“करोना रुग्णवाढ कायम राहिली तर राज्यात निर्बंध लागणार?”; मंत्री अस्लम शेख यांचा सावधानतेचा इशारा

pune district corona updates

मुंबई : राज्यात सध्या करोना रुग्णसंख्येत हळूहळू  वाढ होताना दिसत आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मास्कचा वापर नागरिकांनी करावा असे आवाहन केल्यानंतर आता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी करोना रुग्ण वाढल्याने राज्यात पुन्हा निर्बंध येण्याची शक्यता आहे असे म्हटले आहे. राज्यातील करोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असताना, महाराष्ट्र सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. … Read more

देशात 237 दिवसांतील सर्वांधिक सक्रिय बाधितांची नोंद

नवी दिल्ली – देशातील करोनाबाधितांच्या संख्येत शनिवारी 3 लाख 37 हजारांची दैनंदिन वाढ झाली. त्यामुळे सक्रिय बाधितांची संख्या वाढून 21 लाख 13 हजारांवर पोहचली. सक्रिय बाधितांची ती संख्या 237 दिवसांतील सर्वांधिक ठरली आहे. एकूण बाधितांमध्ये सक्रिय बाधितांचे प्रमाण 5.43 टक्के इतके आहे. देशातील बाधित बरे होण्याचा दर घटून 93.31 टक्के इतका झाला आहे. दैनंदिन बाधित … Read more

पुणे शहरात 24 तासांत 430 नवीन रुग्ण

पुणे – शहरात सलग तिसऱ्या दिवशी 400 पेक्षा अधिक करोना बाधित आढळून आले असून, तीनही दिवस रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. मागील चोवीस तासांमध्ये 430 नवीन रुग्ण आढळले असून, बरे झालेल्या 382 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. समाधानाची बाब अशी की, रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण स्थिर असून मागील 24 तासांत तीन जणांच्या … Read more

डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीमुळे तब्बल 30,000 जणांना कोरोनाची लागण

न्यूयॉर्क : अमेरिकेत सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. त्यातच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत सहभागी झाल्याने तब्बल 30,000 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर यामध्ये 700 जणांचा मृत्यू झाल्याचेही एका संशोधनातून समोर आले आहे. अमेरिकेतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत 18 रॅली घेतल्या. या रॅलीमध्ये सहभागी झालेल्यांपैकी 30 हजारांपेक्षा जास्त लोकांना … Read more