कोरोना प्रतिबंधाकरिता समूह प्रतिकारशक्तीसाठी लसीकरण आवश्यक – आरोग्यमंत्री टोपे

मुंबई  : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचा कोरोना प्रतिबंधक लसीकरणात सहभागासाठी ‘प्रोजेक्ट मुंबई’ या संस्थेतर्फे पुढाकार घेण्यात आला आहे. जाणीवजागृती बरोबरच नागरिकांचे समुपदेशन करून लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी संस्थेमार्फत प्रयत्न केले जाणार आहे. त्यासाठी आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी गडचिरोली आणि प्रोजेक्ट मुंबई संस्था यांच्यात सामंजस्य करार झाला. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमास … Read more

पुण्यात दुकानदारांवर कारवाईसाठी पालिकेने केली पथकांची नियुक्ती

पुणे – सुरक्षा नियम न पाळणाऱ्या दुकानदारांवर कारवाईसाठी पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकाने रोज केलेल्या कारवाईचा अहवाल महापालिका आयुक्तांकडे सादर करायचा आहे. यासंबंधी आयुक्त विक्रम कुमार यांनी बुधवारी आदेश काढले.   यासाठी अतिक्रमण निरीक्षक, सहायक अतिक्रमण निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षक असे एकूण तीन कर्मचाऱ्यांचे पथक प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांतर्गत तयार करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले … Read more

कोरोना प्रतिबंधासाठी दक्षतेच्या प्रत्येक नियमाचे काटेकोर पालन आवश्यक

मुंबईहून परतताच पालकमंत्र्यांनी केली रॅपिड अँटिजेन टेस्ट; अहवाल निगेटिव्ह अमरावती : कोरोनाची जोखीम सर्वांना समान आहे. कोरोना प्रतिबंधासाठी दक्षतेच्या प्रत्येक नियमाचे प्रत्येकाकडून काटेकोर पालन होणे आवश्यक आहे, असे सांगत पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी मुंबईहून परतताच स्वतःसह सर्वांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करून घेतली. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्यावरच त्या निवासस्थानी परतल्या. कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात विविध उपाययोजनांची प्रभावी … Read more

जळगाव : केंद्रीय पथकाकडून कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा

मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश जळगाव : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनासह सर्वच यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याचे समाधान व्यक्त करतानाच मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रामधील निर्बंधांची कडक अंमलबजावणी केली जावी, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय पथकाचे प्रमुख ओएचएफडब्ल्युचे वरिष्ठ विभागीय संचालक डॉ. ए. जी. अलोने … Read more

ससून रुग्णालयातील कोविड चाचण्यांची क्षमता वाढविण्यासाठी १२ कोटी ४४ लाखांचा निधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा पुणे : कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने चाचण्यांची क्षमता वाढविणे आवश्यक असून त्यादृष्टीने पुण्यातील ससून रुग्णालयाच्या चाचण्यांची क्षमता वाढविण्यासाठी १२ कोटी ४४ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. अवाजवी शुल्क आकारणी करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी … Read more

कोरोना प्रतिबंध : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाणून घेतली केरळची यशोगाथा

मुंबई : कोरोना प्रतिबंधासाठी केरळ राज्याने कशा प्रकारे उपाययोजना राबविल्या आहेत याची माहिती घेण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केरळच्या आरोग्यमंत्री के. शैलजा यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. केरळमधील लोकसंख्येची घनता तेथील भौगोलिक, सामाजिक रचना आणि महाराष्ट्राची रचना यात बऱ्यापैकी अंतर आहे. मात्र केरळच्या आरोग्य विभागाकडून जे काही अभिनव उपक्रम हाती घेण्यात आले आहेत … Read more