“भाजपला राजकारणात मुलं झाली नाहीत, त्यांना आमची मुलं” ; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Uddhav Thackeray on BJP।

Uddhav Thackeray on BJP। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रचार काल संध्याकाळी थांबला. या  प्रचारात आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण पाहायला मिळत आहे. दरम्यान, राजन विचारे यांच्या प्रचारासाठी आज उद्धव ठाकरे यांची ठाणे मतदारसंघात सभा घेतली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. यावेळी बोलताना, “आमचा धनुष्यबाण चोरुन तुम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेबाबत वार केला. पवित्र … Read more

मोदी सरकारकडून केरळची आर्थिक कोंडी – राज्याच्या अर्थमंत्र्यांचा आरोप

तिरुअनंतपुरम (केरळ) – मोदी सरकारकडून केरळची आर्थिक नाकेबंदी करण्यात आल्याचा आरोप त्या राज्याचे अर्थमंत्री केएन बालगोपाल यांनी केला आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या वृत्तीमुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होत असून अत्यंत खराब आर्थिक परिस्थितीमध्ये आम्हाला हा अर्थसंकल्प सादर करावा लागला आहे. द्राने आमची अनेक प्रकारची देणी थकवली आहेत, त्यांच्याकडून आम्हाला … Read more

पुणे जिल्हा : ‘संकटे उभी राहिल्यास छत्रपती शिवरायांचे स्मरण करा’- अजय तपकिरे

‘अजिंक्य अमुचे स्वराज्य किल्ले’ स्पर्धेचे बक्षीस वितरण पिरंगुट – जेव्हा जेव्हा आयुष्यात मोठी संकटे उभी राहतील तेव्हा तेव्हा गडकोट व छत्रपती शिवरायांचे स्मरण करा. नक्कीच संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल, असे मत अभिनेते अजय तपकिरे यांनी व्यक्त केले. सर्वज्ञ विकास प्रबोधिनीच्या वतीने आयोजित ‘अजिंक्य अमुचे स्वराज्य किल्ले’ या तालुकास्तरीय किल्ले बनवा स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी ते … Read more

Ncp-ShivSena Crisis: राहुल नार्वेकरबाबत ठाकरे-पवार गटाच्या ‘त्या’ याचिकांवर स्वतंत्र सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार

Ncp-ShivSena Crisis : राज्यात मागील काही दिवसांपासून आमदार अपात्रतेच्या निर्णयाचे घोंगडे भिजत ठेवण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर यामध्ये शिवसेना (Shiv Sena)आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा (Ncp) समावेश आहे. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकरण सारखेच असल्याचे सांगत आज सुप्रीम कोर्टाने दोन्ही गटांच्या याचिकांवर स्वतंत्र सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा … Read more

हिंगोली जिल्ह्यातील बळीराजा संकटात ! पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात; पिके लागली सुकायला

हिंगोली (शिवशंकर निरगुडे) :  राज्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. अनेक ठिकाणी पावसाने संपूर्ण ऑगस्ट महिना विश्रांती घेतली. त्यातच हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात म्हणावा तसा एकदाही पाऊस झाला नसल्याने बळीराजा चिंतेत आहे. सद्यःस्थितीत तापमान कमाल ३२ तर किमान २४ अंशावर आहे. जून महिन्यात पेरणीच्या काळात तर पाऊस आला नाही, त्यामुळे जुलै महिन्यात … Read more

पुणे जिल्हा : खेडमध्ये दुबार पेरणीचे संकट

भात रोपे करपली : कृत्रिम पद्धतीने पाणी देण्याची धडपड राजगुरुनगर – तांदळाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात भातलावणी करण्यासाठी भात रोपांची पेरणी होऊन त्याची उगवण झाली आहे. मात्र पाऊस पडत नसल्याने भात रोपांची वाढ मंदावली आहे. काही ठिकाणी रोपे करपू लागली आहेत त्यावर उपाय म्हणून कृत्रीम पद्धतीने पाणी देवून शेतकरी रोपे जगविण्यासाठी … Read more

दूध उत्पादक संकटात : 18 ते 20 रुपये मिळतोय नीचांकी दर : खर्चही भागेना

योगेश कणसे लोणी देवकर : इंदापूर तालुक्‍यात नीरा आणि भीमा या नद्यांमुळे बागायत क्षेत्राचे प्रमाण जास्त आहे. कृषी उत्पादनात इंदापूर तालुका जिल्ह्यात अग्रेसर आहे. यामध्ये अग्रस्थानी ऊस, द्राक्ष, डाळिंब, पेरू आणि कांदा आदी पिकांसह केळीच्या उत्पादनातही जिल्ह्यात अग्रस्थानी असलेला तालुका म्हणून इंदापूरची ओळख आहे. शेती विषयी सरकारची नवीन धोरणे, यामुळे शेतमालाला योग्य हमी भाव मिळत … Read more

सोशल मीडिया मानसिक आरोग्य संकट

रील्स-व्हिडिओ पाहणे असो किंवा मित्रांशी संपर्कात राहणे असो, सोशल मीडिया आजच्या काळात आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आकडेवारीनुसार, 13-45 वयोगटातील लोक सोशल मीडियावर दिवसाचे सरासरी 3-4 तास घालवतात. आरोग्यतज्ज्ञ अनेक बाबतीत ही सवय आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक मानत आहेत, विशेषत: लहान मुलांमध्ये, हे वाढते व्यसन खूप गंभीर असू शकते. सोशल मीडियाच्या व्यसनामुळे मुलांच्या मानसिक विकासावर … Read more

हृदय विकार दूर ठेवण्यासाठी नियमित खा पोटॅशियमयुक्त आहार, जाणून घ्या अन्य आरोग्यदायी लाभ

हृदयाच्या गतीतील असामान्यतेमुळे अनेक प्रकारचे गंभीर आजार होण्याचा धोका असतो. प्रौढांसाठी सामान्य विश्रांतीचा हृदय गती प्रति मिनिट 60 ते 100 बीट्‌स पर्यंत असतो. त्यात कमतरता किंवा जास्त, दोन्ही स्थिती गंभीर समस्यांचे लक्षण मानले जाते. सामान्य हृदय गती पेक्षा सतत जास्त राहिल्याने हृदयविकाराचा झटका यासारखी जीवघेणी परिस्थितयदेखील येऊ शकते. काही आरोग्य समस्यांव्यतिरिक्त, आहारातील पौष्टिक कमतरता देखील … Read more

पाकिस्तानमध्ये उपासमारीचे संकट..! लोकांचा गव्हाने भरलेल्या ट्रकचा पाठलाग करतांनाचा व्हिडिओ व्हायरल

कराची – पाकिस्तानमधून एक व्हिडिओ समोर आला आहे, या व्हिडिओमध्ये देशातील अन्नसंकट गंभीर होत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये दुचाकीवरील लोकांचा एक गट वाहनाचा पाठलाग करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे. नॅशनल इक्वॅलिटी पार्टी जेकेजीबीएलचे अध्यक्ष प्रोफेसर सज्जाद राजा यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना सांगितले की लोक गहू … Read more