पुणे : महापालिकेला मिळेना ‘क्वारंटाइन’साठी हॉटेल्स

पुणे – परदेशांतून आलेल्या आणि करोना पॉझिटिव्ह किंवा ओमायक्रॉन बाधित नागरिकांना क्वारंटाइन करण्यासाठी महापालिकेला हॉटेल मिळत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यसरकारच्या गाइडलाइन्सप्रमाणे परदेशातून आलेल्या नागरिकांना “कोविड केअर सेंटर’ मध्येच क्वारंटाइन करावे लागणार आहे. दुसऱ्या लाटेवेळी लॉकडाऊनच असल्याने हॉटेलव्यवसाय बंद होता. ज्या ठिकाणी लॉजिंग बोर्डिंग होते त्या हॉटेलचालकांनी मेन्टेनन्सचा खर्च निघावा यासाठी संपूर्ण … Read more

लातूर | जिल्ह्यात आयुषच्या डॉक्टरांना घेऊन कोविड केअर सेंटर सुरु करणार

मुंबई : देशभरासह राज्यात कोविड विषाणूच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी आज ॲलोपॅथीचा प्रामुख्याने उपयोग करण्यात येत आहे. पण येत्या काळात लातूर जिल्ह्यात आयुषच्या सर्व डॉक्टरांना एकत्र करून पहिले कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख सांगितले. आयुष टास्कफोर्सचे सदस्य यांच्या समवेत देशमुख … Read more

गुजरातमधील कोव्हिड सेंटरला भीषण आग, 12 जणांचा होरपळून मृत्यू

अहमदाबाद : गुजरातमधील भरुच येथील एका कोव्हिड रुग्णालयाला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले. पटेल वेलफेअर रुग्णालयात रात्री जवळपास 12.30 वाजता ही दुर्घटना घडली. सध्या ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता मिळालेल्या माहितीनुसार, भरुच जिल्ह्यातील पटेल रुग्णालयातील कोरोनाबाधितांसाठी … Read more

कोविड केअर सेंटरमध्येही ऑक्‍सिजन बेड; पिंपरी-चिंचवड पालिका प्रशासन सतर्क

रुग्णांना तात्काळ ऑक्‍सिजन देण्यासाठी प्रयत्न पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दररोज अडीच हजार नवीन रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांतील बेड अपुरे पडत आहे. करोनाची लागण झालेल्या मात्र कमी तीव्रतेची लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येते. मात्र, काही रुग्णांची प्रकृती अचानक बिघडल्यास ऑक्‍सिजन … Read more

बारामती | शहरातील कोविड केअर सेंटर रूग्णांसाठी ठरताहेत वरदान

बारामती ( प्रतिनिधी) : बारामती शहर व तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. वाढती रुग्ण संख्या हा सर्वांच्या चिंतेचा विषय आहे. रूग्णांवर वेळेत उपचार व्हावेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. येथील नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या दोन कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या … Read more

कोविड केअर सेंटरमध्ये चोरीचा प्रयत्न; येरवड्यात अल्पवयीन मुलांना पकडले

कात्रज – करोना बाधीतांची संख्या वाढत असल्याने शहर तसेच उपनगरांमध्ये कोविड केअर सेंटर सुरू होत आहेत. परंतु, भुरट्या चोरट्यांकडून आता अशा केंद्रातील साहित्यावर डल्ला मारला जात आहे. कोंढवा-येवलेवाडी कार्यालयाच्या हद्दीतील कोविड केअर सेंटरमधील संगणकाच्या चोरीच्या प्रयत्नात साहित्याची मोडतोड झाल्याने कामकाजात अडथळा निर्माण झाला, यामुळे रुग्ण तपासणीचे काम काही वेळ बंद ठेवावे लागले. सुरक्षारक्षकाने प्रसंगावधान राखल्याने … Read more

कोविड केअर सेंटरचे ऑनलाइन उद्‌घाटन

माणदेशी बॅंकेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांवर योग्य उपचार होतील : नीलम गोऱ्हे गोंदवले (प्रतिनिधी)- गोंदवले खुर्द येथील ग्रामीण रुग्णालयात माणदेशी बॅंकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरचे ऑनलाइन उद्‌घाटन विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते बुधवारी झाले तर फित कापून औपचारिक उद्‌घाटन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते झाले. या सेंटरमुळे ग्रामीण भागातील करोनाबाधितांवर योग्य उपचार होतील, … Read more

फक्‍त परीक्षेचे काम करणाऱ्यांनाच कॉलेजला बोलवा

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्राचार्य व प्राध्यापक संघटनेची मागणी  पुणे – राज्य शासनाने विद्यापीठ व महाविद्यालयात अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या कामकाजासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांची महाविद्यालयात शंभर टक्‍के उपस्थिती अनिवार्य करण्याचा निर्णय मागे घ्यावा. करोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत शैक्षणिक संकुलात सर्वांच्या उपस्थितीने करोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे केवळ परीक्षेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच महाविद्यालयात बोलवावे, … Read more

सातारा : कोरेगावमध्ये कोविड केअर सेंटरचे लोकार्पण

आ. महेश शिंदे यांनी केली स्वनिधीतून उभारणी खटाव (प्रतिनिधी) – खटाव-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आ. महेश शिंदे यांनी स्वनिधीतून उभारलेल्या शंभर खाटांच्या श्री काडसिद्धेश्‍वर कोविड केअर सेंटरचे लोकार्पण गृह (ग्रामीण), वित्त व पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले. या हॉस्पिटलसाठी आ. महेश शिंदे यांना सर्व सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. मतदारसंघात आता अधिक ताकदीने व … Read more

सातारा: वाठार येथे उभारणार 70 खाटांचे कोविड केअर सेंटर

कराड (प्रतिनिधी) – कराड तालुक्‍यात करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या रुग्णांची सोय व्हावी, या उद्देशाने कृष्णा हॉस्पिटलमध्ये ऑक्‍सिजन बेड वाढविण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. हॉस्पिटलच्या माध्यमातून वाठार येथील कृष्णा फौंडेशनच्या आवारातही 70 बेडस्‌चे कोविड केअर सेंटर सुरू करण्याची तयारी सुरू असून कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून जवळपास 500 रुग्णांची सोय होणार आहे. जिल्ह्यातील करोनामुक्तीच्या लढ्यात कृष्णा … Read more