रेमल चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा तटरक्षक दलाने यशस्वीपणे केला सामना; मोठी जीवितहानी टळली

Cyclone Remal: – रेमल या चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा तटरक्षक दलाने यशस्वीपणे सामना केला आहे. सुरुवातीला २२ मे रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचे क्षेत्र निर्माण झाल्यानंतर, या वादळाचे अत्यंत वेगाने अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले. त्यानंतर २६ ते २७ मे च्या मध्यरात्री या चक्रीवादळाने पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीला धडक दिली. चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाल्यावर … Read more

पश्चिम बंगालमध्ये “रेमल’ चक्रीवादळाचं थैमान: 29500 घरांचे नुकसान, झाडे उन्मळली, विजेचे खांब कोसळले…4 जणांचा मृत्यू

कोलकाता  – रेमल चक्रीवादळाने पश्चिम बंगालमध्ये थैमान घातले आहे. ताशी 135 किमी वेगाने वाऱ्यासह, रेमल हे चक्री वादळ बांगलादेश आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकले. यावेळी मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे घरे आणि शेतात पाणी भरलं. चक्रीवादळ रेमलने जवळपास 29500 घरांचे नुकसान झाले असून 4 जणांचा मृत्‍यू झाला आहे. पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या लगतच्या किनारपट्टीवर सागर … Read more

Remal cyclone Updates : रेमल चक्रीवादळामुळे बांगलादेशात सतर्कता

Remal cyclone Updates – रेमल चक्रीवादळामुळे बांगलादेशात सतर्कता बाळगण्यात आली आहे. सेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले असून या सर्वांच्या तात्पुरत्या आश्रयासाठी ४ हजार छावण्या उबारण्यात आल्या आहेत. रेमल हे चक्रीवादळ आज मध्यरात्रीच्या सुमारास बांगलादेशच्या किनारपट्टीवर थडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून वादळाच्या प्रभावामुळे सातखीरा आणि कॉक्स बाजार या किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवण्यात … Read more

“रेमल’ चक्रीवादळाचा धसका; कोलकाता विमानतळ 21 तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय

cyclone remal – रेमल चक्रीवादळामुळे रविवारी मध्यरात्रीपासून कोलकाता विमानतळावरील विमानसेवा 21 तासांसाठी बंद राहणार आहे. विमानतळ अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर खोल दाबाचा पट्टा तयार झाला आहे. शनिवारी रात्रीपर्यंत त्याचे चक्रीवादळ बनण्याची शक्यता आहे. कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर झाल्यास त्याचे नाव रेमल असे असेल. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, रेमल … Read more

cyclone remal । चक्रीवादळाचा धडकणार, ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Cyclone Remal । रेमल चक्रीवादळ रविवारी संध्याकाळपर्यंत बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. या चक्रीवादळाबाबत हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागरात मान्सून मोसमातील हे पहिले चक्रीवादळ असेल. या चक्रीवादळामुळे ताशी 102 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. त्याच वेळी, 26 आणि 27 मे रोजी पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशा, मिझोराम, त्रिपुरा आणि दक्षिण … Read more

प. बंगाल किनारपट्टीला रेमल चक्रीवादळाचा धोका ! रविवारी मध्‍यरात्री धडकण्‍याची शक्‍यता

Cyclone Remal – बंगालच्‍या उपसागरात तयार होणारे रेमल चक्रीवादळ रविवारी मध्‍यरात्री पश्चिम बंगालमधील किनारपट्‌टीला धडकणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. रेमल असे या चक्रीवादळाला नाव देण्यात आले असून रविवारी या चक्रीवादळामुळे ताशी 102 किमीच्या वेगाने वारे वाहू शकतात, असा अंदाज हवामान खात्‍याने वर्तविला आहे. तर पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, मिझोराम, त्रिपुरा आणि … Read more