‘कॉटन आणि लिनेन’मध्ये फरक काय? उन्हाळ्यात कोणते कपडे घालावे? रुबाबदार फॅशनसाठी वाचा ‘या’ खास टिप्स…

Difference Linen And Cotton । उन्हाळ्यात कपडे खरेदी करताना सर्वात जास्त दोन नावं समोर येतात. एक कॉटन आणि दुसरा लिनेन. लोकांना कॉटन बद्दल माहिती आहे पण लिनेन म्हणजे काय? हे फार कमी लोकांना माहिती आहे. तसेच, लोकांना या दोघांमधील फरक माहित नाही. बहुतेक लोक तेच विचार करतात. या दोघांमध्ये बराच फरक असला तरी त्यांच्या दरांमध्येही … Read more

कापूस महामंडळाकडून कापूस खरेदी सुरू; आतापर्यंत 32.81 लाख गाठींची खरेदी

नवी दिल्ली  – सध्या कापसाचे दर किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी पातळीवर आहेत. त्यामुळे भारतीय कापूस महामंडळाने कापूस खरेदी चालू केली असून या हंगामात आतापर्यंत किमान आधारभूत किमतीवर 32.81 लाख गाठी कापूस खरेदी करण्यात आल्याची माहिती महामंडळाने जारी केली आहे. (Commencement of purchase of cotton from Cotton Corporation; Purchased 32.81 lakh bales so far) गेल्या वर्षी … Read more

शेतकऱ्यांनी सीसीआयकडे फिरवली पाठ ! राज्यात केवळ १ लाख कापूस गाठींची खरेदी

नागपूर – यावर्षी कापसाच्या उत्पादनात घट झाली आहे. तरीदेखील सरकारकडून पिकाला हमी भाव मिळत नाही. एकीकडे सरकारकडून कापसाला हमीभाव देण्याचे दावे केले जात होते. मात्र काही जाचक अटींमुळे शेतकऱ्यांनी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) कडे पाठ फिरवलेली पाहायला मिळत आहे. यावर्षी ८ जानेवारी २०२४ पर्यंत सीसीआयने राज्यात केवळ १ लाख गाठी खरेदी केल्या आहेत. शेतकऱ्यांनी … Read more

cotton price : पांढऱ्या सोन्याला भाव कधी मिळणार? दरवाढीच्या अपेक्षेने ७५ टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरातच

cotton price – पांढऱ्या सोन्याचा जिल्हा अशी यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे. मात्र, नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा कापूस ओला झाला आणि दर घसरला. कापसाचा एमएसपी दर ७०२० रुपये क्विंटल असून शेतकऱ्यांचा कापूस हा व्यापारी ६३०० ते ६५०० रुपये दराने खरेदी करीत आहे. अशातच मोजक्याच जिनिंग प्रेसिंग सुरू झाले. नाफेड आणि सीसीआयची खरेदीही जिल्ह्यात … Read more

दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांची कोंडी; हमीभावापेक्षा कमी किमतीने कापसाची खरेदी

नागपूर – यंदा मोसमी पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडला. त्यामुळे कोरडवाहू कापसाचे उत्पादन घटले आहे. त्यात दसऱ्यापासून कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. मात्र, भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि राज्य पणन महासंघाने खरेदी केंद्र सुरू न केल्याने खासगी खरेदी सुरू झाली आहे. बहुतांश ठिकाणी व्यापारी हमीभावापेक्षा कमी किमंतीमध्ये खरेदी करीत आहे. तर दुसरीकडे बाजारात … Read more

अहमदनगर – “अग्रीम”साठी 9 लाख शेतकरी दावेदार

जयंत कुलकर्णी नगर   – यंदा मॉन्सूनच्या पावसाने ओढ दिल्याने जमिनीत ओलावाच कमी झाला परिणामी पिके वाळून गेली. पावसाचा तब्बल 21 दिवस खंड पडल्याने खरीप पिकांच्या उत्पन्नात 50 पेक्षा जास्त घट होणार असल्याने शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून नुकसानीची 25 टक्‍के रक्‍कम अग्रीम म्हणून देण्याचा निर्णय घेतला होता. विमा कंपन्यांबरोबर राज्य सरकारने चर्चा करून 628 कोटी रुपयांचा हप्ता … Read more

शेतकऱ्यांच्या अडचणीत भर; कापूस बियाण्यांच्या दरात वाढ

नगर – कपाशीच्या दरात शासनाने वाढ केल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड पडणार आहे. बियाण्यांच्या दरात 86 ते 246 रुपयांची वाढ झाली आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर बियाण्यांच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे याबाबत तत्काळ संबंधित विभागाने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने सलग … Read more

कापूस पडला घरी, कांदा सडला बांधावरी अन् सरकार म्हणतयं ‘शासन आपल्या दारी’

सोनई – कापसाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे आज लाखो टन कापूस शेतकऱ्यांच्या घरात भावाच्या प्रतिक्षेत पडून आहे. ऐन कांदा काढणीच्या वेळेस पाऊस सुरू झाल्यामुळे हजारो हेक्‍टर कांदा बांधावर सडत पडलेला आहे. जो कांदा हाती लागलेला आहे तो वाहतूक खर्चालाही महाग पडत आहे. ‘कापूस पडला घरी, कांदा सडला बांधावरील आणि तरीही हे सरकार म्हणतंय शासन आपल्या … Read more

“अर्थसंकल्प म्हणजे ‘बड्या-बड्या बाता अन् शेतकऱ्यांना लाथा”; रविकांत तुपकर यांची राज्य सरकारवर टीका

मुंबई : शिंदे-भाजप सरकारचा काल पहिला अर्थसंकल्प सादर झाला. या अर्थसंकल्पाविषयी संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसून येत आहे. त्यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी,”राज्य सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे ‘बड्या-बड्या बाता अन् शेतकऱ्यांना लाथा’ असे म्हणत राज्य सरकारवर टीका केली आहे. सोयाबीन आणि कापसाचा उत्पादन खर्च भरुन निघेल एवढाही भाव खासगी बाजारात नाही. त्यामुळे आज 70 … Read more

सोयाबीन, कापूस उत्पादकांना योग्य हमीभाव द्या! कृषिमंत्र्यांचे केंद्रीय वाणिज्य मंत्री गोयल यांना पत्र

नागपूर : राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत सापडला आहे. योग्य हमीभाव देऊन आणि निर्यात धोरणात योग्य तो बदल करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मागण्यांचे पत्र केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पाठविले आहे. हमीभाव वाढवण्याची गरज राज्यात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. या शेतकऱ्यांना … Read more