक्रारी आल्या आहेत. या सी-व्हिजिल ॲपवरील शंभर टक्के तक्रारींचे निवारण झाले आहे. ई-मेल आणि प्रत्यक्ष कार्यालयात येऊन दिलेल्या तक्रारींपैकी ९० टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने देशात लोकसभा निवडणुकीसाठी कार्यक्रम दि.१६ मार्च रोजी … Read more

nagar | प्रचार खर्चाचा दर निश्चित : निवडणूक विभाग ठेवणार खर्चावर वॅच

नगर,(प्रतिनिधी) – लोकसभा निवडणूक लढवणारे राजकीय पक्ष व उमेदवारांसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेने प्रचार खर्चाच्या साहित्याचे अंतिम दर निश्‍चित केले आहेत. तत्पूर्वी प्रारूपदराची यादी तयार करून त्यावर राजकीय पक्षाकडून हरकती घेण्यात आल्या. आलेल्या हरकतीनूसार प्रचार खर्चाची यादी अंतिम करण्यात आली आहे. यात मासांहारी जेवणासह, बिर्याणी प्लेटचे दर कमी करण्यात आलेले आहेत. तर प्रचार काळात देण्यात येणार्‍या … Read more

पुणे जिल्हा | तमाशा पंढरीत दोन्ह कोटींची उलाढाल

नारायणगाव, (वार्ताहर) – नारायणगावची ओळख असलेल्या राष्ट्रपती पदक विजेत्या विठाबाई भाऊ मांग तमाशा पंढरीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावच 175 करार झाले असून दोन कोटी रुपयांची उलाढाल झाली. 175 करार.. दोन कोटीची उलाढाल.. चंद्रकांत ढवळपुरीकर यांचा 3 लाख 26 हजार बुकिंग तर राष्ट्रपती पदक विजेत्या विठाबाई भाऊ मांग यांचा 3 लाख 15 हजार रुपयांना बुकिंग झाले आहे. तमाशा … Read more

पुणे | पुणे विद्यापीठातील नियुक्त्या रखडल्या

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिव, अधिष्ठाता या पदांसाठी मुलाखती आता जून महिन्‍यापर्यंत घेता येणार नसल्याचे स्‍पष्ट होत आहे. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आचारसंहिता काळात कोणत्‍याही विद्यापीठांना कोणत्‍याच पदाच्‍या मुलाखती घेता येणार नसल्‍याचे सूचित केले आहे. त्‍यामुळे आता या पदाच्‍या नियुक्‍तीसाठी जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्यातील एका विद्यापीठाने आचारसंहितेच्या काळात मुलाखती … Read more

nagar | लोकसभा निवडणुकीमुळे झेडपीच्या बदल्या लांबणार

नगर, (प्रतिनिधी) – दरवर्षी मे महिन्यांत होणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती कर्मचार्‍यांच्या बदल्या यंदा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबणार आहेत. जून महिन्यांत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर ग्रामविकास विभागाच्या सुचनानूसार बदल्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहेत. दरम्यान, चालू आठवड्यात बदली पात्र (प्रशासकीय) आणि विनंती बदलीसाठी पात्र कर्मचार्‍यांची माहिती संकलित करण्यासाठीचे पत्र काढण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात … Read more

पिंपरी | आचारसंहितेमुळे त्‍या खतांच्‍या विक्रीला ब्रेक

वडगाव मावळ, (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र खतांच्या पोत्यावर छापण्यात आलेले आहे. त्यामुळे त्या खतांची पोती विकण्यावर मर्यादा आल्या आहेत. खत विक्रेत्यांनी लाखो रुपये भरून खते खरेदी केली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे खतांचा मोठा साठा गोदामात शिल्लक आहे. त्यातच शेतकऱ्यांकडून पिकांसाठी खताची मागणी होत आहे. मात्र, पंतप्रधानांच्या फोटोमुळे ती … Read more

पिंपरी | गावजत्रेचे कार्यक्रम आचारसंहितेच्या कचाट्यात

कान्हे,(वार्ताहर) – मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात ग्रामदेवतांच्या जत्रा सुरू झाल्‍या आहेत. सध्या लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने सार्वजनिक कार्यक्रमावर अनेक निर्बंध आले आहेत. त्यामुळे यात्रेतील खास आकर्षण असलेले तमाशा लावणी कार्यक्रम लावणी कलापथक मनोरंजनच्या कार्यक्रमावर वेळेच्‍या बंधनामुळे गंडांतर आले आहे. ग्रामीण भागात यात्रेच्या निमित्त लावणीचे कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा अशा मनोरंजनचे कार्यक्रम नेहमीच ठरलेले असतात. रात्री उशिरापर्यंत … Read more