Lok Sabha Election 2024 | घोषणापत्राला मंजुरीसाठी कॉंग्रेसची उद्या बैठक; उमेदवारांच्या नावावरही शिक्कामोर्तब होणार

Lok Sabha Election 2024 | कॉंग्रेसमध्ये निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था असलेल्या कार्यकारीणीची उद्या म्हणजे मंगळवारी बैठक होणार असून त्यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या पक्षाच्या घोषणापत्रावर चर्चा करून त्याला अंतिम मंजुरी दिली जाणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली १९ आणि २० तारखेला बैठक होणार आहे. त्यात १९ एप्रिलपासून सात टप्प्यांत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या … Read more

काँग्रेसच्या बैठकीला 7 आमदारांची दांडी ! आमदारांच्या गैरहजेरीबाबत नाना पटोले म्हणतात..

मुंबई – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या आज झालेल्या बैठकीत ७ आमदारांनी दांडी मारली. यात चव्हाण यांचे समर्थक असणाऱ्या नांदेडच्या ३ आमदारांचा समावेश आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही अनुपस्थित आमदारांनी आपल्या गैरहजेरीचे कारण आपल्या कानावर घातल्याचा दावा केला आहे. काँग्रेसने राज्यसभेसाठी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली … Read more

कॉंग्रेस आपल्या कामाची चर्चा करत नाही ! बैठकीत नितीश कुमार यांनी केली टीका

नवी दिल्ली- बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीश कुमार यांनी कॉंग्रेसवर टीका केली आहे. जातीच्या आधारावर जनगणना आणि आरक्षाच्या मुद्द्यवर बोलताना त्यांनी कॉंग्रेस पक्ष आपल्या कामाची चर्चा करत नाही असे म्हटले आहे. तसेच त्यांनी यावेळी भारतीय जनता पार्टीलाही लक्ष्य केले. हा पक्ष आपले कामही त्यांच्या कामात जोडून घेतो असा दावा त्यांनी केला. … Read more

Congress मीटिंगमध्ये CM भुपेश बघेल खेळत होते कँडी क्रश गेम ! भाजपने फोटो व्हायरल करताच म्हणाले..

नवी दिल्ली – छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (CM Bhupesh Baghel) उमेदवारांच्या निवडीबाबत आयोजित करण्यात आलेल्या कॉंग्रेसच्या बैठकीत त्यांच्या मोबाइल फोनवर गेम खेळण्यात व्यस्त होते असा फोटो भाजप आयटीसेलने व्हायरल केला आहे. (bjp it cell) राज्यात आता कॉंग्रेस जिंकणार नाही याची खात्री झाल्यानेच त्यांचा अशा बैठकांमधला रस संपला आहे अशी टिप्पणी भाजपने (bjp) केली आहे. तथापि … Read more

आमदार थोपटे यांच्यावर लातूरची जबाबदारी ; प्रदेश कॉंग्रेसच्या बैठकीत पक्षनिरीक्षकपदी निवड

भोर – महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीतर्फे लातूर लोकसभा मतदारसंघाचे पक्ष निरीक्षक म्हणून भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. लातूर येथील प्रदेश कॉंग्रेसची स्वानंद मंगल कार्यालयाच्या सभागृहात बैठक झाली. यावेळी आमदार संग्राम थोपटे यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावेळी आमदार संग्राम थोपटे यांचा लातूर कॉंग्रेसतर्फे सन्मान करण्यात आला. बैठकीत लातूर लोकसभा … Read more

कॉंग्रेसच्या बैठकीत राडा; डीएमकेचा झेंडा फडकवल्याने कार्यकर्त्यांमध्येच हाणामारी

पदुच्चेरी  – पदुच्चेरीत कॉंग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये आज जोरदार राडा झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी कॉंग्रेस प्रचार समितीची बैठक होती. या बैठकीत एका नेत्याने डीएमके पक्षाचा झेंडा फडकवल्याने गोंधळ सुरू झाला. यावेळी पदुच्चेरीचे माजी मुख्यमंत्री व्ही नारायणस्वामी देखील उपस्थित होते. कॉंग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीसाठी कार्यालयाच्या बाहेर अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी देखील तैनात करण्यात आले … Read more

दिल्लीत काँग्रेसच्या सल्लागार कमिटीची बैठक  

जनधन खात्यात ७ हजार ५०० रुपये जमा करण्याची मागणी नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात ३ में पर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी काँग्रेसच्या सल्लागार कमिटीची बैठक झाली. यावेळी बैठकीत कोरोना विषाणूसंदर्भात चर्चा करण्यात आली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी सांगितले कि, बैठकीत … Read more