पुणे : अटी शिथिल करून सरसकट शिष्यवृत्ती द्यावी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र पुणे – राज्‍य सरकारने बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या माध्यमातून पीएच.डी. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना अटी शिथिल करून सरसकट शिष्यवृत्ती देण्याची गरज आहे, असे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले आहे. राज्यातील संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी … Read more

पुणे जिल्हा : दूधाचे पाच रुपये अनुदान अटी, शर्तीत अडकणार

मूळ उत्पादक राहणार वंचित वडापुरी : गाय दुधासाठी प्रतिलिटर किमान 29 रुपये दर देणार्‍या दूध संघांनाच राज्य शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. अटी, शर्तीमुळे दूध पुरवठा करणारे हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार आहेत. गाय दुधाला दर मिळावा, यासाठी राज्यभर आंदोलन झाले. विविध पक्ष, संघटनांनी रस्ता रोको, दूध टँकर अडवून दूध उत्पादकांना न्याय मिळवून … Read more

‘पैसे असतील, तरच जागा मिळेल; अन्यथा पेशंटला दुसरीकडे न्या’; अंगावरील कपडे, राहणीमान पाहूनच रुग्णाला एंट्री

सागर येवले पुणे -“अंगावर कपडे साधे आहेत. त्यामुळे हे पैसे भरू शकणार नाहीत,’ असा अंदाज येताच “आयसीयू फुल्ल आहे, तुम्ही पेशंट शिफ्ट करा’… असा सल्ला एका मोठ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना दिला. पण, “त्याचे हेल्थ “इन्श्‍युरन्स आहे. “पैसे भरू शकतो,’ म्हटल्यावर अवघ्या तासाभरात आयसीयू बेड तयार झाला. असा भीषण अनुभव बड्या खासगी रुग्णालयांत हमखास येतो. … Read more

रविकांत तुपकर यांच्यसह सर्व सहकाऱ्यांना अटी-शर्थींसह जामीन मंजूर

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह इतर सहकाऱ्यांना बुलढाणा न्यायालयाने दिलासा दिला आहे. तुपकरांसह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना नायालायानं अटी-शर्थींसह जामीन मंजूर केला असल्याचे सांगण्यात येत आहे. तुपकरांसह 25 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. हे सर्वजण अकोला न्यायालयीन कोठडीत असून आज संध्याकाळी या सर्वांची सुटका होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कापूस आणि सोयाबीन … Read more

पुणे जिल्हा : सभासद होण्यासाठी अटी बदलल्याने प्रचंड गोंधळ

शिक्रापूर सोसायटीची वार्षिक सभा वादळी : पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने वातावरण निवळले शिक्रापूर – येथील विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या वार्षिक सभेत सोसायटी सभासद होण्यासाठी अटीत केलेल्या बदलाच्या मुद्‌द्‌यावर वादळी चर्चा होत प्रचंड गोंधळ झाला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने तणावपूर्ण वातावरण निवळले. शिक्रापूर येथील सोसायटीची वार्षिक सभा नुकतीच आयोजित केली होती. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय मांढरे, उपाध्यक्ष जालिंदर … Read more

राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती

मुंबई – राज्यात मुंबईसह ठिकठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. मुंबईत काल संध्याकाळपासून ढगाळ वातावरण कायम आहे, तर अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत. मुंबईला पाणी पुरविणाऱ्या सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. मुंबई शहर, पूर्व उपनगर आणि पश्‍चिम उपनगरात जोरदार पावसाची नोंद झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. आज … Read more

अटी, शर्तीवर व्यापारपेठ सुरू

भवानीनगर (वार्ताहर) – भवानीनगर परिसरामध्ये सोमवार (दि. 13) पासून सकाळी 10 ते सायंकाळी पाचपर्यंत दुकाने खुली ठेवण्यात आली. बैठकीत ठरलेल्या अटी, शर्तीनुसार व्यापाऱ्यांनी आज आर्थिक उलाढाल केली आहे. व्यापाऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी माजी उपसरपंच अभयसिंह निंबाळकर, नानासाहेब निंबाळकर, सामाजिक कार्यकर्ते धनंजय गायकवाड, विक्रम निंबाळकर यांच्या उपस्थितीत व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. … Read more

आयपीएल स्पर्धेसाठी शाहरूखच्या अटी…

मुंबई – आयपीएल स्पर्धा कोणत्याही परिस्थितीत होणार असे मत बीसीसीआयने व्यक्‍त केल्यानंतर संघमालकांनी आनंद व्यक्‍त केला असला तरीही कोलकाता नाइट रायडर्सचा सहमालक व प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खान याने ही स्पर्धा खेळविण्यासाठी तीन अटी ठेवल्या आहेत. आता यावर बीसीसीआय काय मत व्यक्‍त करेल याकडे लक्ष लागले आहे. करोनामुळे आयपीएल स्थगित करावी लागली होती. ही स्पर्धा मूळ … Read more

आजपासून देशभरात दुकानं उघडणार;केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले  आहे. यामुळे देशभरात दुकानं, मॉल्स बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु शुक्रवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतला. काही अटींसह सरकारने आता दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता दुकानदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दुकानांना जरी परवानगी देण्यात आली असली तरी मॉल्स मात्र बंद … Read more