कोपरगावात एकच दिवस शिस्त, रिकामटेकड्यांची पुन्हा बेशिस्त!

विनाकारण फिरणाऱ्यांना दंडूक्याची भाषा समजते कोपरगाव : कोपरगाव शहरात करोना विषाणूजन्य संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशावर व राज्यावर आलेले हे महासंकट टाळण्यासाठी व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी एकदिवसाची जनता कर्फ्यू जाहीर केला. कोपरगावकारांनी शासनाच्या आदेशाला शंभर टक्के प्रतिसाद देऊन स्वताःला कोंडून घेत शिस्तेचे पालन केले. पण दुसऱ्या दिवशी काही रिकामटेकड्या महाभागांनी विनाकारण रस्त्यावर, चौका-चौकात … Read more

कोरोनाचा वेल्ह्यात शिरकाव; वरसगांवमध्ये महिलेला लागण 

प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. वेल्हे(प्रतिनिधी)- वरसगांव (ता.वेल्हे) गोरडवाडी येथील अंगणवाडी सेविकेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित महिलेला स्थानिक संसर्ग झाल्याची भीती व्यक्त होत आहे. या महिलेने मार्चच्या पंधरवड्यात मुंबईतील वाशी येथे विवाह समारंभासाठी गेली होती. तिने मुंबईतील वाशी ते पुण्याजवळील वेल्हे तालुक्यातील वरसगांव येथे प्रवास केल्याचे आढळून आले आहे. कोरोनाने वेल्हे तालुक्यात शिरकाव केला … Read more

उत्तरप्रदेश सरकार 35 लाख मजुरांना देणार प्रत्येकी एक हजार रूपये

1 कोटी 65 लाख बांधकाम मजुरांना महिना भर रेशन फुकट लखनौ – करोना विषाणुच्या प्रादुर्भावाने अनेक ठिकाणचे व्यवहार बंद ठेवावे लागल्याने रोजंदारीवर काम करणाऱ्या मुजरांचे मोठेच हाल सुरू झाले आहेत या पार्श्‍वभूमीवर उत्तरप्रदेश सरकारने तेथील 35 लाख मजुरांना प्रत्येकी एक हजार रूपयांची मदत घोषित केली असून बांधकामावर असलेल्या 1 कोटी 65 लाख मजुरांना महिना भराचे … Read more

पहिली ते आठवीपर्यंतची परीक्षा रद्द : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आज आणखी तीन जणांची वाढ झाली आहे. राज्यात सध्या 52 कोरोनाबाधित असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. त्यानंतर आज राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागाची बैठक घेत शालेय परीक्षाबाबत महत्वाचे निर्णय घेतले आहेत. Maharashtra Education Minister: Exams for class 9th & 11th will be conducted after 15th April, 2020. … Read more

साताऱ्यात ‘त्या’ दोन्ही युवकांचे रिपोर्ट निगेटिव्ह

सातारा – परदेशातून प्रवास करून आलेल्या दोन तरुणांमध्ये करोनासदृश्य लक्षणे आढळून आले होती. यामुळे त्यांना सातारा जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्या दोघांचेही रिपोर्ट आता निगेटिव्ह आले आहेत. शारजाह (युएई) येथून प्रवास करुन आलेला सातारा जिल्ह्यातील २९ वर्षे वयाच्या युवकाला सर्दी व घसा दुखत असल्याने तसेच सौदी अरेबिया येथून प्रवास करुन … Read more

रेल्वे स्थानक, द्रुतगतीवरही ‘थर्मल स्कॅनर’

परदेश प्रवासाचा इतिहास असणाऱ्यांची होणार तपासणी पुणे – करोना बाधित देशातून आलेले प्रवासी नजरेतून सुटू नये, यासाठी पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस हायवे, जुना महामार्गाबरोबरच रेल्वे स्थानकावर “थर्मल स्कॅनर’ बसवण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून 50 थर्मल स्कॅनर मागवण्यात आले आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. करोना संसर्गग्रस्तांची संख्या वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाकडून विविध … Read more

महापालिकेत आजपासून पन्नास टक्के कर्मचारी

आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे आदेश; उघड्या दुकानांवर होणार कारवाई पिंपरी – करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेत शुक्रवार (दि.20) पासून केवळ 50 टक्के अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुटी दिली जाणार आहे. त्यातून अत्यावश्‍यक विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्याना वगळण्यात आले आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुरूवारी … Read more

खासगी कंपन्यांबाबत तक्रारींचा पाऊस

कारवाईचे अधिकार नसल्याने पालिकाही हतबल : जिल्हा प्रशासनाची भूमिका महत्त्वाची पुणे – अनेक कंपन्यांनी “वर्क फ्रॉम होम’चे आदेश दिले आहेत. मात्र, “आम्हाला रोज ऑफिसला बोलवतात..आम्हाला अजूनही बायेमेट्रिक हजेरी सुरू आहे. आम्हाला कोणीही सॅनिटायझर्स देत नाहीत. आमच्या ग्रुपने बैठका बोलवतात,’ अशा अनेक तक्रारी खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी महापालिका आयुक्तांसह आरोग्य विभागास केल्या आहेत. या कर्मचाऱ्यांनी कंपनीचे नाव … Read more

#Corona : उपनगरात बेफिकीरपणा…

पुणे – करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य शासनाने अनेक निर्णय घेतले असले तरी पुणे शहराच्या उपनगरातील नागरिकांना अद्याप त्याचे गांभीर्य दिसत नसल्याचे चित्र आहे. आज दिवसभर अनेक भागात पाहणी केली असता नागरिक बेफिकीरपणे फिरताना दिसत होते. नागरिक एकत्रित गप्पा मारत आहेत, फिरत आहेत. जणू काही सुट्टीचा आनंद घेताना प्रत्येकजण दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात करोना … Read more

#Corona_Effect : वाणेवाडीचा आठवडे बाजार बंद

सोमेश्वरनगर (विनोद गोलांडे) – करोनाच्या पार्श्वभूमीवर सोमेश्वरनगर (ता.बारामती) परिसरातील उद्यापासून (दि.२०) वाणेवाडी आठवडे बाजार भरणार नसल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, करोनाबाबत ग्रामीण भागात भीती असली तरी नागरिक योग्य ती दक्षता घेत आहे. सोमेश्वर नगर, कारखाना, वाणेवाडीची मुख्य बाजारपेठ असूनही ही ठिकाणे सध्या ओस पडली आहेत. प्रत्येकजण ‘करोना’च्या धास्तीने काम आटोपल्यानंतर घरात राहणे पसंत करीत … Read more