माझ्यासाठी दौंडचा विकास महत्त्वाचा, मंत्रिपद नाही

नानगाव येथील प्रचारसभेत राहुल कुल यांनी केले स्पष्ट दौंड – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौंड तालुक्‍यात दोन सभा घेतल्या असून दोन्ही सभांमध्ये मंत्रीपदाचे अश्‍वासन दिले आहे. मी मुळशीच्या पाण्यासाठी प्रयत्नशिल असून पुढे जर मला पाणी हवे का मंत्रिपद हवे, अशी विचारणा केल्यास मी पाण्याला महत्व देईल, असे सांगून गेल्या पाच वर्षात मी तालुक्‍यात विकासकामे केली … Read more

कांचन कुल यांचा नांदुर सहजपुर गावभेट दौरा

नांदुर – दौंड तालुक्यात महायुतीच्या वतीने आमदार राहुल कुल यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी गावभेटीसाठी नांदुर या गावामध्ये ढोल ताशाच्या गजरात, बाईक रॅली काढली. या रॅलीमध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला. बाईक रॅलीमध्ये तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. यावेळी कांचन कुल यांनी गावातील वडिलधाऱ्या लोकांची आणि … Read more

दौंड तालुक्यासाठी स्वतंत्र प्रांतकार्यालय- राहुल कुल

दौंड : दौंड तालुक्यातील स्वतंत्र प्रांतकार्यालयासाठी राज्य सरकारने राजपत्र आज प्रसिद्ध केले आहे. या सरकारच्या पंचवार्षिकमध्ये राज्यातील तालुक्यासाठी स्वतंत्र प्रांत कार्यालयाचा हा पहिलाच निर्णय असून, या प्रांत कार्यालयाचे मुख्यालय दौंडच असणार आहे. अशी माहिती दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिली आहे. याबाबत बोलताना कुल पुढे म्हणाले की,गेल्या पाच वर्षात मी केलेल्या पाठ पुराव्याला यश आले असुन … Read more

डेंग्यूच्या फवारणीसाठी सलाईन लावून ठिय्या आंदोलन

दौंड : शहरात चिकनगुण्या व डेंग्यूच्या त्रासाने नागरिक त्रस्त आहेत तरीही प्रशासनाकडून फवारणी केली नाही. याचा निषेद करण्यासाठी नगरसेविका ज्योती राऊत यांनी सलाईन लावून घेत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुख्याधिकारी यांचे कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

नांदुरच्या तंटामुक्ती अध्यक्ष-उपाध्यक्षाची बिनविरोध निवड

नांदुर (ता दौंड): नांदुर येथिल तंटामुक्ती अध्यक्ष पद निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात अध्यक्षपदी दत्ताञय बर्वे तर उपध्यक्ष पदी पांडूरंग बोराटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच लता थोरात यांनी भूषविले. https://www.facebook.com/edainikprabhat/videos/1147537292301579/ यावेळी ग्रामसेवक एस एन धारकर, ग्रामपंचायत सदस्य,विशाल थोरात, नेहा गुरव, नाना थोरात,सुषमा घुले,पोलिस पाटील धोंडीबा थोरात,उघोजक किरण गुरव,विजय … Read more

चहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष निरीक्षकांबाबत जोरदार चर्चा  दौंड – गेल्या पाच वर्षांत सत्तेच्या मांडवाखालून गेलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अजूनही मोह आणि स्नेह सुटत नसल्याचा प्रत्यय दौंड तालुक्‍यात आला आहे. दौंड तालुक्‍यात रासपचे कार्यकर्ते असलेल्या एका “बापूं’ना राष्ट्रवादीच्या तंबूत ओढले. त्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादीने दौंड तालुक्‍याच्या निरीक्षकपदाची मोठी जबाबदारी दिली. तालुक्‍यात त्यांची भ्रमंती सुरू असताना त्यांच्या आगमनाला चहापाणी राष्ट्रवादीकडून … Read more