पुणे जिल्हा | पाणी सोडण्याची मागणी : पिके जगविण्यासाठी कसरत

वडापुरी,  (वार्ताहर) –भीमा नदीचे पात्र तसेच नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे सध्या कोरडे पडले आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील नदीकाठच्या शेतकर्‍यांना पिके जगविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. भीमा नदीचे पात्र कोरडे ठणठणीत पडल्याने भाटनिमगाव येथील नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा कोरडा पडला आहे. या बंधार्‍यांच्या पाण्यावर अवलंबून असणारी चारा व इतर पिके सध्या धोक्यात आली आहेत. यामुळे जनावरांच्या … Read more

पुणे जिल्हा | 35,36 वितरिकेचे लाभार्थी शेतकरी आक्रमक

भवानीनगर, (वार्ताहर) -सध्या उन्हाळ्याला सुरुवात झाली असून अजून पुढील तीन महिने उन्हाळा अतिशय कडक असल्याने शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. यामुळे इंदापूर तालुक्यातील नीरा डाव्या कालव्याच्या वितरिका क्रमांक 35 व 36 चे शेतकरी आक्रमक झाले असून येत्या दोन दिवसांमध्ये पाणी न सोडल्यास या भागातील शेतकरी आक्रमक पवित्रा घेणार आहेत. याची नोंद संबंधित … Read more

सातारा | कोयना धरणातून 2600 क्युसेक पाण्याचा विसर्ग

कोयनानगर, (वार्ताहर) – राज्यात सगळीकडे उन्हाळा सुरू झाला असून, पिकांना फटका बसत आहे. कृष्णा नदीचे पात्र ठिकठिकाणी कोरडे असल्याने पिके करपू लागली आहेत. त्यामुळे धरणाच्या पूर्वेकडील शेतकरी हवालदिल झाला आहे. पिके करपून जाऊ नयेत यासाठी त्यांनी पूर्वेकडील सिंचनासाठी धरणातून पाणी सोडण्याची मागणी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार धरणाच्या पायथा वीजगृहाबरोबर … Read more

Farmers Protest | काय आहे स्वामिनाथन आयोगाचा अहवाल? सरकार MSP वर C2+50% फॉर्म्युला का टाळतंय?

Farmers Protest| लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चा या दोन संघटनांनी मंगळवारी ‘दिल्ली चलो मार्च’ची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. दिल्लीकडे येणाऱ्या सर्व सीमांचे छावण्यांमध्ये रूपांतर करण्यात आले. बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. ड्रोनच्या माध्यमातून पाळत ठेवली जात आहे. … Read more

पुणे जिल्हा : पिके, फळांच्या नवीन जातीची लागवड करा

विजय कोलते : सीताफळ, अंजीर बागेत शिवार फेरी जेजुरी – कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या पिके व फळांच्या नवीन जातीची शेतात लागवड करावी. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पन्न घ्यावे. यासाठी शिकलेल्या तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत कृषी शिक्षण परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते यांनी व्यक्त केले. पुरंदर तालुका अंजीर व सीताफळ बागायतदार संघाच्या वतीने … Read more

पुणे जिल्हा: अवकाळी पाऊस, गारपिटीने दाणादाण; सुमारे बारा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

पुणे – जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे बारा हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये कांदा, बटाटा, टोमॅटो, द्राक्ष, डाळिंब, तांदूळ, भाजीपाला पिकांची मोठी हानी झाली आहे. तर, १९ हजार शेतकऱ्यांना तडाखा बसला आहे. जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील शेतांमधील उभ्या पिकांनाही मोठा तडाखा … Read more

पुणे जिल्हा : आंबेगाव तालुक्याला अवकाळी पावसानाने झोडपले ; पिकांचे मोठे नुकसान , सहकार मंत्र्यांकडून आढावा

आंबेगाव : आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार परिसरात काल दुपारी तीन ते पाच च्या दरम्यान अतिवृष्टी व गारपटीने मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान केले आहे यामध्ये कांदा बटाटा ज्वारी हरभरा लसूण टोमॅटो इत्यादी पिकांचा समावेश आहे. आज राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नियोजित असलेले सर्व दौरे रद्द करून सातगाव पठारातील नुकसान झाले पिकांची पाहणी करण्यात … Read more

पुणे जिल्हा : ऊस तोडणी ठप्प; चारा पिके भुईसपाट

राहू – राहू बेट परिसरात (दि.10)रात्री दमदार पावसाने हजेरी लावली. सुमारे पाऊण तास मुसळधार तर नंतर अर्धा तास संततधार पाऊस झाला. या पावसाने कारखान्याला गाळपाला जाणाऱ्या उसाची तोडणी बंद राहण्याची शक्‍यता आहे. राहू बेट परिसरात श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना, व्यंकटेश कृपा या कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. त्यासाठी अनेक ऊस तोडणी मजुरांनी आपल्या तात्पुरत्या … Read more

पुणे जिल्हा : ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त; शेती पिके जळाली

मंचरच्या भेकेमळ्यातील स्थिती : शेतकरी हैराण मंचर – मंचर परिसरातील भेकेमळा येथे महावितरणचा ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाला असून दुरुस्तीअभावी शेतीपिके जळाली आहे. अनेकवेळा महावितरणकडे ट्रान्सफॉर्मरबाबत तक्रार करून देखील दखल घेतली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. सरकारने अनेक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला असून सक्तीची वसुली महावितरणने करू नये. मंचर परिसरात अतिशय कमी पाऊस पडला असल्यामुळे भेके मळ्यात … Read more

पुणे जिल्हा : ऑक्‍टोबर हिटच्या झळांनी पिकांची अवस्था केविलवाणी

जांबूत – ऐन ऑक्‍टोबर हिटच्या झळांनी पिकांची अवस्था केविलवाणी झाली असताना विजेच्या अतिरिक्त भारनियमनाचा फटका या पिकांना बसत असल्याने बळीराजा हतबल झाला आहे. बिबट्याच्या भीतीने रात्री पाणी देता येत नाही अन्‌ दिवसा विजेच्या भारनियमामुळे पिकांची तहान भागवता येत नाही. त्यामुळे शेतातील उभ्या पिकांच्या वाढीवर परिणाम झाल्याने शेतकरी त्रस्त झाले असून शेतीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी … Read more