जयराज ग्रुपतर्फे यशस्वी विद्यार्थांचा गौरव ! प्रशासक मधुकांत गरड यांचे मार्गदर्शन

  प्रभात वृत्तसेवा पुणे/मार्केटयार्ड, दि. 20 – शिक्षणामुळेच प्रगती होते. प्रतिकूल परिस्थितीत कष्ट करून विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रेरणादायी ठरेल, असे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी व्यक्त केले. “जयराज ग्रुप’तर्फे संस्थापक स्व. हिराभाई शहा (चोखावाला) यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाजातील गरजूंसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांतर्गत शहरातील कागद, काच, … Read more

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा झाल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले”अजून एका..”

मुंबई – एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी ठरले असून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. शिंदे यांच्या बंडानंतर ते भाजपसोबत सत्ता स्थापन करतील. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर त्यांचे  उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे असे अंदाज राजकीय वर्तुळात बांधले जात होते. मात्र फडणवीस यांनी आज याला छेद देत मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची नेमणूक … Read more

हर्षदाची सुवर्ण कामगिरी सर्वांसाठी अभिमानास्पद – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई :- जागतिक ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या पुण्याच्या हर्षदा गरुड हिचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. मावळमधील (जि. पुणे) हर्षदाने ग्रीस- हेराकिलॉन येथील स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम केला आहे. या स्पर्धेत भारताने यापुर्वी असे सुवर्णपदक जिंकले नव्हते. त्यामुळे हर्षदाने भारताच्या आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरेल अशी कामगिरी केली आहे. … Read more

हर्षदाच्या ‘सुवर्ण’ कामगिरीचा देशाला अभिमान – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई :- जागतिक ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या पुण्याच्या हर्षदा गरुड हिचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात, हर्षदाच्या सुवर्ण कामगिरीचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे. ग्रीस-हेरकिलॉन येथे झालेल्या जागतिक ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेत हर्षदाने देशासाठी पाहिले सुवर्णपदक जिंकले आहे. पुणे जिल्ह्यातील मावळमधील हर्षदाने देशाच्या … Read more

#महिलादिन2022 | महाराष्ट्राच्या घराघरातल्या माता-भगिनी-कन्यांना मान, सन्मान, सुरक्षितता देत आत्मनिर्भर करुया – उपमुख्यमंत्री

मुंबई  :- महाराष्ट्राच्या भूमीला राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या राष्ट्रवादाचा, महाराणी ताराराणींच्या शौर्याचा, क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या सत्यशोधक विचारांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या देदिप्यमान कर्तृत्वाचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्राच्या स्त्रीशक्तीचा गौरवशाली वारसा पुढं नेण्याचं काम राज्यातल्या माता, भगिनी, कन्यांनी समर्थपणे केलं आहे. शेती, शिक्षण, उद्योग, व्यापार, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, संरक्षण अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्रकन्या आज आपलं कर्तृत्वं सिद्ध करत … Read more

राष्ट्रीय ‘नारी शक्ती पुरस्कार’ विजेत्यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

मुंबई :- राष्ट्रीय स्तरावरील ‘नारी शक्ती पुरस्कार’ विजेत्या महाराष्ट्रातल्या तीन महिलांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. आंतरराष्ट्रीय महिलादिनी उद्या (8 मार्च) या तिघींसह देशातील 29 महिलांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. या पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या दिव्यांग कथक नर्तिका सायली नंदकिशोर आगवणे, पहिल्या महिला सर्पमित्र वनिता जोगदेव बोराडे आणि सामाजिक उद्योजिका कमल कुंभार यांचा … Read more

#RepublicDay | भारतीय 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या उपमुख्यमंत्री पवारांकडून शुभेच्छा

मुंबई :- देशाच्या स्वातंत्र्यासाठी तसेच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित ठेवण्यासाठी प्राणांचं बलिदान केलेल्या शहीद वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केलं असून देशवासियांना प्रजासत्ताकाच्या 73 व्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ‘विविधतेत एकता’ ही आपली ताकद असून जात, धर्म, भाषा, पंथ, प्रांताच्या भिंती ओलांडून समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी एकत्र येण्याचं आणि एकजूट कायम ठेवण्याचं … Read more

राष्ट्रपती पदक व अग्निशमन सेवा पदक विजेत्यांचे उपमुख्यमंत्र्याकडून अभिनंदन

मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या 42 अग्निशमन सेवा पदकांपैकी महाराष्ट्राला सात पदकं मिळाली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अग्निशमन पदक विजेत्यांचे तसेच राज्यातील सर्व अग्निशमन अधिकारी, कर्मचाऱ्यांचे त्याबद्दल अभिनंदन केले आहे. सर्वोत्कृष्ट अग्निशमन सेवेसाठीचे ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ अग्निशमन रक्षक बाळु देशमुख यांना मरणोत्तर आणि मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांना … Read more

…महाराष्ट्राला आपला सार्थ अभिमान! मुख्यमंत्री ठाकरेंकडून राष्ट्रीय पदक विजेत्यांचे अभिनंदन

मुंबई  : भारतीय प्रजासत्ताकदिनाच्या औचित्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक दलातील कामगिरीसाठी पदक विजेत्यांची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्र पोलीस दलाने 7 शौर्य पोलीस पदक, 4 विशिष्ठ सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि 40 गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक पटकाविले आहे. तसेच महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील सात अधिकाऱ्यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. या सर्वांचे मुख्यमंत्री उद्धव … Read more

खोखो चळवळीची वाटचाल योग्य दिशेनं असल्याचं सलग 7 व्या विजेतेपदांमुळे पुन्हा एकदा सिद्ध – उपमुख्यमंत्री

मुंबई  :- भुवनेश्वर येथे झालेल्या 40 व्या कुमार-कुमारी राष्ट्रीय खोखो स्पर्धेत सलग सातव्यांदा अजिंक्यपद मिळवलेल्या महाराष्ट्राच्या कुमार आणि कुमारी या दोन्ही संघांचं, तसंच कुमारी गटात उपविजेत्या ठरलेल्या कोल्हापूर संघाचं उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केलं आहे. महाराष्ट्राच्या खोखो संघांनी मिळवलेल्या यशानं राज्यातील खोखो चळवळीची वाटचाल योग्य दिशेनं सुरु असल्याचे सिद्ध … Read more