पुणे लॉक की अनलॉक? अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आज निर्णय

पुणे – शहरात लॉकडाऊन लागू करायचा की निर्बंध अधिक कडक करायचे, याचा निर्णय शुक्रवारी (दि.2) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत होणार आहे. याबैठकीस महापौर, खासदार, आमदार यांना सुध्दा आमंत्रित करण्यात आले आहे. विधानभवन येथे शुक्रवारी सकाळी ही बैठक होणार आहे. मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे सांगत … Read more

पुण्यात 24 तासांत 4,103 करोनाबाधित

पुणे – शहरात मागील 24 तासांत करोनाचे 4 हजार 103 नवीन रुग्ण आढळले असून, बरे झालेल्या 2 हजार 77 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, शहरात तब्बल 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे; त्यापैकी 35 रुग्ण हे पुणे शहरातील आहेत. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 35 हजार 849 झाली असून, गंभीर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी … Read more

पुण्यात दोन दिवस पुरेल एवढाच लससाठा

पुणे – शहरासाठी दोन दिवसच पुरेल इतका लससाठा असून राज्य सरकारकडे लसींची मागणी महापालिकेने केली आहे. शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत लस तुटवड्याबाबत चर्चा होण्याची शक्‍यता आहे. गुरूवारपर्यंत महापालिकेकडे सुमारे 33 हजारांचा लस साठा होता. त्यातील रोजचा 12 हजार साठा धरल्यास आणखी सुमारे 20 ते 22 हजारच लस महापालिकेकडे शिल्लक आहेत. ही … Read more

लस मुरतेय कोठे?; ‘वेस्टेज’बाबत आरोग्यमंत्र्यांचा ‘टोचण्या’

पुणे – शहरात मोठ्या प्रमाणात लस “वेस्टेज’ कशी होते, असा प्रश्‍न आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विचारला असून, त्याचा शोध घ्या असे आदेशही त्यांनी आयुक्तांना दिले आहेत. करोना लसीकरणात लस वाया जाण्याचे प्रमाण एकूण दहा टक्‍क्‍यांपर्यंत असून, पुण्यात सर्वाधिक लस “वेस्टेज’ होत आहेत. यावर सोमवारी टोपेंबरोबर झालेल्या बैठकीत चर्चाही झाली. लसीच्या एका व्हायलमध्ये सुमारे दहा जणांना … Read more

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी : खासगी कार्यालयात फक्त 50 टक्के कर्मचाऱ्यांचीच उपस्थिती; नियम मोडल्यास थेट गुन्हा

पुणे – पुण्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढू लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुणेकरांना निर्बंधांना सामोरं जावं लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षात घेता, सर्व खाजगी कार्यालयांमध्ये 50 टक्के क्षमतेनेच कर्मचारी उपस्थित ठेवण्याबाबतचे आदेश पुणे महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. यामध्ये आरोग्य आणि इतर अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कार्यालयांना वगळण्यात आलं आहे. या नियमांचं उल्लंघन … Read more

सरसकट लसीकरण! पुण्यासंदर्भात केंद्राला राज्य सरकारचा प्रस्ताव

पुणे – देशांत सर्वाधिक सक्रिय बाधित असणाऱ्या पुण्यात 18 वर्षांपुढील सर्व व्यक्तींना सरसकट लसीकरणाचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे दिला आहे. त्याला मान्यता मिळाल्यास रोज एक लाख जणांचे लसीकरण शक्‍य आहे. त्यामुळे करोनाची स्थिती नियंत्रणात येऊ शकते, असे विश्‍वास विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला. याबाबत शहरातील काही महत्वाच्या सामाजिक संस्थांनी निती आयोगाचे सदस्य आणि … Read more

पुण्याचा धोका वाढला…! दिवसभरात आढळले तब्बल ‘इतके’ नवीन करोनाबाधित

ऍक्‍टिव्ह रुग्ण संख्याही 8 हजारांपेक्षा जास्त पुणे – गेल्या तीनच दिवसांत बाधितांची संख्या एक हजारवरून गुरुवारी दीड हजारवर गेल्याने पुणेकरांना आता कडक लॉकडाऊनचा सामना करावा लागतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. 9 मार्च रोजी 1 हजार 086 बाधित आढळले होते. तर, दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 मार्च रोजी बाधितांची संख्या 1 हजार 352 होती. … Read more

पुणेकरांची चिंता वाढली! करोनाने ओलांडला दोन लाख बाधितांचा टप्पा

पुणे – मागच्या वर्षीपासून हाहाकार माजवलेल्या करोना महामारीने दोन लाख बाधितांचा टप्पा गुरुवारी गाठला. गेल्या 24 तासांत 766 बाधितांचा आकडा पार झाला असून, बाधितांची आकडेवारी आता 2 लाख 462 झाली आहे. शहरातील बाधितांची संख्या गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून वाढतच चालली आहे. बुधवारी बाधितांची संख्या सातशेच्या पार गेली आणि गुरुवारी ती आणखी वाढली. तसेच गेल्या 24 तासांत … Read more

नियम…! लग्न, सार्वजनिक कार्यक्रमांची सीडी पोलिसांना द्या

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : करोना रोखण्यासाठी प्रशासनाकडून जिल्हाभर भरारी पथके पुणे – करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रामुख्याने लग्न आणि इतर खासगी कार्यक्रमांसाठी फक्त 200 व्यक्तींनाच परवानगी आहे. विवाह समारंभाचे व्हिडिओ चित्रीकरण सीडी पाच दिवसांत जवळच्या पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी काढले आहे. खासगी समारंभ-कार्यक्रमांत … Read more

संसर्गाचाच ‘प्रवास’! पीएमपी बसेस गर्दीने ‘ओसंडून’

नव्या नियमांना प्रशासनाकडूनच केराची टोपली पुणे – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर पीएमपी प्रशासनाने नागरिकांना उभे राहून प्रवास करण्याची परवानगी नाकारली. याबाबत पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना सूचनादेखील दिल्या. मात्र, सोमवारी अनेक बसेसमध्ये नागरिक उभे राहून प्रवास करत असल्याचे चित्र होते. शहरातील शाळा, महाविद्यालयांसह बहुतांश व्यवहार सुरू झाले होते. त्यामुळे पीएमपीच्या प्रवाशांच्या संख्या देखील मागील काही दिवसांपासून वाढत आहे. … Read more