पिंपरी | मोरबा चाळच्‍या रस्‍त्‍यावर अंधार

देहूरोड,(वार्ताहर) – देहूरोडमधील मोरबा चाळीत ५० कुटुंब राहतात. येथे येण्‍यासाठी अरूंद गल्‍लीतून यावे लागते. गेल्‍या ५० वर्षाच्‍या कालावधीत या ठिकाणी पथदिवे बसविण्‍यात आलेले नाही. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे वारंवार पाठपुरावा करूनही पथदिवे लावले जात नसल्‍याने नागरिकांमध्‍ये नाराजीचे वातावरण आहे. मोरबा चाळीत गेल्या तीस वर्षांपासून सुमारे ५० कुटुंबे राहत आहेत. मात्र, या कुटुंबांना नागरी सुविधा मिळत नसल्याने … Read more

नगर | अमरधाम- आयुर्वेद रस्ता अंधारात ..

नगर, (प्रतिनिधी) – अमरधाम ते आयुर्वेद चौक रस्त्यावर पथदिवे नसल्याने या रस्त्यावर रात्री मोठा अंधार असतो. अपघाताचे देखील प्रकार वाढले आहेत. या रस्त्यावर तातडीने पथदिवे बसवावेत, अशी मागणी नागरिक करत आहेत. अमरधाम ते आयुर्वेद चौक रस्त्यावर मोठी वर्दळ असते. परंतु रात्री या रस्त्यावर मोठा अंधार असतो. त्यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या … Read more

पुणे जिल्हा : बैलपोळ्यावर दुष्काळाचे गडद सावट

सर्जा-राजाला आंघोळ घालण्यासाठीही बंधारे, धरणात पाणीच नाही वाल्हे – पुरंदर तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या बैलपोळा सणावर दुष्काळाचे गडद सावट पसरले आहे. पावसाळ्यात पावसाने म्हणावी तशी जोरदार हजेरी लावली नाही. त्यात पुन्हा काहीशी रिमझिम हजेरी लावून पावसाने पाठ फिरविलेलीच आहे. यामुळे ओढे, नद्या, नाले, पाझर तलाव, बंधारे, विहीरी अद्याप पाण्यावाचून कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला … Read more

ठेकेदाराचा ‘रात्रीस खेळ चाले’! अंधाराचा फायदा घेत कॉंक्रिटीकरणाचा प्रकार

खडीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे यवत : दौंड तालुक्‍यातील यवत ते नाथाचीवाडीचे काम ठेकेदाराकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. याची प्रामाणिक अधिकाऱ्याकडून चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. भरदिवसा होणारे रस्त्यांचे काम दौंड तालुक्‍यात अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने रात्रीच्या अंधारात दिवे लावून कॉंक्रिट रस्ते करण्यात येत आहेत. असाच नाथाचीवाडी येथील एका रस्त्याचा करेक्‍ट कार्यक्रम ठेकेदाराने राजरोसपणे केल्याने … Read more

चीनवर गेल्या 61 वर्षांतील मोठं संकट; तीव्र उन्हाळा आणि दुष्काळ, शहरे अंधारात बुडाली, अनेक कंपन्या बंद

बिजिंग – चीनमध्ये गेल्या 61 वर्षांतील सर्वात तीव्र उन्हाळा आणि दुष्काळ पडलेला आहे. यामुळे वीज निर्मिती ठप्प झालेली असून देशावर वीजेचे संकट उभे राहिलेले असून अनेक शहरे ही अंधारात बुडालेली आहेत. वीजेची कमतरता असल्याने चीन सरकारने शॉपिंग मॉल्स केवळ पाच तास सुरु ठेवण्याची परवानगी दिलेली आहे. शांघाईसारख्या शहरात दोन रात्री वीज पुरवठा बंद करण्यात आला … Read more

राज्य अंधारात बुडणार!

मुंबई – आठवडाभरात महाराष्ट्र अंधारात बुडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यात यंदा विजेची मागणी 20 टक्‍क्‍याने वाढली आहे. तब्बल 2600 मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झाला असून वीज प्रकल्पांमध्ये केवळ 35 टक्के कोळसासाठा आहे. त्यातच परळी आणि भुसावळ वीज प्रकल्पात जेमतेम 1 दिवसाचा साठा आहे. तर कोराडी, नाशिक वीज प्रकल्पात फक्त 2 दिवसांचा, पारसमध्ये 5, … Read more

महावितरणचे ‘महाबिघाड’; एकाच महिन्यात 23,115 तास अंधार आणि शेकडो बिघाड, वाचा इंटरेस्टिंग आकडे

पुणे – सन 2019 पेक्षा 2020 मध्ये वीजपुरवठ्यातील तांत्रिक बिघाडामुळे अंधारात बसावे लागण्याच्या घटना दीडपट वाढल्याचा आरोप “सजग नागरिक मंच’ने केला आहे. तसेच तांत्रिक बिघाडासंबंधिचा तपशील देणारे “विश्वासार्हतेचे निर्देशांक’ (रिलायबिलिटी इंडेक्स) महावितरणने प्रसिद्धच केले नसल्याचाही त्यांचा आरोप आहे.     आयोगाच्या नियमावलीप्रमाणे महावितरणने दरमहा “विश्वासार्हतेचे निर्देशांक’ प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. यामधून ग्राहकांना किती तांत्रिक बिघाडांना … Read more

जामखेड शहरातील बहुतांशी चौक अंधारात

जामखेड (प्रतिनिधी) – जामखेड नगरपरिषदेच्या वतीने बसवण्यात आलेले विविध चौकांतील दिवे नादुरुस्त, तर त्यातील काही सुरू वा काही बंद असल्याने बहुतांश चौक अंधारात बुडून जात आहेत. बंद पथदिव्यांच्या दुरुस्तीकडे मात्र नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत आहे. नगरपरिषद स्थापन झाल्यानंतर नागरपरिषदेच्यावतीने शहरातील अनेक चौकांमध्ये पथदिवे बसविले आहेत. मात्र, त्यांची नियमित देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने हे दिवे असून-नसून सारखेच झाले … Read more