‘रेमल’ चक्रीवादळाचा कहर; कोलकात्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

Remal cyclone Updates|

Remal cyclone Updates|  ‘रेमल’ चक्रीवादळ अखेर रविवारी रात्री बांग्लादेश किनारपट्टीला धडकले. या काळात वाऱयाचा वेग ताशी तब्बल 120 ते 135 किमी इतका होता. तब्बल सहा तास या चक्रीवादळाने बांगलादेशात थैमान घातले. अनेक भागात विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस झाला तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. रेमाल चक्रीवादळ रविवारी रात्री उशिरा बांगलादेशातील मोंगलाच्या नैऋत्य भागातून भारताच्या पश्चिम … Read more

प. बंगाल किनारपट्टीला रेमल चक्रीवादळाचा धोका ! रविवारी मध्‍यरात्री धडकण्‍याची शक्‍यता

Cyclone Remal – बंगालच्‍या उपसागरात तयार होणारे रेमल चक्रीवादळ रविवारी मध्‍यरात्री पश्चिम बंगालमधील किनारपट्‌टीला धडकणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. रेमल असे या चक्रीवादळाला नाव देण्यात आले असून रविवारी या चक्रीवादळामुळे ताशी 102 किमीच्या वेगाने वारे वाहू शकतात, असा अंदाज हवामान खात्‍याने वर्तविला आहे. तर पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, मिझोराम, त्रिपुरा आणि … Read more

Cyclone Michaung News : चेन्नईत 8 जणांचा मृत्यू, पुढील काही तास आंध्र प्रदेशसाठी ‘अत्यंत धोकादायक’

Cyclone Michaung News : Cyclone Michaung Newsपुढील काही तास आंध्र प्रदेशच्या किनारी भागासाठी अत्यंत धोकादायक आहेत. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, ‘मिगजौम’ हे तीव्र चक्रीवादळ बापटलाजवळील दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टीला पुढील चार तासांत 90-100 किमी प्रतितास वेगाने पार करेल. यापूर्वी या वादळाने तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये कहर केला होता. IMD ला अजूनही बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि … Read more

घटस्थापनेला पावसाची शक्‍यता

पुणे – उत्तर भारतातून जाणाऱ्या पश्‍चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे पुण्यासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागात दि. 15 आणि 16 ऑक्‍टोबर रोजी हलका ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. याबाबत हवामानशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. यामुळे ऑक्‍टोबर हिटपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. गेल्या आठवडाभरापासून तापमानात दोन-तीन अंश सेल्सिअस वाढ झाल्याने ऑक्‍टोबर हिट जाणवत आहे. पुढील काही … Read more

बंगालच्या उपसागरात घोंगावतेय चक्रीवादळ; नागरिकांना दिला सर्तकतेचा इशारा

भुवनेश्‍वर – संपूर्ण देशभरात पावसाने थैमान घातलेले असतानाच बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ घोंगावत आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर ओडिशामध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हे चक्रीवादळ दोन दिवसांत धडक्‍याची शक्‍यता असून सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले आहे. हे पश्‍चिम मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावर तयार होत आहे. हे वादळ … Read more

Biporjoy Cyclone : बिपरजॉय चक्रीवादळाचे आता राजस्थानवर सावट; वेग मंदावला मात्र धोका कायम

अहमदाबाद – अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातमध्ये विध्वंस केल्यानंतर आता ते राजस्थानमध्ये पुढे सरकले आहे. चक्रीवादळ शनिवारी सकाळी राजस्थानमध्ये पोहोचले आहे. गुजरातच्या किनारपट्टीवर आदळल्यानंतर चक्रीवादळाचा वेग कमी झाला आहे, पण धोका अजूनही कायम आहे. आता या चक्रीवादळाचा राजस्थानच्या वाळवंटात कहर सुरु आहे. सॅटेलाइट फोटोच्या आधारे सध्या चक्रीवादळ जोधपूरच्या दिशेने वेगाने पुढे सरकत आहे. … Read more

बिरजॉय चक्रिवादळाच्या भीतीने पाकिस्तानात हजारोंचे स्थलांतर; गुजरातच्या किनारपट्टीला देखील तडाखा बसण्याची शक्‍यता…

कराची – बिरजॉय चक्रिवादळाच्या भीतीने पाकिस्तानच्या किनारपट्टीच्या भागातल्या हजारो नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे. हे चक्रिवादळ गुरुवारी किनारपट्टीवर थडकणार आहे. वादळाच्या प्रभावामुळे सोसाट्याचा वारा सुरू असून समुद्रात उंच लाटा उसळायला लागल्या आहेत. “बिपरजॉय’ हा बंगाली शब्द असून त्याचा अर्थ “आपत्ती’ असा होतो. त्या अर्थानुरुप धोक्‍याची शक्‍यता लक्षात घेऊन सावधगिरी म्हणून हजारो नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी … Read more

चक्रीवादळ 15 जूनला गुजरात आणि पाकिस्तान किनारपट्टीवर धडकणार

अहमदाबाद – अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ अतितीव्र चक्रीवादळात रूपांतरीत झाले असून हे वादळ 15 जूनला दुपारच्या सुमारास सौराष्ट्र-कच्छ आणि लगतच्या पाकिस्तान किनारपट्टीवरून भूभागात येण्याची शक्‍यता आहे असे आहे भारतीय हवामान विभागाने रविवारी सांगितले. पूर्व मध्य अरबी समुद्रावरील अत्यंत तीव्र चक्रीवादळ बिपरजॉय रविवारी सकाळी पोरबंदरच्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे 480 किलोमीटर, द्वारकेपासून दक्षिण-नैऋत्येला 530 किलोमीटर आणि … Read more

अरबी समुद्रात चक्रीवादळाची शक्‍यता; केरळातील मान्सुन स्थितीवरही विपरीत परिणाम शक्‍य

नवी दिल्ली – गुजरातमधील पोरबंदरच्या दक्षिणेकडील आग्नेय अरबी समुद्रावरील कमी दाबाचा पट्टा वायव्येकडे सरकून त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्‍यता आहे असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. या चक्रीवादळाला बिपरजॉय हे नाव बांगलादेशने दिले आहे. हवामान कार्यालयाने सांगितले की, समुद्रातील हा कमीदाबाचा पट्टा गोव्याच्या पश्‍चिम-नैऋत्येस सुमारे 950 किमी, मुंबईपासून 1,100 किमी, पोरबंदरपासून 1,190 किमी आणि … Read more

पुन्हा वातावरण बदल होणार! बंगालच्या उपसागरात मोचा चक्रीवादळ; येत्या काही दिवसात बांगलादेशच्या किनारपट्टीला धडकणार

नवी दिल्ली : देशात रोजच वातावरण बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कुठे पाऊस जास्त आहे तर कुठे उन्हाचा सध्या चटका जाणवत आहे. त्यातच आता बंगालच्या उपसागरात मान्सूनपूर्व पहिले चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता, ज्याचे नाव मोचा असू शकेल. हे चक्रीवादळ बांगलादेशच्या किनारपट्टीला 11 मे ते 15 मे दरम्यान धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यूएस ग्लोबल … Read more