क्रिकेट कॉर्नर : सौम्य ठरेल जडेजाचा सर्वोत्तम पर्याय

भारताचा युवा क्रिकेट संघ (19 वर्षांखालील) सध्या युवा विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत खेळत आहे. या संघात एक युवा डावखुरा फिरकी गोलंदाज तुफानी कामगिरी करत आहे. सौम्य पांडे हे या युवा खेळाडूचे नाव. येत्या काळात हा अष्टपैलु गोलंदाज भारताच्या प्रमुख राष्ट्रीय संघात रवींद्र जडेजाची जागा घेऊ शकतो. यंदाचा युवा विश्वकरंडक अद्याप संपलेला नाही मात्र, त्यात भारतीय संघाने … Read more

क्रिकेट कॉर्नर : बॅजबॉलची भीती कशाला ?

इंग्लंडचा संघ येथे दाखल झाला व त्यांनी पहिल्या कसोटीपूर्वी सरावही सुरु केला आहे. ऑस्ट्रेलियाप्रमाणे मिडिया ट्रायल करण्याची व समोरच्या संघावर दडपण टाकण्याची कृती (गैर म्हटलेले जास्त योग्य ठरेल) त्यांनीही आत्मसात केली आहे बहुतेक. मात्र, त्याला घाबरण्याचे कारणच नाही कारण आजच्या क्रिकेटमध्ये सर्वच फलंदाज टी-२० क्रिकेटच्या लशीकरणावर पोसलेले आहेत. एकेकाळी कसोटी किंवा एकदिवसीय सामन्यांत काही बळी … Read more

क्रिकेट कॉर्नर : फलंदाजीत तंत्रशुद्धता येणार का ?

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेत आहे. या दोन संघांतील मर्यादीत षटकांच्या मालिका संपल्या असून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटीही पार पडली आहे. ही कसोटी भारतीय संघाने एक डाव आणि 32 धावांनी गमावली असून आता आजपासून (बुधवार) सुरु होत असलेली कसोटी जिंकत मालिका बरोबरीत ठेवण्याचे त्यांच्यासमोर आव्हान राहील. मात्र, त्यासाठी भारतीय फलंदाजीत तंत्रशुद्धता येणे गरजेचे … Read more

क्रिकेट कॉर्नर : ग्रीन टॉपवरच दर्जा कळतो

– अमित डोंगरे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाची जी भंबेरी उडाली ती पाहता जेव्हा जेव्हा परदेशात कसोटी सामन्यासाठी खेळपट्टीवर गवत राखले जाते तेव्हा भारताच्या सोकॉल्ड बलाढ्य फलंदाजीचा दर्जा नक्की कसा आहे हे समजते. पहिल्या डावात लोकेश राहूल तर दुसर्या डावात विराट कोहली वगळता एकालाही मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे भारतात परदेशी संघांना बोलवायचे, … Read more

क्रिकेट कॉर्नर : सॅमसनने आता केवळ आयपीएलच खेळावी…

संजू सॅमसन याच्याबाबत संपूर्ण भारतीय क्रिकेटप्रेमींनी जीतकी चिंता व काळजी व्यक्त केली ती वाया जात आहे हे तर पुन्हा एकदा सिद्ध झाले. पूर्वी असे वाटायचे की, त्याच्यावर अन्याय होत आहे मात्र, आता लक्षात येते की त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर आवश्यक असतो तो दर्जाच नाही. त्यामुळे आता त्याने पुढील काळात जीतकी त्याची कारकीर्द असेल तेवढा काळ केवळ … Read more

क्रिकेट कॉर्नर : प्रयोग करण्याची नामी संधी…

राहुल द्रविड हेच आगामी काही काळासाठी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहणार असल्याचे जाहीर झाले व इतके दिवस चाललेले कवित्व अखेर संपूष्टात आले. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच टी-२० सामन्यांची मालिका संपली की द्रविड दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाला जोडले जातील. मात्र, आता त्यांची सेकंड इनिंग केवळ मार्गदर्शकाची राहू नये तर पुढील वर्षी होत असलेली टी-२० विश्‍वकरंडक … Read more

क्रिकेट कॉर्नर : ऑस्ट्रेलियासारखी मानसिकता हवी…

भारतात सुरु असलेल्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेला आमच्या दृष्टीने कोणतेही महत्व नाही हेच दाखवून देत ऑस्ट्रेलियाने त्यांच्या सहा प्रमुख खेळाडूंना मायदेशी पाठवले. त्यांच्या जागी संघात केव्हातरी संधी मिळत असलेल्या राखीव खेळाडूंना भारताशी खेळण्यासाठी संघात स्थान दिले. याला म्हणतात खरे व्यावहारीक. आपण त्यांच्यासारखे कधी बनणार. आपण विश्‍वकरंडकाची अंतिम फेरी गमावली म्हणजेच विजेतेपद गमावला पण त्यांनी विजेतेपद … Read more

क्रिकेट कॉर्नर : सूर्योदय उशिरा झाला !

भारतात नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत साफ अपयशी ठरलेला सूर्यकुमार यादव ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भरात आला. देर आए दुरुस्त आए असे म्हणतात पण सूर्याला भरात येण्यास अंमळ (थोडासा) उशीरच झाला नव्हे का. कामगिरी मोठ्या व्यासपीठावर झाली तर त्याचे कौतुक जास्त होते गल्लीबोळात झाली तर त्याचे महत्वच राहात नाही. विश्‍वकरंडक स्पर्धा संपल्यावर … Read more

क्रिकेट कॉर्नर : विंडीजला आत्मपरीक्षणाची गरज

भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत सहभागी होत असतानाच यजमान वेस्ट इंडिजचा संघ नकारात्मक मानसिकेतने सहभागी झाल्याचे उघड दिसत होते. एकतर विश्‍वकरंडक स्पर्धेची पात्रताही मिळवू न शकलेला हा संघ पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवसापासून भांबावलेला दिसला. आता त्यांना महान क्रिकेटपटू ब्रायन लाराच्या मेंटॉरशीपखाली आत्मपरीक्षण करण्याचीच जास्त गरज आहे. या कसोटी मालिकेतील भारतीय गोलंदाजी तशी भीतीदायक वगैरे अजिबात नव्हती; … Read more

क्रिकेट कॉर्नर : इमर्जिंग खेळाडूंना संधी कशी मिळणार..

एसीसी इमर्जिंग आशिया करंडक स्पर्धा सध्या सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय उपखंडातीलच सगळे संघ खेळत आहेत. मुळातच या स्पर्धेचे आयोजन कशासाठी करण्यात येत आहे त्यामागचा उद्देश समजून घेतला तर प्रत्येक देशाला नवोदित खेळाडूंचा संच मिळावा, हा आहे. पण बीसीसीआय या स्पर्धेबाबत तसेच यातून पुढे येत असलेल्या खेळाडूंबाबत किती गंभीर आहे ते महत्त्वाचे आहे. मुळात सध्याच्या … Read more