कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद कोरोना पाॅझिटिव्ह

नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे. सध्या ते आपल्या घरातच विलगीकरणात असून उपचार घेत आहेत. I have tested positive for COVID-19. I am in home quarantine. Those who came in contact with me in last few days may … Read more

मणिपूरच्या कॉंग्रेस नेत्याला सीबीआयचे समन्स

  नवी दिल्ली- मणिपूरमध्ये सरकार स्थापनेचा दावा करणारे कॉंग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री ओ इबोबिसिंग यांना सीबीआय चौकशीचे समन्स जारी करण्यात आले आहेत. सन 2009 ते 2017 या अवधीत मणिपूर डेव्हलपमेंट सोसायटीत झालेल्या 332 कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर हे समन्स जारी करण्यात आले आहेत. त्यांच्या चौकशीसाठी सीबीआयचे पथक इम्फाळला पोहचले असून ते बुधवारी … Read more

शशी थरूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

नवी दिल्ली : केरळची राजधानी तिरुवनंतपूरम येथील स्थानिक न्यायालयाने कॉंग्रेस नेते, खासदार शशी थरूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केला आहे. शशी थरूर यांनी त्यांच्या एका पुस्तकातून हिंदू महिलांचा अवमान केल्याचा आरोप आहे. परिणामी थरूर पुन्हा अडचणीत सापडले आहेत. शशी थरूर यांनी त्यांच्या एका पुस्तकातून हिंदू महिलांचा अवमान केल्याचा आरोप असून याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल … Read more

कॉंग्रेसच्या नेत्यांनी दिल्या ‘प्रियंका चोप्रा जिंदाबाद’च्या घोषणा

उपस्थितांसह कॉंग्रेसच्या नेत्यांनाही हसू अनावर नवी दिल्ली : दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कॉंग्रेसच्या एका सभेमध्ये कॉंग्रेसच्याच नेत्यांनी अभिनेत्री प्रियंका चोप्रा जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. सोनिया गांधी जिंदाबाद कॉंग्रेस पार्टी जिंदाबाद राहुल गांधी जिंदाबाद प्रियंका चोप्रा जिंदाबाद अशा घोषणा कॉंग्रेसचे नेते सुरेंद्र कुमार यांनी या घोषणा दिल्या. कुमार यांनी चूकून प्रियंका गांधींच्या नावाऐवजी … Read more

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन

नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन झाल्याचं वृत्त नुकतंच हाती येतंय. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांच दीर्घआजाराने निधन झाले आहे. दीर्घकाळापासून त्या आजारी होत्या. दिल्लीमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी त्या ८१ वर्षांच्या होत्या. प्रकृती अस्वस्थतेच्या कारणामुळे आज सकाळीच त्यांना दिल्लीच्या एस्कॉर्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं … Read more

निकालांमुळे कॉंग्रेस जिल्हाध्यक्षाचा हृदयविकाराने मृत्यू

भोपाळ – मध्य प्रदेशमधील सिहोर येथे निवडणूक निकाल बघताना कॉंग्रेसच्या जिल्हा अध्यक्षाचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. रतनसिंह ठाकूर असे त्यांचे नाव असून ते निवडणूक निकाल बघण्यासाठी मतमोजणी केंद्रात आले होते. पण अचानक ते बेशुद्ध झाले व खुर्चीवरून खाली कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर … Read more

कॉंग्रेस नेते शशी थरूर यांना मर्यादित काळासाठी परदेशात जाण्याची न्यायालयाकडून परवानगी

नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते शशी थरूर यांना परदेशात जाण्याची परवानगी स्थानिक न्यायालयाने दिली आहे. शशी थरूर यांना 5 ते 20 मेपर्यंत अमेरिकेत जाण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी शशी थरूर यांच्यावर कलम 498-अ आणि 306 नुसार आरोप करण्यात आला आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, शशी … Read more

प्रचारावेळी कॉंग्रेस उमेदवार शशी थरूर जखमी

थिरुअनंतपुरम – प्रचार चालू असताना केरळमधील थिरुअनंतपुरम येथील मंदिरात पूजा करताना कॉंग्रेस नेते शशी थरूर जखमी झाले असून त्यांच्या डोक्‍याला इजा झाली आहे. त्यांच्या डोक्‍याला सहा टाके पडले आहेत. सध्या त्यांची प्रकृती धोक्‍याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान जखमी अवस्थेतील शशी थरृर यांचा फोटो समोर आला असून पिवळा कुर्ता घातलेला दिसत आहे. त्याच्या कुर्त्यावर रक्‍ताचे … Read more