डीएसके प्रकरण : डीएसकेच्या 100हून अधिक ठेवीदारांचा मृत्यू

विजयकुमार कुलकर्णी पुणे – ठेवींवर चांगला परतावा मिळतोय म्हणून आयुष्याची पुंजी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्याकडे गुंतवणारे ठेवीदार आता आपले पैसे मिळावेत म्हणून जिवाचा आकांत करत आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे राज्यभरातील सुमारे 100 हून अधिक ठेवीदारांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला आहे. तर गुंतवणूकदारातील अनेक जण ज्येष्ठ आहेत. सेवानिवृत्तीतून मिळालेले पैसे त्यांनी गुंतवले आहेत. … Read more

डीएसके यांचे सीलबंद घरात चाेरट्यांचा डल्ला

पुणे –  प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक डी.एस.कुलकर्णी आर्थिक घाेटाळा प्रकरणी सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात कुटुंबा समवेत बंदिस्त आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांचे घरावर जप्तीची कारवाई करत ते सीलबंद केले आहे. मात्र, चाेरटयांनी संबंधित अलिशान बंगल्याचा दरवाजाचा कडी-काेयंडा उचकटून घरात प्रवेश करुन सुमारे सात लाख रुपयांचे ऐवजचावर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चतृश्रृंगी पाेलीस ठाण्यात … Read more

“डीएसकेडीएल’ची मालकी आता “अजदान’कडे

पुणे -डीएसके संचालक असलेले डी.एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड (डीएसकेडीएल) ही सार्वजनिक कंपनी विकत घेण्यासाठी (टेकओव्हर) दोन बांधकाम व्यवसायिकांची नावे निश्‍चित झाली आहेत. त्यातील अजदान प्रॉपर्टीज प्रा. लि., क्‍लासिक प्रमोटर ऍन्ड बिल्डर प्रा. लि., अतुल बिल्डर्स या कंपनीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. त्यामुळे आता डीएसकेडीएल कंपनीची मालकी “अजदान’ला हस्तांतरित होणार आहे. रिझोलेशन प्रोफेशनल मनोजकुमार अगरवाल … Read more

डीएसके प्रकरण : आधी उच्च न्यायालयात जा…; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

पुणे  – गुंतवणूकदारांची फसवणूक केलेल्या दीपक सखाराम कुलकर्णी ऊर्फ डीएसके प्रकरणात सर्व दाव्यांची सुनावणी एकाच न्यायालयात चालवावी, यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकते. त्यामुळे आधी उच्च न्यायालायात जा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला अहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहिंटन फली नरिमन आणि न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या खंडपीठाकडे याबाबतची सुनावणी झाली. दरम्यान सर्वोच्च … Read more

दुबईतील बांधकाम कंपनीला ‘ड्रीमसिटी’ प्रोजेक्‍ट विकसित करण्यासाठी देण्याची मागणी करणारा अर्ज फेटाळला

पुणे – गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केलेल्या डी.एस.कुलकर्णी ऊर्फ डीएसके प्रकरणात “ड्रीम सिटी’ हा प्रकल्प विकसित करण्यास अबूधाबी येथील एका बांधकाम व्यावसायिक कंपनीने तयारी दर्शविली आहे. त्या कंपनीला परवानगी देण्यात यावी, अशा आशयाच्या मागणीचा अर्ज विशेष न्यायाधीश जयंत राजे यांनी फेटाळला. सुनावणीच्या या टप्प्यावर संबंधित अर्जाचा विचार करता येणार नाही, असे नमूद करत न्यायालयाने याबाबतच … Read more

डीएसके प्रकरण : फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट न्यायालयात दाखल करण्याची बचाव पक्षाची मागणी

पुणे – गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात डीएसके यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यातील अंतिम फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट गेली दोन वर्ष न्यायालयात दाखल करण्यात आलेला नाही, हा रिपोर्ट न्यायालयात दाखल करण्यात यावा, अशी मागणी डीएसके यांच्या वकिलांनी केली आहे. विशेष न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. डीएसके यांचे वकील ऍड. आशिष पाटणकर … Read more

डीएसके प्रकरण- पैसे वाटपाच्या वेळी गुंतवणूकदारांना प्राधान्य देण्याची न्यायालयात मागणी

पुणे – गुंतवणूकदारांची फसवणूक केलेल्या बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी ऊर्फ डीएसके यांच्या संपत्तीचा लिलाव झाल्यानंतर त्यातून आलेल्या पैशांच्या वाटपावेळी ठेवीदारांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी करणारा अर्ज गुंतवणूकदारांकडून न्यायालयात करण्यात आला आहे. विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांच्या न्यायालयात हा अर्ज करण्यात आला आहे. लवकरच यावर सुनावणी होणार आहे. गुंतवणूकीवर आकर्षक परतावा देण्याचे अमिष दाखवून डीएसकेच्या … Read more