अम्फानने बांगलादेशलाही दिला तडाखा; 10 जणांचा मृत्यू

ढाका -अम्फान या महाचक्रीवादळाने भारताचा शेजारी असणाऱ्या बांगलादेशलाही तडाखा दिला. त्या वादळाच्या घणाघातामुळे त्या देशात 10 जण मृत्युमुखी पडले. पश्‍चिम बंगालमधून सरकलेले अम्फान वादळ बांगलादेशात जाऊन थडकले. त्या वादळाचा मोठा फटका किनारपट्टीलगतच्या गावांना बसला. वादळाच्या प्रभावामुळे मुसळधार पाऊस कोसळल्याने बरेच भाग जलमय झाले. अम्फानच्या दणक्‍याने अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. त्याशिवाय, झाडे उखडून पडण्याच्या घटनाही … Read more

ओडिशात अम्फानमुळे 45 लाख लोक प्रभावित

भुवनेश्‍वर -पश्‍चिम बंगालच्या तुलनेत कमी असला तरी ओडिशालाही अम्फानचा तडाखा बसला. त्या महाचक्रीवादळामुळे ओडिशात सुमारे 45 लाख लोक प्रभावित झाल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली. वादळामुळे ओडिशाच्या काही भागांत मुसळधार पाऊस कोसळला. वादळ आणि पावसामुळे त्या राज्याच्या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांतील वीज आणि दूरसंचार जाळ्यांचे मोठे नुकसान झाले. त्याशिवाय, शेतीलाही फटका बसला. तसे असले तरी मोठी हानी … Read more

अम्फानचे 72 बळी – ममतांची माहिती

laxmi ratan shukla resigns

कोलकाता : अम्फान वादळामुळे पश्‍चिम बंगालमध्ये 72 जण मरण पावले आहेत. कोलकात्यात 15, उत्तर 24 परगण्यात 18 जण दक्षिण 24 परगण्यात 17 जण, हावड्यात सात तर पूर्व मदिनापूरमध्ये सहा जण मरण पावले आहेत. हुगलीमध्ये दोन जणांचे बळी पडले आहेत, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले. या वादळात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रूपयांची मदत … Read more

अम्फनने केले रौद्र रूप धारण;चक्रीवादळाने १२ जणांचा घेतला बळी

नवी दिल्ली : महाचक्रीवादळ अम्फनने रौद्र रूप धारण केले आहे. या वादळाने पश्चिम बंगालमध्ये ताशी १९० कि.मी वेगाने प्रवेश केला आहे.  दरम्यान, या चक्रीवादळाने पश्चिम बंगाल व ओडिशामधील १२ जणांना आपले प्राण गमवावे  लागले आहेत.  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या वादळाला करोनापेक्षाही भयानक असल्याचे म्हटले आहे. #WATCH West Bengal: Rooftop of a school … Read more

अम्फान चक्रीवादळ : ओडिशा-पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या श्रमिक रेल्वे २१ मे पर्यत रद्द

मुंबई : सुपर सायक्लॉनच्या धोक्यामुळे ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या समुद्र किनाऱ्यावर सुपर सायक्लॉन अम्फान या वादळाचा धोका लक्षात घेऊन दिनांक २१ मे पर्यत ओडिसा आणि पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या श्रमिक रेल्वे रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे सचिव पराग जैन यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत अडकलेल्या श्रमिकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी विविध ठिकाणाहून … Read more

ऍम्फान चक्रीवादळ रौद्ररुप धारण करण्याचा हवामान विभागाचा अंदाज

मुंबई : ऍम्फान चक्रीवादळ रौद्ररुप धारण करण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात ऍम्फान अतिशय भीषण चक्रीवादळ बनू शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या वादळामुळे परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच समुद्रात उंच लाटा निर्माण होण्याचा अंदाज आहे. बंगालच्या खाडीच्या दक्षिणेत असलेले हे वादळ हळूहळू वायव्य दिशेला सरकत आहे. येत्या काही तासात … Read more