केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना करोनाची लागण

नवी दिल्ली : केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना करोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.खुद्द  शिंदे यांनी याविषयी ट्विट करुन माहिती दिली आहे. शिंदेनी केलेल्या ट्विटमध्ये  ‘डॉक्टरांच्या सल्ल्यानं केलेल्या कोविड-19 च्या तपासणीत माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसात जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत, त्या सर्वांनी खबरदारी घ्यावी. जवळच्या आरोग्य … Read more

#IPL2023 : आयपीएल स्पर्धेवर करोनाचे सावट, कमेंटेटर आकाश चोप्रा COVID-19 पॉझिटिव्ह

नवी दिल्ली – भारताचे माजी कसोटीपटू व प्रसिद्ध समालोचक(कमेंटेटर)  आकाश चोप्रा यांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेवरही करोनाचे सावट निर्माण झाले आहे. स्वतः चोप्रा यांनीच आपल्याला करोनाची बाधा झाल्याचे ट्‌विट केले आहे. मला बाधा झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाले असून, माझा आवाजही खराब झाला आहे. अशा स्थितीत मी … Read more

छगन भुजबळांनंतर उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई करोना पॉझिटिव्ह

सातारा – राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई करोनाबाधित आढळले असून सध्या ते गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. विधिमंडळ अधिवेशनानंतर शंभूराज देसाई यांनी करोना चाचणी केली होती. ती चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या देसाई गृह विलगीकरणात डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. त्यांची प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही. गेल्या तीन- चार … Read more

थायलंड आणि म्यानमारमधून भारतात आलेले परदेशी नागरिक कोरोना पॉझिटिव्ह

गया – बिहार मध्ये बौद्ध गया येथे आलेले पाच विदेशी नागरीक कोविड ग्रस्त असल्याचे चाचणीत आढून आले आहे. या पाच परदेशी नागरीकांपैकी चार थायलंडचे आणि एक म्यानमारचा आहे. गया जिल्ह्याचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. रंजन कुमार सिंग यांच्या म्हणण्यानुसार, बोधगयाला भेट देणाऱ्या विदेशी नागरीकांची आंतरराष्ट्रीय विमानतळावर चाचणी घेण्यात आली. वीकेंड दरम्यान एकूण 33 परदेशी लोकांची … Read more

आशिया करंडकापूर्वी भारतीय संघाला धक्का; प्रशिक्षक द्रविड ‘या’ कारणामुळे संपूर्ण स्पर्धेलाच मुकणार

मुंबई – भारतीय संघाच्या आशिया करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळवण्याच्या मोहिमेला धक्का बसला आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले असून आता त्यांच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण यांना संघासह दुबईला पाठवण्यात येणार असल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे. जे खेळाडू झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी रवाना झाले होते त्यांच्या व्यतरीक्त जे खेळाडू आशिया स्पर्धेसाठी … Read more

प्रियांका गांधींना करोनाची लागण; दोन महिन्यात दुसऱ्यांदा झाल्या बाधित

नवी दिल्ली : काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांना दुसऱ्यांदा करोनाची लागण झाली आहे. प्रियांकाचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या घरीच आयसोलेटेड असून करोनाचे सर्व नियम पाळणार आहे. दरम्यान, त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी करोना  चाचणी करून घेण्याचा सल्ला देखील यावेळी त्यांनी दिला आहे. Tested positive for covid (again!) today. Will be isolating at home and … Read more

शिंदे मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वीच संभाव्य मंत्र्याला करोनाची बाधा

सातारा (प्रतिनिधी) – माजी गृह राज्यमंत्री व पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांना करोनाची लागण झाली आहे. देसाई यांना मुंबई येथील सुरूची हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती देण्यात आली आहे. शंभूराज देसाई यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देऊन राज्यामध्ये सत्तापालट घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. राज्याच्या येऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारातही शंभूराज … Read more

ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले करोना पॉझिटिव्ह

मुंबई : महाराष्ट्रात करोना आणि ओमिक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढत  आहे. राज्यात करोनाचा कहर सुरु असल्याचेही पाहायला मिळत आहे. राज्यात दिवसभरात आढळून येणाऱ्या करोना रुग्णांची संख्या पुन्हा 40 हजारांच्या वर गेली आहे. काल राज्यात 48 हजार 270 नवे करोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 52 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, या सर्वात ग्लोबल टीचर पुरस्कार … Read more

धक्कादायक! करोना पॉझिटिव्ह आमदाराचे शंभर कार्यकर्त्यांसह नागपुरात आंदोलन; नाना पटोलेंना अटक करण्याची मागणी

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नाना पटोले यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी भाजप  नेते चांगलेच  आक्रमक झाल्याचे दिसत आहे.नागपूर पूर्व विधानसभा क्षेत्रातील भाजप आमदार कृष्णा खोपडे हे देखील आज शेकडो  कार्यकर्त्यांसह  लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये नाना पटोले यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. या सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे खोपडे स्वतः … Read more

महादेव जानकर यांना करोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना टेस्ट करण्याचे आवाहन

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांना करोनाची लागण झाली आहे. आता आणखी एका राजकीय नेत्याला करोनाची लागण झाली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना करोनाची लागण झाली आहे. महादेव जानकर यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. प्रचंड प्रवास व कार्यक्रम यामुळे कोरोनाची लक्षणे जाणवू लागली होती. त्यामुळे करोना … Read more