Pune news : राष्ट्रीय धोरणातील संभ्रम दूर करा..; राजेश पांडे यांची अपेक्षा

पुणे – यंदाच्‍या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कसे राबवायचे, याबाबत संस्‍थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्‍या पार्श्वभूमीवर धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विद्यापीठाने पाऊले उचलावीत, अशी अपेक्षा माजी व्‍यवस्‍थापन परिषद सदस्‍य राजेश पांडे यांनी व्‍यक्‍त केली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे केंद्र … Read more

नगर : जिल्हा परिषदेची नोकरभरती स्थगित ; उमेदवारांमध्ये संभ्रम

13 संवर्गाची परीक्षा अजूनही बाकी । प्रतीक्षा पुढील वेळापत्रकाची नगर  – बहुप्रतीक्षेनंतर एकदाची जिल्हा परिषदेची नोकर भरतीची प्रक्रिया सुरू झाली होती. सहा संवर्गाच्या ऑनलाइन परीक्षा देखील झाल्या होत्या. असे असतांना अचानक ही प्रकीया स्थगित करण्यात आल्याने आता उर्वरित संवर्गाच्या परीक्षा होणार की नाही. तसेच संपूर्ण जिल्हा परिषद नोकरभरतीच रद्द होणार यासारखे प्रश्‍न उमेदवारांना पडू लागले … Read more

पुणे जिल्ह्यात जलजीवन नळ योजनेबाबत संभ्रम

गावागावांत वीजबिल, कर्मचारी, देखभाल दुरुस्ती कोण करणार? मंचर – सध्या अनेक गावांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून जलजीवन नळ योजनेचे काम धडाकेबाज सुरू आहे; परंतु भविष्यात ग्रामपंचायतीने जलजीवन नळ योजना चालवायची कशी, वीजबिल, कर्मचारी, देखभाल दुरुस्ती, करायची कशी, हा प्रश्‍न गावोगावाच्या स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांमध्ये निर्माण झाला असून, त्यांच्यात याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. केंद्र सरकारच्या वतीने प्रत्येक … Read more

‘अल्लाह आणि ओम एक…’ या विधानावरून जमियत उलेमा-ए-हिंदच्या मंचावर गोंधळ

नवी दिल्ली – दिल्लीतील रामलीला मैदानावर जमियत उलेमा-ए-हिंदच्या अधिवेशनात मंचावर गोंधळ झाला. मौलाना महमूद मदनी यांनी मोहन भागवत यांच्यावर टीका करत अल्लाह आणि ओम एक असल्याचे सांगितले, त्यावर जैन गुरु लोकेश मुनी यांनी आक्षेप घेतला, त्यानंतर जैन आणि इतर अनेक धर्मगुरू मंचावरून निघून गेले. जमियत उलेमा-ए-हिंदच्या 34 व्या अधिवेशनात मौलाना अर्शद मदनी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक … Read more

संजय राऊत यांच्या ‘त्या’ वक्तव्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी संभ्रमात

मुंबई – बंडखोरांनी 24 तासांत मुंबईत परत यावे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर भूमिका मांडावी. त्यांच्या मागणीवर विचार केला जाईल, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले. त्यामुळे बंड शमवण्यासाठी शिवसेना प्रसंगी महाविकास आघाडीबाहेर पडण्यास तयार असल्याचे चित्र समोर आले. साहजिकच, राऊत यांचे वक्तव्य कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दृष्टीने धक्कादायक ठरले. ते वक्तव्य कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या … Read more

सरकारच्या निर्यातबंदीच्या निर्णयाने गोंधळ; महाराष्ट्रातीलही ट्रक गुजरातमधील बंदरावर अडकली

अहमदाबाद,- गुजरातमधील कांडला बंदरावर सुमारे 4 हजार गव्हाचे ट्रक चार दिवसांपासून उभे आहेत. जहाजांमध्ये गहू उतरवण्याची परवानगी मिळण्याची प्रतीक्षा त्यांना आहे. त्या ट्रकमध्ये काही महाराष्ट्रातीलही आहेत. सलग तीन दिवसांच्या सुटीमुळे संबंधित अधिकाऱ्यांकडून गहू उतरवण्याची परवानगी मिळू शकली नाही. अशातच केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली. त्यामुळे ट्रकमधून जहाजांवर गहू उतरवण्याबाबत आणखीच संभ्रम निर्माण झाला. संबंधित … Read more

Pune : हरकतींबाबतच शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

खडकवासला –“पीएमआरडीए’ने शेतकऱ्यांनी डीपीवर हरकती व सूचना नोंदवल्या आहेत. या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहे; परंतु हरकती व सूचना घेत असताना त्यावर कोणताही नोंदणी क्रमांक दिलेला नाही. फक्‍त तारीख टाकून कार्यालयाकडून स्वीकारण्यात आली, त्यानंतर साधारणत: एक वर्षभरानंतर यावर सुनावणी होत असल्याने ज्या नोटिसा पाठवलेल्या आहेत, त्यामध्ये सुद्धा आवक, जावक क्रमांक, हरकत नोंदवलेले आहेत, याचा … Read more

समुद्रात दोन हजार फूट खाली आढळला विचित्र जीव; माशाचा नवीन प्रकार की एलियन याबाबत संभ्रम

वॉशिंग्टन : एलियन म्हणजेच परग्रहवासी याबाबत जगात सर्वांनाच कुतूहल आहे. पण सर्वसाधारणपणे हे एलियन्स किंवा परग्रहवासी हे अंतराळातून कोणत्यातरी ग्रहावरून येतात असे मानले जाते. पण आता समुद्राखाली दोन हजार फूट खोल एक विचित्र जीव आढळला असून तो माशाचा प्रकार आहे का एलियन आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. परग्रहवासीयांना म्हणजेच एलियन्सना अद्याप कोणीही पाहिलेले नाही … Read more

फडणवीसांमुळेच नद्यांच्या पूररेषेचा गोंधळ : मेधा पाटकर

कोल्हापूर – देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच नद्यांच्या पूररेषेचा गोंधळ झाला असून नागरिकांना पुराचा फटका सहन करावा लागत आहे, अशी टीका पर्यावरण अभ्यासक आणि चळवळीतील कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी टीका केली आहे. त्या कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधत होत्या. मेधा पाटकर म्हणाल्या, पूररेषा आणि नदीची पाणीपातळी यामधील फरक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळाला नाही. त्यामुळे त्यांनी क्रेडाईने … Read more

#IPL2022 | सीव्हीसी समूहाबाबत संभ्रम वाढला

मुंबई –आयपीएल स्पर्धेच्या पुढील वर्षीच्या मोसमात दोन नवे संघ दाखल झाले आहेत. यातील अहमदाबादचा संघ सीव्हीसी समूहाने खरेदी केला आहे. मात्र, हा समूह ऑनलाइन बेटिंग व जुगार या प्रकारांशी जोडला गेल्याचे समोर आल्यावर बीसीसीआयचे धाबे दणाणले आहे. याची खातरजमा करूनच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे आता सांगण्यात येत आहे. दुबईत बीसीसीआयने या लिलावाचे आयोजन केले … Read more