वीरश्री मालोजीराजे स्मारकास भेट देऊन ‘त्या’ अधिकारी ठेकेदारांचा दत्तात्रय भरणे यांनी केला निषेध

– नीलकंठ मोहिते  इंदापूर (प्रतिनिधी) : हा राज्याचा प्रकल्प नाही केंद्राचा आहे.येथील चौकात अपघात होत होते.म्हणून आंदोलने झाली.शेवटी नागरिकांच्या जीवाची काळजी करणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. परंतु येथील मालोजीराजांच्या स्मारकाच्या फरशा काढण्या अगोदर शिवभक्तांना विचारात घेऊन प्रशासनाला विचारात घेऊन काम सुरू करायला पाहिजे होते. झालेली गोष्ट चुकीची आहे या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो. अशी … Read more

पुणे जिल्हा: जलसंधारण विभागामार्फत 15 कोटींचा निधी मंजूर; आमदार दत्तात्रय भरणे यांची माहिती

इंदापूर –नवीन वर्षाच्या सुरवातीलाच आमदार दत्तात्रय भरणे यांनी तालुकावासियांना मोठे गिफ्ट दिले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये साठवण तलाव तसेच साठवण बंधारे बांधण्याकरिता सुमारे 15 कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती भरणे यांनी दिली. भरणे हे 2014 साली आमदार झाल्यापासून ते आजतागायत सातत्याने इंदापूर तालुक्याच्या विकासात भर घालण्यासाठी दर … Read more

पुणे जिल्हा: इंदापुरात राजकीय चिखलफेक; लोकसभेआधीच वातावरण तापले

नीलकंठ मोहिते इंदापूर – लोकसभा निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपलेली आहे.असे असतानाच बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यात तसे पाहिले तर राजकीय चित्र यंदा वेगळे दिसते आहे. राज्य सरकार केंद्र सरकार यांच्या विचाराचे आजी-माजी आमदार काम करत असल्याने, एका दिलाने इंदापूर तालुका चालेल अशी अपेक्षा जनतेला होती. मात्र, आजी-माजी आमदारांकडून एकमेकांवर चिखलफेक सुरू झाली असून विकासकामे करण्यावरून … Read more

पुणे जिल्हा: जातीपातीचे विष पसरविणार्‍यांना ओळखा – आमदार भरणे

इंदापूर – गेली 18-20 वर्षे नुसत्या घोषणा करायच्या व कामाच्या नावाने शून्य, हिंगणगाव सारख्या परिसरात निवडणुकी कालावधीत यायचे आणि जातीपातीचे विष पसरवायचे, एखाद्या पाहुणेरावळ्याला धरायचे आणि जनतेचा गैरसमज करायचा, जातीपातीचे विष पसरून मतदान मागणार्‍या माणसाला जनतेने ओळखावे, असे आवाहन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले. इंदापूर तालुक्यातील कांदलगाव येथे शुक्रवारी (दि. 12) आयोजित केलेल्या जाहीर सभेत,तसेच … Read more

नागपूरच्या अधिवेशनात आमदार भरणेंचा आवाज

इंदापूर – इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथे कामगारांच्या सुरू असलेल्या संपाबाबत आमदार दत्तात्रय भरणे यांनी मंगळवारी (दि. 12) नागपूर अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला व कामगारांना न्याय देण्यासाठी तात्काळ बैठक बोलवावी अशी मागणी त्यांनी केली. आमदार दत्तात्रय भरणे यांनी आजवर विधिमंडळात अनेक प्रश्न उपस्थित करून तालुक्यातील शेतकर्‍यांना व जनतेला न्याय दिला आहे. त्यामुळे वालचंदनगर मधील सर्व कामगारांच्या … Read more

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री लक्ष्मी नृसिंहाचे दर्शन

पुणे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्निक इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथे श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात श्री नृरसिंहाचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली. त्यानंतर मंदिर समितीच्यावतीने पुजारी आणि विश्वस्तांनी पुणेरी पगडी घालून उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर समितीचे विश्वस्त मंडळ, मंदिराचे मुख्य पुजारी … Read more

इंदापुरातील दांडिया कार्यक्रम; राजकीय दांड्या उडण्याचे संकेत

नीलकंठ मोहिते इंदापूर – इंदापूर शहरात नवरात्र उत्सवानिमित्त दांडिया कार्यक्रम प्रत्येक प्रभागात रंगू लागले आहेत. यामध्ये हजारो महिलांची होणारी गर्दी, नवीन राजकारणात प्रवेश करणाऱ्या युवकांचा जोश. आमदार दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरतशेठ शहा, व इंदापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा अंकिता शहा, … Read more

विस्तार झाल्यास आमदार भरणे पुन्हा राज्यमंत्री?

विजय शिंदे वडापुरी – राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला असून, महायुती मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार नवरात्रोत्सवादरम्यान होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास माजी राज्यमंत्री व अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे हे पुन्हा एकदा राज्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची चर्चा आहे. आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय असून महाविकास … Read more

खंडकरी शेतकरी, कामगारांचा प्रश्‍न मार्गी लागणार – विखे पाटील

इंदापूर – खंडकरी शेतकरी बांधवांच्या भोगवटा वर्ग 2 जमिनीचे भोगवटा वर्ग 1 मध्ये विनाशुल्क रूपांतर करण्यासाठी सादर झालेल्या प्रस्तावांना मंत्रिमंडळ बैठकीसमोर मांडून तातडीने मान्यता देण्यात येईल. त्यामुळे खंडकरी शेतकरी व कामगारांचा प्रश्‍न शासनाच्या माध्यमातून मार्गी लागेल, अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. आमदार दत्तात्रय भरणे यांनी अधिवेशनातील केलेल्या मागणीप्रमाणे मुंबई येथे मंत्रालयात मंगळवारी … Read more

राज्य सरकार इंदापूर तालुक्यातील विकासासाठी निधी देण्यास कमी पडत नाही – आमदार दत्तात्रय भरणे

इंदापूर प्रतिनिधी  नीलकंठ मोहिते  इंदापूर तालुक्यातील गावागावात नव्या रस्त्यांची कामे सुरू आहेत, तर काही झाले आहेत. त्यामुळे तालुक्यातील दळणवळण सुस्थितीत झाले असून, खऱ्या अर्थाने नवीन रस्त्याच्या माध्यमातून तालुक्याचा चेहरा मोहरा बदलत आहे. राज्य सरकार इंदापूर तालुक्यात निधी देण्यासाठी कोठेही कमी पडत नाहीत. त्यामुळे विकास कामे पूर्ण होत आहेत, अशी माहिती राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार … Read more