पुणे जिल्हा : ग्राहकांची लूट थांबवण्यासाठी एमआरपी कायदा रद्द करावा – बाळासाहेब औटी

मंचर – भारत सरकारने १०९० मध्ये एमआरपी पॅकेजवर कमाल विक्री किंमत ही मुद्रित करण्यासाठी बंधनकारक करून कायदा केला. या कायद्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूट होत असून भारत सरकारने हा कायदा रद्द करावा व वस्तूवर विक्री किंमतबरोबर प्रथम वस्तू उत्पादन किंमत व त्याखाली विक्री किंमत टाकावी.तसेच नवीन निवडून आलेल्या संसद सदस्यांना याबाबत ग्राहक पंचायत निवेदन देणार … Read more

पुणे जिल्हा: भाजीपाल्यांचे बाजारभाव वधारले; महागाईने वाल्हे बाजारात ग्राहक हैराण

वाल्हे – पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील मंगळवार (दि.26)च्या आठवडे बाजारामध्ये मार्गशीर्ष महिन्यामुळे, तसेच पाण्याअभावी कमी प्रमाणात उत्पादन होत असलेला भाजीपाल्यांचे बाजारभाव वधारले होते. यावर्षी, मान्सूनपूर्व व मान्सून व परतीचा पाऊस पडला नव्हता. यामुळे वाल्हे व परिसरातील अनेक वाड्या-वस्त्यांवर पावसाळ्या पासूनच टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यामुळे पिण्यासाठीच पाणी उपलब्ध नसल्याने, शेतातील पिके करपून गेली आहेत. पाण्याअभावी … Read more

ग्राहकांना CNGचा सुरळीतरित्या पुरवठा करावा – अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई :- ग्राहकांना सीएनजी (क्रॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) या इंधनाचा नियमितपणे पुरवठा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी खबरदारी घेण्याच्या सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे दिल्या. मंत्रालयात आयोजित सीएनजी पुरवठ्याबाबतच्या आढावा बैठकीत मंत्री चव्हाण यांनी संबंधितांना निर्देश दिले. यावेळी विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, वितरक प्रतिनिधी … Read more

सरकारने दिलेल्या सवलती ग्राहकांपर्यंत पोहचवा; बांधकाम व्यावसायिकांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन

ठाणे – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांधकाम व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी आणि बाजाराला चालना देण्यासाठी वाळूच्या किमतीवरील कॅपसह सरकारने अनेक लाभ दिले आहेत, हे लाभ बांधकाम व्यावसायिकांनी घर खरेदीदारांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये शुक्रवारी रात्री एमसीएचआय-क्रेडाई मालमत्ता प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. बांधकाम व्यावसायिकांना राज्य सरकारने अनेक लाभ देऊ … Read more

ग्राहकांना औषधे योग्य दरात मिळावीत; औषधविक्रेत्यांच्या अडचणीही सोडविणार – मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

मुंबई  : ग्राहकांना योग्य दरात औषधे मिळावीत, त्यांना आरोग्याच्या सेवा मिळाव्यात त्याचप्रमाणे या सेवा पुरविणाऱ्या औषध विक्रेत्यांनाही न्याय मिळावा ही शासनाची भूमिका आहे, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. परवानाधारक औषध विक्रेते यांच्याविरुद्ध करण्यात येणाऱ्या कारवाईबाबत व घाऊक औषध विक्रेत्यांच्या तपासणी अनुषंगाने मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत … Read more

फळभाज्यांचे भाव घटल्याने खरेदीस सुगीचे दिवस; वाचा ताजे बाजारभाव

पुणे – मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. त्या तुलनेत मागणी कमी असल्याने कांदा, आले, फ्लॉवर, कोबी, वांगी आणि सिमला मिरचीच्या भावातही घट झाली आहे. तर बटाट्याच्या भावात मात्र वाढ झाली असून, मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड … Read more

घरगुती वीजग्राहकांना जूनमधील वीज बिल भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची पत्रकार परिषदेत माहिती मुंबई : लॉकडाऊनच्या कालावधीनंतर सध्या मीटर रिडींग घेऊन जून महिन्याचे वीजबिल देण्यात येत आहे. महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांना या वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत उपलब्ध आहे व स्थानिक कार्यालयांकडून वीजबिलांचे सुलभ हप्ते पाडून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली. महावितरणच्या फोर्ट येथील … Read more

ग्राहकांना न्याय देणारी ग्राहक मंचही 8 जूनपासून सुरू…

पुणे(प्रतिनिधी) – शिवाजीनगर, कौटुंबिक न्यायालयानंतर आता ग्राहक मंचाचे कामकाजही येत्या सोमवारपासून (दि. 8) सुरू होणार आहे. राज्यात रेड झोनमधील जिल्ह्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे तर उर्वरित सर्व जिल्हात नियमितपणे काम चालणार आहे. राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष ए.पी.भंगळे यांनी याबाबत आदेश काढला आहे. त्यामुळे ग्राहकांची न्यायासाठी सुरू असलेली प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. खरेदी केलेल्या वस्तुबाबत फसवणूक झाल्यास ग्राहकांना … Read more

चॅनेलबाबतचे निर्णय ग्राहकांच्या हितासाठी घेतल्याचा “ट्राय’चा दावा

मुंबई : दूरचित्रवाणी वाहिनीच्या दरांमध्ये पारदर्शकता आणि समानता निर्माण करण्यासाठीच सुधारित दर लागू करण्यात आले आहेत. नवीन दरांसंदर्भात ट्रायने घेतलेला निर्णय योग्य असून हा निर्णय ग्राहकांच्या हिताचाच आहे, असा दावा भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने आज मुंबई उच्च न्यायालयात केला. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणच्या (ट्राय) वतीने जारी करण्यात आलेल्या निर्देशानुसार टीव्ही चॅनेल्सना नवे सुधारित दर जाहीर … Read more

ऑनलाइन खरेदीमध्ये ग्राहकांनी दक्ष राहावे : पठारे

राहुरी – दुर्दैवाने शिकलेली माणसे आर्थिक व्यवहार करताना अधिक प्रमाणावर फसत आहेत. त्या मानाने अडाणी माणसे विचारपूर्वक व्यवहार करीत आहेत. इंटरनेटच्या जमान्यात ऑनलाइन खरेदी व्यवहार वाढले आहेत. तसेच त्या व्यवहारातील फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. ग्राहकांनी अधिक दक्ष राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजीराव पठारे यांनी व्यक्त केले. राहुरी … Read more