पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन देशातील कोविड स्थितीचा घेतला आढावा

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक उच्चस्तरीय बैठक घेऊन देशातील सध्याच्या कोविड स्थितीचा आढावा घेतला. देशात कोविड लसीकरणाची जी मोहीम सुरू आहे, त्याविषयीही त्यांनी माहिती घेतली. देशातील कोविडची दुसरी लाट अजून पूर्णपणे संपलेली नाही, असा दावा कालच केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी केला होता. त्या पार्श्‍वभूमीवर आज झालेल्या बैठकीला महत्त्व आहे. … Read more

आणखी कठोर निर्णय घेण्यास लावू नका; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुणेकरांना इशारा

मुंबई :  राज्यात करोनाची दुसरी लाट आल्यानंतर सर्वत्र निर्बंध लादण्यात आले होते. त्यात मुंबई आणि पुण्याचा मोठ्या  प्रमाणात करोनाचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे  पुण्यात तातडीने निर्बंध लागू करण्यात आले होते.  मात्र, निर्बंध शिथिल होताच पुण्यातील रस्त्यांवर आणि बाजारपेठांमध्ये लोकांची वर्दळ वाढली आहे. खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असल्याचे  दिसत आहे. पुण्यातील गर्दीवर चिंता व्यक्त करत … Read more

“भारतातील कोरोनाची स्थिती भयावह, लवकरात लवकर लॉकडाऊन लावणं गरजेचंच”

नवी दिल्ली: भारतामध्ये आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. जगातील सर्व देशांनी भारताला मदतीसाठी हात पुढे केला आहे. त्यातच आता अमेरिकेकडून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेविषयी महत्वाचे विधान करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांमध्ये कोरोनाची स्थिती भयानक होण्याची शक्यता आहे, त्यामुळे लवकरात लवकर लॉकडाऊन लावणं गरजेचं आहे असे मत डॉ. अॅन्थनी फाऊची हे … Read more

गृहकर्जाचा एकही हफ्ता न भरलेल्या अर्जदारांना सिडकोकडून मुदतवाढ

नवी मुंबई – सिडको गृहनिर्माण योजना 2018-19 मधील घरांचे (सदनिकांचे) हफ्ते थकीत असणाऱ्या तसेच ज्यांनी घरांचा एकही हफ्ता भरलेला नाही, अशा अर्जदारांना उर्वरित हफ्ते भरण्याकरिता 31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय. सिडको महामंडळातर्फे हा निर्णय घेण्यात आलाय. महाराष्ट्र शासनाच्या सर्वांसाठी घरे धोरणांतर्गत सिडकोतर्फे महागृहनिर्माण योजना 2018-19 अंतर्गत नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि … Read more

भारताला वैद्यकीय मदत देण्याचा बायडेन प्रशासनावर दबाव वाढला

वॉशिंग्टन : अमेरिकेने भारताला ऍस्ट्रा झेनकाची लस आणि अन्य आवश्‍यक ती वैद्यकीय सामग्री त्वरित पोहोचवली पाहिजे असा दबाव अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यावर सध्या चारही बाजूने आला आहे. अमेरिकेतील विविध क्षेत्रातील चेंबर ऑफ कॉमर्सच्या संस्था, अमेरिकेचे संसद सदस्य आणि अमेरिकेतील भारतीय अशा सर्व गटांकडून बायडेन यांच्यावर हा दबाव आला आहे. अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सने म्हटले आहे … Read more

मोठा निर्णय! राहुल गांधींनी केल्या पश्चिम बंगालमधील सर्व सभा रद्द

नवी दिल्ली : देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. राहुल गांधी यांनी आपल्या सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. देशात गेल्या २४ तासांत २ लाख … Read more

‘जनहितासाठी पाठिंबा पण किमान ‘या’ पाच प्रश्नांची उत्तरे तरी द्या,’; भाजपचा ठाकरे सरकारला सवाल

मुंबई : राज्यातील करोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने कडक निर्बंध आणि आठवड्याच्या शेवटी लॉकडाउन करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला भाजपाने पूर्णपणे सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. सरकारच्या निर्णयाला पाठिंबा जाहीर करतानाच ‘जनहितासाठी पाठिंबा पण किमान पाच प्रश्नांची उत्तरे तरी द्या,’ असं म्हणत भाजपाने ठाकरे सरकारला काही सवाल केले आहेत. महाराष्ट्र भाजपाचे मुख्य … Read more

महत्वाचा निर्णय होणार?; पंतप्रधानांनी बोलावली तातडीची उच्चस्तरीय बैठक

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशातील ८ राज्यांमध्ये करोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने वाढला आहे. मागील तीन दिवसांपासून देशात ८० ते ९० हजारांच्या सरासरीने रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे सरकारसह आरोग्य यंत्रणेच्या समोर नवे आव्हान निर्माण होत आहे. अचानक रुग्णसंख्येचा स्फोट झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अधिकाऱ्यांची तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. … Read more