“विरोधकांच्या एकजुटीमुळे भाजप गोंधळून गेला आहे’ – नितीशकुमार यांचा दावा

पाटणा – विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडी तर्फे 2 ऑक्‍टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त देशव्यापी कार्यक्रम घेतले जाणार आहेत अशी माहिती बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज येथे दिली. इंडिया आघाडीच्या मुंबईच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तथापि या कार्यक्रमांचा तपशील मात्र त्यांनी जाहीर केलेला नाही. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए विरोधकांच्या एकजुटीने गोंधळून गेला आहे आणि … Read more

रणजी करंडक स्पर्धेबाबत अद्याप संभ्रमच

मुंबई – देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील सर्वात मानाच्या रणजी करंडक स्पर्धेलाही करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे फटका बसला असून यंदा ही स्पर्धा होणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली अजूनही रणजी करंडक स्पर्धा घेण्याच्या तयारीत आहेत. मात्र, सध्याच्या परिस्थितीत ही स्पर्धा घेणे अशक्‍यच असल्याचे मत अनेक सदस्यंनी व्यक्त केल्यामुळे आता येत्या रविवारी हौत असलेल्या … Read more

#AUSAvIND : पंतच्या शतकाने निवड समिती संभ्रमात

सिडनी – ऑस्ट्रेलियाच्या ‘अ’ संघाविरुद्धच्या सामन्यात आक्रमक शतकी खेळी केलेल्या ऋषभ पंतमुळे आता निवड समितीसमोर संभ्रम निर्माण झाला आहे. यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी अंतिम 11 खेळाडूंची निवड करताना पहिल्यापासूनच वृद्धिमान साहा याच्या नावाची चर्चा होती. मात्र, आता पंतने शतकी खेळी केल्यामुळे या दोघांपैकी कोणाची निवड करायची आसा प्रस्न समितीसमोर निर्माण झाला आहे.  भारत व … Read more

सरावाबाबत बीसीसीआय अद्याप संभ्रमात

मुंबई – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेटपटूंसाठी सराव शिबिराचे आयोजन करणार असल्याचे जाहीर केले असले तरीही याबाबत सरकार परवानगी देणार का असा प्रश्‍न पडलेला असल्याने अद्याप संभ्रम कायम राहिला आहे. देशात करोनाचा धोका वाढल्याने मार्च महिन्यातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका रद्द करण्यात आली. त्यानंतर आयपीएल स्पर्धा अनिश्‍चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आली. आता देशात लॉकडाऊन … Read more

बॅकलॉगचे विद्यार्थी संभ्रमात

पुणे -पदवी व पदव्युत्तरच्या अंतिम वर्ष आणि सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांची काही विषय राहिले आहेत. त्यांची परीक्षा होणार की नाही, याविषयी काहीच स्पष्टता नाही. त्यामुळे बॅकलॉगचे विद्यार्थी संभ्रमात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेत विद्यार्थ्यांना दिलासा दिला. परंतु, … Read more

बाजारपेठ गोंधळली

लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता येणार हे नक्‍की असले तरी 3 मेपर्यंत रात्री उशीरापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी कोणताही आदेश काढला नव्हता. रात्री उशीरा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढला. त्यात कन्टेमेंट झोन वगळता जिल्हा प्रशासनाकडून सर्व दुकाने सुरू सोमवारपासून सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे मात्र मुलत्वांचे पालन करणे बंधनकारक असून, एकल दुकानेच फक्त सुरू करता येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात … Read more

विठुरायाच्या सशुल्क ऑनलाईन दर्शनावरून गोंधळ

पंढरपूर : पंढरपूरच्या विठुरायाचे ऑनलाईन दर्शन सशुल्क करण्यासाठी शनिवारी (8 फेब्रुवारी) बोलावलेल्या बैठकीत काही राजकीय पक्ष आणि संघटनांचे प्रतिनिधी आल्याने वारकरी महाराज आणि या मंडळीत जोरदार बाचाबाची झाल्याने विठ्ठल मंदिरात आज अभूतपूर्व गोंधळ झाला. यानंतर या निर्णयाला विरोध करीत महाराज मंडळींनी बैठकीवर बहिष्कार टाकत बाहेर पडल्याने हा विषय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एक वर्षांपूर्वी मंदिर … Read more