पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची न्यायालयात धाव

पुणे – पत्नी लग्नापूर्वी नोकरी करत नसतानाही असल्याची खोटी माहिती देणे, तसेच पतीसह सासरच्या लोकांना शिवीगाळ करणे, त्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून जाणे, पतीला मारहाण करणे अशा पत्नीच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने समन्स बजावूनही पत्नी न्यायालयात हजर राहिली नाही. तिने न्यायालयात लेखी म्हणणे सादर केले नाही. अथवा बचावात्मक पुरावा … Read more

ललित पाटील प्रकरण: ससूनच्या उपाहारगृहातील कामगाराचा जामीन फेटाळला

पुणे – ससून रुग्णालयातून अमली पदार्थ विक्री करणारा तस्कर ललित पाटील प्रकरणात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेला रुग्णालयाच्या उपाहारगृहातील कामगार रौफ रहीम शेख याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश व्ही. आर कचरे यांनी फेटाळला. ललित पाटील याचा साथीदार सुभाष मंडल सह रौफ रहीम शेख याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ३० सप्टेंबरला अटक केली. पाटीलला रुग्णालयात दोन कोटी … Read more

खटला चालवण्यासाठी केजरीवालांच्या विरोधात पुरेसे पुरावे; ईडीच्या माहितीची न्यायालयाने घेतली दखल

नवी दिल्ली – दिल्लीच्या मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनि लॉंडरिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्राची दिल्लीतील एका न्यायालयाने दखल घेतली असून येत्या ४ जूनपर्यंत या प्रकरणातील आपला निर्णय राखून ठेवला. ईडीने आपल्या आरोपपत्रात आम आदमी पार्टीलाही आरोपी केले आहे. देशात असे एखाद्या राजकीय पक्षाला आरोपी करण्याची पहिलीच वेळ आहे. … Read more

Pune: उच्चशिक्षित दाम्पत्याचा न्यायालयाच्या पहिल्याच सुनावणीमध्ये घटस्फोट

पुणे : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा असतो. लग्नानंतर दोन व्यक्ती एका नव्या नात्याची सुरुवात करत असतात. परंतु अलीकडे बदलत्या जीवनशैलीमुळे दोघात वैचारिक कारणामुळे मतभेद निर्माण होतात. घटस्फोटाशिवाय कुठलाही पर्याय उरत नाही. अशाच प्रकरणात मतभेद टोकाला गेल्यामुळे दिड वर्षांपासून विभक्त राहणाऱ्या उच्च शिक्षित दांम्पत्याचा घटस्फोट अर्ज पहिल्याच सुनावणीमध्ये कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. … Read more

बलात्कार पीडित विशेष मुलीने खाणाखुणा व हातवारे करून दिली न्यायालयात साक्ष; आरोपीला सुनावली दहा वर्षे सक्तमजुरी

पुणे : विशेष मुलीवर त्याने बलात्कार केला. या प्रकरणात पीडित मुलीने खाणाखुणा, हातवारे करून आरोपीने बलात्कार केल्याची दिलेली साक्ष न्यायालयात महत्वाची ठरली. न्यायालयाने आरोपीला दोषी धरत दहा वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.पी … Read more

कोविशील्ड लसीमुळे हृदयविकार आणि ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो! ॲस्ट्राझेनेका कंपनीने कोर्टात मान्य केली ‘त्रुटी”

AstraZeneca

AstraZeneca । कोरोनाचे औषध बनवणारी ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनी AstraZeneca ने आपल्या कोविड-19 लसीमुळे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात हे पहिल्यांदाच मान्य केले आहे. AstraZeneca ने UK उच्च न्यायालयात कबूल केले की कोविड-19 लसीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS) सारखे दुष्परिणाम होऊ शकतात. थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोममुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ लागतात किंवा शरीरात प्लेटलेट्स झपाट्याने कमी होऊ लागतात. शरीरात … Read more

Pune: ‘इको पार्क’साठी वनविभागानेच तोडली झाडे!

पुणे – वानवडी भागातील वृक्षतोडीबाबत सुनावणीसाठी हजर न राहिल्याबद्दल राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (एनजीटी) पश्चिम खंडपीठाने जिल्हाधिकारी कार्यालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याच सुनावणीत खंडपीठाने वनविभागाला वृक्षतोडीसाठी आवश्यक असलेल्या परवानगीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यासही सांगितले आहे. वानवडी येथील इको-पार्कसाठी प्रस्तावित असलेल्या राखीव वनक्षेत्रात वृक्षतोड केल्याच्या माध्यमांमध्ये प्रसारित वृत्तांच्या आधारे “एनजीटी’च्या मुख्य खंडपीठाने स्वत:हून कारवाई केली आहे. वानवडी … Read more

प्रियकराने आत्महत्या केली तर प्रेयसीला दोषी ठरवता येणार नाही; दिल्ली उच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी

नवी दिल्ली – प्रेमात अपयश आल्याचे म्हणत जर कोणी युवक आत्महत्या करत असेल तर त्या प्रकरणातील महिलेला यात दोषी ठरवता येऊ शकत नाही अशी महत्वपूर्ण टिप्पणी एका खटल्यावरील सुनावणीच्या वेळी दिल्ली उच्च न्यायालयाने केली. एका व्यक्तीच्या चुकीच्या निर्णयाकरता दुसऱ्या कोणाला दोषी ठरवले जाऊ शकत नाही असेही न्या. अमित महाजन यांनी नमूद केले. यासंदर्भात उदाहरण देताना … Read more

‘पंतप्रधानांवर निवडणूक लढवण्यावर ६ वर्षांची बंदी घाला’ ; दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल

Delhi high court।

Delhi high court। देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला आहे. त्यातच सर्व राजकीय पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आदर्श आचारसंहितेचे पालन करावे लागते. मते मिळविण्यासाठी नियम मोडता येत नाहीत. देशाचा पंतप्रधानालाही हे नियम लागू असतात. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे त्यांची निवडणूक रद्द ठरविण्यात आली होती, हा इतिहास … Read more

तारीख पे तारीख..! अरविंद केजरीवालांना दिलासा नाहीच, भर न्यायालयात काय घडलं पाहा….

Arvind Kejriwal – दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. कारण मद्य धोरण धोरण घोटाळ्यात तिहार तुरुंगात बंद असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडूनही दिलासा मिळालेला नाही. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने सांगितले की, आम्ही या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात (एप्रिल) सुनावणी करू. केजरीवाल यांच्या वतीने अभिषेक मनु … Read more