सरकारी कर्मचाऱ्यांना प्रचार पडणार महागात; थेट निलंबनाची कारवाई

पुणे – निवडणूक काळात सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना व्हाटसअप ग्रुप वरून एखाद्या उमेदवाराचा प्रचार करणे महागात पडणार आहे. सरकारी कर्मचारी-अधिकारी यांना निवडणुकीच्या काळात कोणत्याही राजकीय पक्षांचा प्रचार करता येत नाही. तरीही काही कर्मचारी उघडपणे अथवा सोशल मीडियावर एखाद्या उमेदवाराच्या प्रचाराच्या पोस्ट व्हायरल करतात. निवडणुकीच्या कामाची जबाबदारी असूनही सरकारी कर्मचार्यांकडून असे प्रकार घडतात. यंदा निवडणूक आयोगाचे सोशल … Read more

nagar | आज अखेर आचारसंहितेच्या नियंत्रण कक्षात ४७ तक्रारी

नगर (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने नगर व शिर्डी या दोन्ही मतदारसंघांतील, आज अखेर आचारसंहितेच्या नियंत्रण कक्षात ४७ तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्या सर्व निकाली काढण्यात आल्या आहेत. केवळ १९ तक्रारींमध्ये तथ्य आढळले. जिल्हा नियंत्रण कक्षाचे प्रमुख तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातील आचारसहिताभंगाच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी … Read more

पुणे | आचारसंहिता भंगाच्या १९१ तक्रारींवर कार्यवाही

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियंत्रण कक्षाकडे प्राप्त आचारसंहिता भंगाच्या 195 तक्रारींपैकी 191तक्रारींवर कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक तक्रारी या कसबा पेठ, वडगाव शेरी व खडकवासला विधानसभा मतदारसंघांतून आल्या आहेत. यामध्ये कसबा पेठ मधून 23, खडकवासलामधून 22, वडगाव शेरीमधून 25 तक्रारी आल्या आहेत. जिल्हा नियंत्रण कक्षाकडे सी-व्हिजील पोर्टलवर आणि … Read more

पुणे | नालेसफाई १५ मे पर्यंत पूर्ण करा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} : महापालिका प्रशासनाकडून पावसाळापूर्व कामांना सुरुवात करण्यात आली असून, नालेसफाईची कामे १५ मे पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी संबधित विभागांना दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महापालिकेने आचारसंहितेआधीच निविदा प्रक्रिया करून कामे सुरू केली असून, ही कामे वेळत संपविण्याचे आदेश आयुक्तांनी प्रशासनास दिले आहे. त्यामुळे यंदातरी वेळेत नाले सफाईची … Read more

Pune: निवडणूक खर्च, गैरप्रकारांवर करडी नजर

पुणे – लोकसभा निवडणुकीदरम्यान उमेदवार आणि राजकीय पक्षांचा निवडणूक खर्च आणि निवडणुकीतील गैरप्रकारांवर करडी नजर ठेवली जात आहे. यासाठी जिल्ह्यात १३५ भरारी पथके आणि १२९ स्थिर सर्वेक्षण पथके स्थापन करण्यात आली आहेत, अशी माहिती तक्रार निवारण कक्षाद्वारे देण्यात आली आहे. खर्च संनियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त जिल्हास्तरावर समन्वय अधिकारी नेमण्यात आले असून प्रत्येक मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी … Read more

satara | निवडणूक आचारसहिंतेतील मार्गदर्शक तत्वे

सातारा (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने लागू केलेल्या आदर्श आचारसहिंतेतील मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ही आचारसंहिता दि. 16 मार्चपासून लागू झाली आहे. निवडणूक काळात काय करावे आणि काय करू नये, यासंबंधीची ही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. या काळात काय करावे याची माहिती पुढीलप्रमाणे आहेत. निवडणुकीच्या घोषणेपूर्वी प्रत्यक्ष … Read more

पिंपरी | पाचवीच्या ७८ विद्यार्थ्‍यांचे भवितव्‍य धोक्‍यात

चांदखेड, (वार्ताहर) – जिल्हा परिषद शाळेत सुरुवात केलेल्या पाचवीच्या वर्गातील ७८ विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्‍यात आले आहे. प्रस्‍ताव सादर करूनही त्‍यास शासनाने मान्‍यता दिलेली नाही. आता आचारसंहिता लागल्‍याने शाळेला मान्‍यता मिळण्‍याचीही शक्‍यता धुसूर झाली आहे. चांदखेड येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत ३४० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नैसर्गिक वाढीने पाचवीचा … Read more

पुणे | निवडणुकांच्या तोंडावर महापालिकेची कोंडी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली, तरी शहरातील विकासकामांवर कोणताही परिणाम होणार नाही असा दावा नवनियुक्त महापालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांनी दोनच दिवसांपूर्वी केला होता. मात्र, राज्य शासनाने निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अनेक अधिकाऱ्यांची बदली केली आहे. त्यात पुणे महापालिकेच्या दोन अतिरिक्त आयुक्त आणि एक उपायुक्तांचा समावेश आहे. तर आणखी तीन उपायुक्तांची पुढील … Read more

पुणे | आचारसंहितेचा भंग झाल्यास गुन्हे दाखल करा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी. आचारसंहिता भंग झासल्याचे आढळल्यास मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम १९९५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेला दिले आहेत. निवडणूक आयोगाने १६ मार्च रोजी लोकसभा निवडणूक-२०२४ जाहीर केल्यानंतर आचारसंहिता लागू … Read more

पुणे | कॉग्रेस कार्यकर्त्यांची नाराजी संपता संपेना

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आणि तारखा, आचारसंहिताही जाहीर झाली. मात्र, शहर कॉंग्रेसचे अंतर्गत गटबाजीमुळे अद्याप उमेदवारीचे सूपही वाजले नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. अंतर्गत नाराजी थेट मंगळवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीतच दिसून आली. काही कार्यकर्त्यांनी ती थेट शहर पदाधिकाऱ्यांना बोलूनही दाखवली. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी काँग्रेस भवन येथे … Read more