COVID 19 (JN.1) : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ; मागील 24 तासांत 7 रुग्णांचा मृत्यू, 743 नवे रुग्ण

COVID 19 (JN.1) : मागच्या काही दिवसापांसून देशात पुन्हा एकदा कोरोनाचा  प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे.त्यामुळे नागरिकांसह आरोग्य यंत्रणादेखील अलर्ट मोडवर आली आहे. दरम्यान, २०२३ च्या वर्षाच्या शेवटी देशभरात कोरोनाने आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे.  कोरोनाच्या नवीन JN.1 सब-व्हेरियंटमुळे  देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. केरळ, कर्नाटक, दिल्लीसह नऊ राज्यांमध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे रुग्ण … Read more

Corona: कोरोना रुग्णसंख्या दोन महिन्यांच्या उच्चांकावर, सक्रिय रुग्णांची संख्या 10,000 पेक्षा जास्त

मुंबई – राज्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने ऍक्‍टिव्ह रुग्णसंख्या दहा हजारापार गेली आहे. गेल्या दोन दिवसांपासून दोन हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. तर आज राज्यातील दैनंदिन करोना रुग्णसंख्येने दोन महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. राज्यात गुरूवारी तब्बल 2 हजार 813 रुग्ण आढळून आले आहेत.यात मुंबईत सर्वाधिक 1702 रुग्णांची नोंद झाली … Read more

राज्यातील करोनाबाधितांची संख्या पुन्हा हजार पार

मुंबई – नव्याने आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या दैनंदिन संख्येने राज्यात पुन्हा एक हजारचा टप्पा पार केला. राज्यात बुधवारी 1 हजार 81 बाधितांची नोंद झाली. याआधी राज्यात 24 फेब्रुवारी या दिवशी सर्वांधिक 1 हजार 124 बाधित आढळले होते. राज्यातील दैनंदिन बाधित संख्येत एकट्या मुंबईचा वाटा 70 टक्के इतका आहे. मुंबईत बुधवारी 739 बाधितांची नोंद झाली. जवळपास चार महिन्यांनी … Read more

धक्कादायक ! परदेशातून आलेले करोनाबाधित विमानतळावरून पळाले

नवी दिल्ली – इटलीवरून भारतात परतलेले, संस्थात्मक विलगीकरणात असलेले 13 करोनाबाधित रुग्ण पळून गेल्याची घटना अमृतसरमध्ये घडली आहे. त्यामुळे आता प्रशासनाची चिंता वाढली आहे. यापैकी 9 जण विमानतळावरूनच पळाले असून 4 जण स्थानिक रुग्णालयातून पळून गेले आहेत. विमानतळावरून पळून गेलेले 9 जण कसे पळून गेले याबद्दल अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. मात्र जे जण रुग्णालयातून पळून … Read more

दिलासादायक ! देशात 118 दिवसांतील सर्वांत कमी करोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली – देशात एका दिवसात 31 हजार 443 नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. ती 118 दिवसांतील सर्वांत कमी दैनंदिन वाढ ठरली आहे. देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या 3 कोटी 9 लाखांवर पोहचली आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून नव्या बाधितांच्या संख्येतील घट दिलासादायी ठरत आहे. आतापर्यंत 3 कोटींहून अधिक बाधित बरे झाले आहेत. देशातील सक्रिय बाधितांची संख्या … Read more

देशातील करोनाबाधितांची संख्या 3 कोटींवर

नवी दिल्ली  -संपूर्ण जगाला ग्रासलेल्या करोना संकटाशी झुंजत असणाऱ्या भारताने बुधवारी नकोसा टप्पा ओलांडला. देशातील करोनाबाधितांची संख्या आता 3 कोटींवर गेली आहे. देशात मंगळवार सकाळपासून 24 तासांत 50 हजार 848 नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे देशातील बाधितांची एकूण संख्या 3 कोटी 28 हजार 709 इतकी झाली आहे. मागील वर्षी 19 डिसेंबरला देशातील बाधित संख्येने 1 … Read more

करोना रुग्ण शोधण्यासाठी कोविड अलार्म; ब्रिटनमधील वैज्ञानिकांचे अनोखे संशोधन

लंडन : ब्रिटनमधील काही शास्त्रज्ञांनी अशा अनोख्या उपकरणाचा शोध लावला आहे. ज्याच्या सहाय्याने करोना रुग्णाचा फक्त पंधरा मिनिटात शोध घेणे शक्य होणार आहे. एखाद्या खोलीत विविध व्यक्ती जर जमले असतील तर त्या व्यक्तीपैकी कोणी जर करोना ग्रस्त असेल तर त्या खोलीतील अलार्म वाजेल आणि पंधरा मिनिटातच ही गोष्ट समोर येईल खोलीचा आकार मोठा असेल तर … Read more

बार्शीत अँटीबॉडी कॉकटेल उपचार पद्धतीला मोठं यश; करोना रुग्णाला दुसऱ्याच दिवशी सुट्टी

बार्शी – करोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र करोना संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण अद्याप कमी झालेलं नाही. करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीशिवाय पर्याय नाही. मात्र आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून करोना उपचारासंदर्भात दिलासादायक बातमी आली आहे. यानुसार करोना रुग्णांवर आता ओपीडी बेस उपचार होणार आहेत. बार्शी येथील डॉ. संजय अंधारे यांनी करोना संसर्ग झालेल्या … Read more

करोनाची दुसरी लाट ओसरतीय! एप्रिलनंतर पहिल्यांदाच सर्वात कमी करोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली : देशातील करोनाची दुसरी लाट ही आता ओसरताना दिसत आहे. कारण  दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या  वाढत  आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात १ लाख २१ हजार ३११ रूग्ण करोनामुक्त झाले, तर ८४ हजार ३३२ नवीन करोनाबाधित आढळून आले. याशिवाय ४ हजार ००२ रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. मागील २४ … Read more

बिलाच्या वसुलीपोटी रुग्णाच्या पत्नीचं मंगळसूत्र केलं जप्त : बुलडाण्यातला प्रकार

बुलडाणा : कोरोना महामारीच्या संकटात काही खासगी रुग्णालयं रुग्णांच्या नातेवाईकांना लुबाडत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या सगळ्या घटना ताज्या असतानाच बुलडाण्याच्या खामगावात संतापजनक घटना समोर आली आहे. बिलमध्ये 11 हजार रुपये कमी पडत होते म्हणून रुग्णालय प्रशासनाने थेट रुग्णाच्या पत्नीचं मंगळसूत्र घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जोपर्यंत 11 हजार रुपये किंवा मंगळसूत्र … Read more