अहमदनगर – कंत्राटी भरतीचा निर्णय घेणाऱ्या महाविकास आघाडीचा निषेध

नगर – राज्यात कंत्राटी भरतीचा निर्णय तत्कालीन कॉंग्रेस – राष्ट्रवादी सरकारने आणि त्या नंतर महाविकास आघाडी सरकारने घेऊन राज्यातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे महापाप केल्याचा आरोप करत भाजपच्या वतीने शनिवारी (दि. 21) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत निषेध नोंदवला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, कंत्राटी भरतीचे संपूर्ण पाप हे … Read more

सत्ताधाऱ्यांचे आंदोलन; विरोधकांचा जल्लोष, कंत्राटी नोकरभरती आदेश रद्द प्रकरण

पुणे – राज्याचा प्रशासकीय कारभार हाकण्यासाठी शासनाने काढलेल्या कंत्राटी भरतीचा आदेश रद्द करण्यात आला आहे. या रद्द करण्यात आलेल्या आदेशाचे पडसाद पुण्यातही दिसून आले. हा आदेश भाजपने रद्द केला असला तरी हा निर्णय महाविकास आघाडीच्या काळात घेण्यात आला असल्याचे सांगत भाजपकडून शहरात आंदोलन करण्यात आले. तर, राज्यात वर्सभरापूर्वी सत्तेत आलेल्या महायुतीच्या सरकारला या आदेशावरून महाविकास … Read more

Devendra fadnavis”त्यांचं पाप आमच्या माथी नको”; फडणवीसांकडून कंत्राटी भरतीच्या आरोपांवर सडेतोड उत्तर

Devendra fadnavis : राज्यात कंत्राटी पोलीस भरतीवरून मविआच्या नेत्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका करत पोलीस विभागाच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याच आरोपांना उत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठा निर्णय जाहीर केला. त्यानुसार शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केला आहे. जीआर रद्द करतेवेळी फडणवीसांनी मविआ नेत्यांवर … Read more

तहसीलदार कंत्राटीबाबत सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका

पुणे – भाजपाला या महाराष्ट्राचे नेमके काय करायचंय? आता तहसीलदार देखील कंत्राटी नेमण्याचा घाट या सरकारने घातला आहे, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा निर्णय घेताना रात्रंदिवस एक करून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात, त्या उमेदवारांचा तरी विचार करायला हवा होता, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार … Read more

शासनाचे कंत्राटीभरतीचा जीआर फाडला ; राजगुरूनगरात आपकडून धोरणांचा जाहीर निषेध

राजगुरूनगर   – खेड तालुका आम आदमी पक्षाच्या वतीने शासनाच्या कंत्राटीभरती धोरणाचा परिपत्रक फाडून केला जाहीर निषेध करीत परिपत्रक मागे घेण्याची मागणी केली आहे. शासनाने कंत्राटी पद्धतीने भरती संदर्भात 6 सप्टेंबर2023 रोजी शासकीय अध्यादेश (जी.आर.) काढून जाहीर केले आहे. त्यानुसार विविध पदावर शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, इत्यादींना कंत्राटी पद्धतीने भरती करणे बंधनकारक … Read more

कंत्राटदारांची घरे भरण्यासाठी शासनाकडून कंत्राट नोकरभरती

राष्ट्रवादी युवक अध्यक्षांचा आरोप : शिरूर तहसीलदारांना निवेदन रांजणगाव गणपती – कंत्राटदारांची घरे भरण्यासाठी शासनाने कंत्राटी पद्धतीने नोकरभरती सुरु करण्यासाठी खटाटोप चालला असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल अरुण गायकवाड यांनी केला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन शिरूर व शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना याबाबत निवेदन देण्यात आले … Read more

नोकरभरती विषयावरून पवार ‘वॉर’; अजितदादांचा नाव न घेता रोहित पवारांवर निशाणा

पुणे – “काही जण कारण नसताना मला ट्रोल करत आहेत. मी नेमके काय बोललो, अन्‌ कुठे बोललो, हे पाहा’, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कर्मचारी भरतीप्रश्‍नी नाव न घेता आमदार रोहित पवार यांचा समाचार घेतला आहे. दोनच दिवसांपूर्वी रोहित पवारांनी या प्रश्‍नावर सोशल मीडियाद्वारे नाव न घेता अजित पवारांवर निशाणा साधला होता. त्यामुळे दोन्ही पवारांत … Read more

पुणे : शासकीय पदांवर कंत्राटी नोकरभरती

पुणे – शासनावरील खर्च आटोक्‍यात ठेऊन पुरेसा निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शक्‍य असेल तेथे नवीन पदनिर्मिती न करता ही कामे बाह्ययंत्रणेकडून (आऊटसोर्सिंग) करून घेण्यात यावीत असा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. तिजोरीवरील खर्चाचा भार कमी करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने नोकरभरती करण्याच्या निर्णयास कर्मचारी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. राज्य शासनाच्या कायमस्वरूपी नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सुशिक्षित … Read more