शिक्षण आयुक्‍तालयात बैठका होणार नाही

विनाकारण गर्दी करू नका : शिक्षण आयुक्‍तांचे आदेश जारी राज्यात अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना पुणे – करोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत राज्यातील अधिकारी, कर्मचारी, अभ्यागतांनी शिक्षण आयुक्‍त कार्यालयात फिरकू नये. या कार्यालयात कोणत्याही बैठका आयोजित होणार नाहीत. आवश्‍कता वाटल्यास व्हिडीओ कॉन्फरन्स, ई-मेल, दुरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात येईल, असे आदेश शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांनी जारी केले आहेत. सध्या … Read more

बार्टीची स्पर्धा चाळणी परीक्षा पुढे ढकलली

पुणे – करोनाच्या प्रादुर्भावामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी)च्या वतीने स्पर्धा परीक्षांकरिता आयोजित चाळणी परीक्षा पुढे ढकलली आहे. करोनाबाबतची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर या परीक्षेची तारीख कळविण्यात येणार आहे. बार्टीच्या वतीने याबाबतचे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता एलआयसी, रेल्वे, बॅंक या आस्थापनांमधील लिपिक वर्गातील भरतीच्या मार्गदर्शनाकरिता नि:शुल्क अनिवासी प्रशिक्षण (कोचिंग) दिले … Read more

अर्ध्या कामगारांवर उत्पादन

दिवसाआड सुट्टी : गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न पिंपरी – आयटी व्यतिरक्‍त शहरात मोठ्या प्रमाणात वाहन निर्मात्या, इंजिनिअरिंग आणि वाहन उद्योगांशी निगडीत लघु आणि मध्यम उद्योग आहेत. हजारो कर्मचारी काम करत असलेल्या कंपन्याही शहरात आहेत. सध्या “करोना’मुळे कमीत कमी गर्दी व्हावी, असे प्रयत्न कंपन्यांकडून केले जात आहेत. या दृष्टीने उत्पादन बंद न करता टाटा मोटर्ससारख्या बड्या … Read more

करोनाबाधित तिघांवर ‘एचआयव्ही’ प्रतिबंधात्मक औषधांचा परिणाम

आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांची माहिती पुणे – राज्यासह देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. करोनाबाधित रुग्णांना उपचार देताना “एचआयव्ही’ची प्रतिबंधात्मक औषधे देण्यात येत असून त्याचा परिणाम होताना दिसून येत आहे. राज्यात तीन रुग्णांना ही प्रतिबंधात्मक औषधे देण्यात आली असून, गंभीर रुग्णांना ही औषधे देता येऊ शकतील, असा निर्वाळा राज्याच्या आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील … Read more

करोना संशयितांना फाईव्ह स्टार पाहूणचार

पालिका प्रशासन 24 तास निरीक्षणाखाली ठेवणार विलगीकरण कक्षात हॉटेलच्या धर्तीवर सुविधा पुणे – परदेशातून शहरात परतलेल्या नागरिकांना करोनाची लक्षणे नसली तरी 24 तास निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून सणस मैदान येथील क्रीडा वसतिगृह तसेच सिंहगड रस्त्यावरील लायगुडे दवाखान्यात विलगीकरण कक्ष उभारले असून येथे पंचतारांकीत हॉटेलच्या धर्तीवर रुग्णांना सुविधा देण्यात येणार आहेत. या सुविधांमध्ये दैनंदिन … Read more

12 तासांत आणखी 3 लॅब

पुढील आठ दिवसांत 10 लॅब कार्यान्वित होणार : आरोग्यमंत्री टोपे एनआयव्ही आणि आरोग्य यंत्रणेच्या कामाचे कौतुक पुणे – करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता येत्या 12 तासांत आणखी तीन ठिकाणी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळा (लॅब) सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये पुण्यातील बै. जी. शासकीय महाविद्यालय, मुंबई येथील केईएम रुग्णालय आणि कस्तुरबा रुग्णालयात आणखी एक प्रयोगशाळेचा समावेश आहे, अशी … Read more

करोनाच्या तपासणीसाठी रक्ताची चाचणी नाहीच; आरोग्य विभागाकडून स्पष्टीकरण

मुंबई – सध्या नवा करोना विषाणू सर्वत्र थैमान घालतो आहे. भारतातही हा विषाणू वेगाने पसरतो आहे. अशातच सोशल मीडियावर सध्या कोरोनाच्या रक्त चाचणीसाठी महाराष्ट्रातील हॉस्पिटलची यादी व्हायरल होत आहे. मात्र, करोनाच्या तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नसल्याचे आरोग्य विभाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात संशयित रुग्णांची कोरोनासाठी तपासणी करताना रक्ताची चाचणी केली … Read more

पुण्यात करोनाचा आणखी एक रुग्ण; संख्या १८वर

पुणे – परदेशातून आलेल्या शहरात करोनाचा आणखी एक रुग्ण आज आढळूला आहे. यासंदर्भातील माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. यामुळे राज्यात एकूण करोना बाधितांची संख्या ४२ झाली आहे. माहितीनुसार, पुण्यात आढळलेला करोनाबाधित फ्रान्स आणि नेदरलँडतून प्रवास करून आला आहे. यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात करोनाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १८ झाली आहे. … Read more

‘वर्क फ्रॉम होम’ला हॅकर्सचा धोका

आयटी कंपन्यांतील घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूचना पुणे – कर्मचारी जेव्हा कार्यालयात काम करतात तेव्हा कार्यालयातील संगणकाच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाते. मात्र, करोना व्हायरसमुळे बऱ्याच कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. या कर्मचाऱ्यांच्या घरातील यंत्रणा कंपन्यांतील यंत्रणेइतकी सुरक्षित असतेच असे नाही. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यावर हॅकर्स पाळत ठेवून हल्ले करू शकतात, अशी शक्‍यता वर्तविली … Read more

कोरोनामुळे राज्यातील ‘ही’ पर्यटन व धार्मिक स्थळं बंद

मुंबई – देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक असलेल्या महाराष्ट्रामध्ये काही महत्वाची धार्मिक व पर्यटन स्थळं बंद करण्यात आली आहेत. बंद करण्यात आलेल्या स्थळांमध्ये अजंठा-वरून येथील जगप्रसिद्ध लेण्या, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर व तुळजापूर येथील तुळजाभवानीचे मंदिर यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त नेहमीच हजारोंची गर्दी असणाऱ्या मुंबईतील मंत्रालयामध्ये प्रवेश करण्यास देखील सामान्य नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे. यापूर्वी राज्य सरकारने शहरी भागातील शाळा, महाविद्यालये, … Read more