इराकमधील टिक-टॉक स्टारची गोळ्या घालून हत्या

बगदाद, (इराक) – इराकमधील टिक-टॉक स्टार ओम फहाद हिची काल गोळ्या घालून हत्या करण्यात आली. काल रात्री बगदादच्या पूर्वेकडील जोयोना जिल्ह्यातील तिच्या घराजवळ बाहेरच मोटरसायकलवरून आलेल्या मारेकऱ्यांनी तिच्यावर गोळ्या झाडल्या. त्यावेळी ओम फहाद आपल्या एसयूव्ही कारमधून घरी परतली होती. हल्लेखोरांनी अगदी जवळून तिच्यावर गोळीबार केल्याचे जवळच्या सीसीटिव्हीमध्ये चित्रीत झाले आहे. ओम फहाद हिचे खरे नाव … Read more

Indian family : अमेरिकेत भारतीय कुटुंब आढळले मृतावस्थेत

न्यूयॉर्क – भारतीय दाम्पत्य आणि त्यांची ४ वर्षांची जुळी मुले मृतावस्थेत आढळल्याची घटना अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये घडली आहे. ही घटना आत्महत्या आणि हत्येशी संबंधित असल्याची शक्यता गृहित धरून पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली आहे. या कुटुंबातील पुरुषाचे नाव आनंद सुजित हेन्री असे होते आणि त्यांच्या पत्नीचे नाव एलिस प्रियांका असे होते, असे त्यांच्या स्नेह्यांनी सांगितले. पोलिसांनी … Read more

सातारा – कार कठड्याला धडकून नातवासह आजोबा ठार; हामदाबाज येथील दुर्घटना, मृत व जखमी एकाच कुंटुंबातील

सातारा – हमदाबाज, (ता. सातारा) गावच्या हद्दीत मेढा ते सातारा रस्त्यावर गुरूवारी दुपारी एक चारचाकी कार पुलावरील कठड्याला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की कारमधील 56 वर्षीय व्यक्तीचा व तीन महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. तर तीन महिला व तीन वर्षाची मुलगी जखमी झाले आहेत. नामदेव पाडुरंग जुनघरे (वय 56, रा. सावली, ता. जावली) व … Read more

अहमदनगर – बिबट्यांच्या हल्लात मयत झालेल्या लहामगे परिवाराला दहा लाखांची मद्दत

राहाता – बिबट्यांच्या हल्लात मयत झालेल्या लोणी येथील अथर्व प्रविण लहामगे यांच्या वारसांना शासनाच्या वतीने तातडीची मद्दत म्हणून दहा लाखांचा धनादेश जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. महसूल मंत्री आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासनाकडे विशेष प्रयत्न करून २५ लाखांची मदत जाहीर केली होती. यापैकी तातडीच्या मदतीचा दहा लाख … Read more

पुसेसावळीतील घटनेची निष्पक्ष चौकशी करावी

पुसेसावळी – पुसेसावळी (ता. खटाव) येथील घटना निषेधार्ह आहे. राज्य सरकारने या घटनेची निष्पक्षपातीपणे चौकशी करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पुसेसावळीस भेट दिली. येथे झालेल्या दंगलीतील मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन आ. चव्हाण यांनी त्यांचे सांत्वन केले. त्याचबरोबर या दंगलीतील जखमींची विचारपूस … Read more

सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलाची पतीकडूनच हत्या ; पोलिसांनी २४ तासाच्या आतच आरोपीला ठोकल्या बेड्या

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात काम करणाऱ्या वकील रेणू सिन्हा यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वकील रेणू सिन्हा यांचा मृतदेह रविवारी संध्याकाळी त्यांच्याच बंगल्याच्या बाथरूममध्ये आढळला होता. त्यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत होता. त्यामुळेच हे प्रकरण खुनाचे आहे हा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला होता, त्यानुसार २४ तास आपल्याच बंगल्यात लपून बसलेल्या सिन्हा … Read more

मोहरमच्या मिरवणुकी दरम्यान विजेच्या धक्क्याने चौघांचा जागीच मृत्यू; 1३ जण गंभीररीत्या भाजले, 9 जणांची प्रकृती गंभीर

नवी दिल्ली : झारखंड मधील बोकारो जिल्ह्यातील पीतेरवार ब्लॉकमधील खेतको गावात आज मोहरमच्या मिरवणुकीत दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. मोहरमच्या मिरणणुकी दरम्यान ताजियाचा विद्युत तारेशी संपर्क आल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्क्कायक घटना समोर आली आहे.  तरया अपघातात 1३ जण भाजल्याने गंभीर जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. मोहरमच्या मिरवणुकीत झारखंडमधील बोकारो येथे शनिवारी सकाळी … Read more

रुग्णवाहिकेखाली सापडून वृद्धाचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल

ओतूर बसस्थानकाजवळ घटना : सीसीटीव्ही फुटेज आले समोर ओतूर – जुन्नर तालुक्‍यातील ओतूर बसस्थानकावर रुग्णवाहिका वळवताना रुग्णवाहिके खाली शनिवारी (दि. 1) एक वृद्ध दोनदा चिरडा गेला होता. त्यांचा पुणे येथे उपचारादरम्यान गुरुवारी (दि. 6) मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला होता. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी रुग्णवाहिका चालकावर ओतूर पोलीस … Read more

Uttar Pradesh Crime : उत्तरप्रदेशात दोन शेतकऱ्यांची गोळ्या घालून हत्या

सुलतानपूर (यूपी) – उत्तरप्रदेशातील एका गावात हल्लेखोरांनी दोन शेतकऱ्यांची गोळ्या झाडून हत्या करण्याचा प्रकार घडला आहे. अखंड नगर पोलीस स्टेशन हद्दीतील मारुई कृष्णदासपूर गावात हे शेतकरी त्यांच्या शेतजमिनीवर काम करत असताना सोमवारी रात्री ही घटना घडली. धर्मराज मौर्य (60) आणि विजय कुमार राजभर (45) अशी मृतांची नावे आहेत. जुन्या वैमनस्यातून ही हत्या घडवून आणली असावी … Read more

जिवंत सिद्ध करण्यासाठी दारोदार भ्रमंती? ; सुमारे 40 जण कागदोपत्री मृत घोषित

विदीशा – विदिशा जिल्ह्यातील लाटेरी ग्रामपंचायतीमधील उनरसिकलामध्ये राहणारी 27 वर्षीय गर्भवती महिला सुशीलाबाई “लाडली बहन’ योजनेची लाभार्थी म्हणून नोंदणी करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचली असता तिला सांगण्यात आले की, ती जिवंत नसून केव्हाच मरण पावली आहे. त्यामुळे धक्का बसलेल्या सुशीलाबाईला “आपण मेलो नसून, जिवंत आहोत’, हे सिद्ध करण्यासाठी अनेक सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. विशेष … Read more