पुणे | महापालिका म्हणते ये रे ये रे पावसा…

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातील पाणीसाठा सध्या तळ गाठत आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचा महापालिकेकडून जूनच्या पहिल्या आठवडयात आढावा घेऊन शहरातील पाणी कपातीचा निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, हवामान विभागाने ६ किंवा ७ जूनला पुण्यात मान्सूनचे आगमन होणार असून, त्यानंतर जूनच्या सरासरीच्या ८० टक्के पाऊस होणार असल्याचा दिलासादायक अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे … Read more

पुणे जिल्हा | वाल्हे परिसरातील फूल उत्पादक कोमेजला

वाल्हे, (वार्ताहर)- यावर्षी पाण्याअभावी फूलशेती अडचणीत आली आहे. मोठ्या प्रमाणात खर्च करूनही लागवड केलेली फुलझाडे विहिरी, बोअरचे पाणी आटल्याने सुकून जात आहेत. त्यात सद्यःस्थितीत लग्नसराई नसल्याने फुलांचे भावही गडगडल्याने फूल उत्पादक अडचणीत सापडले आहेत. वाल्हे (ता. पुरंदर) परिसरातील शेतकरीवर्ग मागील काही वर्षांपासून परंपरागत शेती सोडून इतर शेती व्यवसायाकडे वळत, शेतकर्‍यांनी फूलशेतीकडे लक्ष केंद्रित केले होते; … Read more

पिंपरी | पिंपरी चिंचवडकरांवर पाणीकपातीचे संकट

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरणामधील पाणीसाठा तळाला चालला आहे. त्यातच बाष्पीभवनामुळे त्यामध्ये घट होत असल्याचे चित्र आहे. पवना धरणामध्ये केवळ 28.93 टक्के तर आंद्रा धरणात 35.37 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांवर पाणीकपातीचं संकट घोंगावत आहे. गेल्या वर्षी राज्यात पाऊस कमी झाल्याचा फटका यंदा अनेक जिल्ह्यांना बसत आहे. विविध जिल्ह्यातील प्रमुख … Read more

पिंपरी | वावोशी गावाला मिळाली नवी जलवाहिनी

खालापूर, (वार्ताहर) – अगोदरच पाणी टंचाईचे संकट ओढावलेल्या वावोशी गावातील पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहिनीला गळती लागल्यामुळे वावोशी गावातील महिलांवर पाणीटंचाईचे संकट वाढत चालले होते. निकृष्ट झालेल्या वाहिनीमधून पाणी वाया जात होते. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा तक्रारी करूनही ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत असल्याने गावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांना ही माहिती देताच … Read more

वाढत्या तापमानामुळे पाणीसाठ्यात सतत घट; राज्यावर पाणीटंचाईचेही संकट

मुंबई – राज्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण आहेत. अशात राज्यावर पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे. सतत वाढणाऱ्या विक्रमी उष्णतेमुळे धरणांतील 27 टक्के पाणीसाठी आटला आहे. यामुळे नागरिकांना वापरासाठी आता केवळ 44 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईतील धरणांमध्ये 27 टक्के, तर ठाणे जिल्ह्यातील धरणांमध्ये 45 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. वाढत्या तापमानामुळे पाणीसाठ्यात सतत घट … Read more