काँग्रेसननंतर ‘या’ पक्षालाही आयकर विभागाची ११ कोटींची नोटीस

नवी दिल्ली – कॉंग्रेस पाठोपाठ आता कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियालाही आयकर विभागाकडून नोटीस प्राप्त झाली आहे, ज्यामध्ये कर रिटर्न भरताना जुने पॅन कार्ड वापरल्याबद्दल त्यांना ११ कोटी रुपयांचे “देय” भरण्यास सांगितले आहे. जुने पॅन कार्ड वापरल्याच्या कारणावरून इतका मोठा दंड करण्यात आल्याचे हे एकमेव उदाहरण असावे. कर अधिकाऱ्यांच्या नोटीसला आव्हान देण्यासाठी डावे पक्ष आपल्या वकिलांचा … Read more

New Parliament Inauguration : देशातल्या ‘या’19 प्रमुख राजकीय पक्षांचा नवीन संसद भवन उद्‌घाटन कार्यक्रमावर बहिष्कार

नवी दिल्ली – देशातील 19 प्रमुख राजकीय पक्षांनी एकमुखाने पंतप्रधान मोदींच्या हस्ते येत्या 28 तारखेला होणाऱ्या संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने लोकशाहीचा आत्माच हिरावून घेतला असल्याने आम्हाला संसदेच्या नवीन इमारतीत कोणतेही मूल्य दिसत नाही असे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पुर्ण बाजूला ठेवून स्वतः मोदींनीच या … Read more

कर्नाटकात कम्युनिस्ट पक्षाचा ‘या’ पक्षाला पाठिंबा

बेंगळुरू – भारतीय कम्युनिस्ट पक्षाने कर्नाटक निवडणुकीत कॉंग्रेसला पुर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. कॉंग्रेस नेते रणदीप सुर्जेवाला यांनी सांगितले की, कम्युनिस्ट पक्षाचे कर्नाटकातील सर्व कार्यकर्ते बिनशर्तपणे कॉंग्रेसला पाठिंबा देणार आहेत. कम्युनिस्ट पक्षानेच ही भूमिका घेतली आहे असेही त्यांनी नमूद केले. कम्युनिस्ट पक्षाने या राज्यात सात उमेदवार उभे केले आहेत. तथापि या सात मतदार संघात कॉंग्रेस … Read more

कन्हैया कुमारने घेतली राहुल गांधींची भेट

नवी दिल्ली – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा नेता आणि जेएनयूचा विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार याने कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. अलीकडील काळात अनेक युवा नेत्यांनी रामराम केलेल्या कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची अटकळ बांधण्यात येत आहे. गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी हेही कॉंग्रेस नेतृत्वाच्या संपर्कात असल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने मेवाणी यांच्या विरोधात … Read more

दखल : क्‍यूबात नवीन आव्हाने

-अभिमन्यू सरनाईक क्‍यूबातील सत्तारूढ कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी कास्ट्रो कुटुंबातील सदस्य नसण्याची वेळ 1959 च्या क्रांतीनंतर प्रथमच आली आहे. फिडल कास्ट्रो यांचे बंधू राउल यांनी राजीनामा दिल्यावर मिगुएल दियाज-कानेल हे तेथील सर्वोच्च नेते बनले आहेत. नाजूक आर्थिक स्थितीबरोबरच इतर अनेक बाबतीत त्यांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. राउल कास्ट्रो यांनी क्‍यूबातील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीसपद … Read more

आंदोलक रुळावर असतानाच सुपरफास्ट रेल्वे आली अन्; झालं असं काही कि…

औंरंगाबाद – कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच असून देशभरात आज ‘रेल्वे रोको’ची हाक देण्यात आली आहे. याला पाठिंबा देण्यासाठी देशभरात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. अशातच औरंगाबाद येथे सुदैवाने मोठा अनर्थ टळला. औरंगाबादेत कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते रेल्वे रोको आंदोलनासाठी लासूर स्थानकाजवळ जमा झाले होते. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्ते … Read more

नेपाळमध्ये उलथापालथ; कम्युनिस्ट पार्टीच्या नेतेपदी प्रचंड यांची निवड

काठमांडू – नेपाळ कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष पुष्प कमल दहाल प्रचंड यांची आज सत्तारुढ पक्षाचे नवीन संसदीय नेते म्हणून निवड करण्यात आली. पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांच्या जागेवर प्रचंड यांची निवड करण्यात आली. प्रचंड यांच्या नावाची शिफारस पक्षाचे ज्येष्ठ नेते माधव कुमार नेपाळ यांनी केली. प्रचंड यांच्या गटाची बैठक न्यू बाणेश्‍वर येथील संसद भवनाच्या इमारतीत झाली. … Read more