Pune Crime: ई-सिगारेट, तंबाखूचे फ्लेवर विकणारे 21 जण पोलिसांच्या ताब्यात; शहरभर कारवाई

पुणे – तरुणांना टार्गेट करत शहरातील मोठ्या शैक्षणिक संकुल परिसरात कायद्याचे उल्लंघन करत ई सिगारेट, बेव तंबाखुजन्य फ्लेवरची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करत १० लाख ६७ हजार ५९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी शहरातील विविध भागातून २१ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. देशभरात ई सिगारेट, बेव विक्रीवर केंद्र सरकारने बंदी घातली … Read more

पवईत पोलिस आणि पालिका अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगडफेक; पाच ते सहा जण जखमी

Mumbai News|

Mumbai News|  मुंबई उपनगरातील पवई येथील भीमनगर परिसरात गुरुवारी अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या पथकावर आणि पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली आहे. यात काही पाच ते सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. पवईच्या जय भीम नगर येथे अतिक्रमण विरोधी कारवाई आज सकाळपासून पालिका प्रशासन आणि पोलिसांच्या उपस्थितीत करण्यात येत होती. यापूर्वीच या ठिकाणच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या … Read more

Crime News : अनैतिक संबंधातून भाच्याने केला मामीचा खून; स्प्रे मुळे सापडला आरोपी

मुंबई – नालासोपाऱ्यात सापडलेल्या अज्ञात महिलेच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या महिलेच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केले होते. अनैतिक संबंधातून या महिलेची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. अनैतिक संबंधातून भाच्याने मामीची हत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. दरम्यान, मतदार यादी आणि घटनास्थळावरुन भेटलेल्या स्प्रेवरुन या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले … Read more

माळशेज ऍग्रो टुरिझम फार्म रिसॉर्टमधील अश्लील नृत्याच्या कार्यक्रमावर पोलिसांचा छापा; मॅनेजरसह 17 तरुण, 11 तरुणी पोलिसांच्या ताब्यात

Pune Rural Police raid – पुणे ग्रामीण पोलिसांनी ओतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डिंगोरे गावच्या परिसरातील माळशेज ऍग्रो टुरिझम व फार्म या रिसॉर्टमध्ये सुरु असलेल्या अश्लील नृत्यांच्या कार्यक्रमावर छापा टाकला आहे. या कारवाईत रिसाॅर्ट मॅनेजरसह 17 तरुण आणि 11 तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे. ओतूर पोलीसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार दिनांक … Read more

जम्मूमध्ये बस दरीत पडून 21 ठार, 40 जखमी

जम्मू – जम्मू-पूंछ राष्ट्रीय महामार्गावर (१४४ए) अखनूरच्या तुंगी मोर भागात एक मोठा रस्ता अपघात झाला. येथे प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत पडली. या अपघातात आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सुमारे ४० प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यापैकी २० जणांना जीएमसी जम्मूकडे पाठवण्यात आले आहे. बसमध्ये ७५ हून अधिक प्रवासी होते. पोलिस आणि … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याचे प्रकरण: आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

पुणे, दि. २९ – महाड येथील चवदार तळ्याच्या परिसरात आंदोलनादरम्यान महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडुन विटंबना केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत भिमराव बबन साठे ( वय ४८, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. साठे हे भारतीय जनता पार्टी … Read more

व्हाट्सॲप ग्रुपवर मेसेजने तणावाचे वातावरण

राहुरी  – व्हाट्सॲप ग्रुपवर मेसेज टाकून हिंदु धर्मियांच्या भावना दुखावण्यात आल्या. ही घटना तांदूळवाडी येथे दि. २४ मे रोजी घडली. या घटनेमुळे तांदूळवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचा निषेध व्यक्त करत अनेक तरुणांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीवर फिर्याद दाखल करण्याची मागणी केली. अमोल चंद्रभान पेरणे या तरुणाच्या फिर्यादीवरून आरोपी आयुब … Read more

बनावट महिला उभी करून बोगस दस्त खरेदीदार, दलाल आणि साक्षीदारांवर गुन्हा

दहिवडी – म्हसवड, ता. माण येथील एका महिलेचे बोगस मतदान कार्ड बनवून आणि तिला दुय्यम निबंधक कार्यालयात उभे करून, जमिनीचा दस्त केल्याप्रकरणी खरेदीदार, दलाल आणि साक्षीदारांवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. म्हसवड येथील श्रीमती लक्ष्मी बजरंग कटकदवंडे (वय 78, सध्या रा. कन्नमवारनगर, विक्रोळी, मुंबई) यांची मासाळवाडी येथे गट नं. 860 (नवीन गट नं. … Read more

अहमदनगर | महिला डॉक्टरकडून नर्सला मारहाण; बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

श्रीगोंदा – “माझ्या नवऱ्याला मेसेज का करतेस?” असे म्हणत महिला डॉक्टरने दवाखान्यातील नर्सला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील एका मोठ्या गावात घडला. याप्रकरणी सदर महिला डॉक्टरविरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महिला डॉक्टर शुक्रवारी (दि.२४) रात्री साडेआठच्या सुमारास नर्सच्या घरी गेली. त्यावेळी “माझ्या नवऱ्याला … Read more

नगर | सोन्या चांदीचे दागिनेसह, रोकड लंपास ; गुन्हा दाखल

नगर – नगर शहरातील मध्यवस्तीत असलेल्या अपार्टमेंट मधील फ्लॅट चोरट्यांनी भरदिवसा फोडून सोन्या चांदीचे व मोत्याचे दागिने तसेच रोख रक्कम असा ऐवज चोरून नेल्याची घटना शनि चौक परिसरातील गुजर गली येथील आनंदवन अपार्टमेंटच्या दुसर्या मजल्यावर शुक्रवारी (दि.२४) दुपारी १ ते २ या कालावधीत घडली आहे. याबाबत विशाल चंद्रकांत गांधी (रा. वय ५५, रा.फ्लॅट नं. २०१, … Read more