जिल्हा बॅंक निवडणुकीचा मार्ग मोकळा

खंडपीठाचा राज्य सरकारला दणका : सोसायट्यांच्या निवडणुका होणार नगर  – कर्जमुक्‍ती योजनेमुळे जिल्हा सहकारी बॅंकेसह विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज रद्द ठरविला. सहकारी संस्थाच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय असंविधानिक असल्याचे म्हटले आहे. या निर्णयामुळे जिल्हा सहकारी बॅंक व विविध कार्यकारी … Read more

आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 9 हजार कोटी जमा

पुणे – महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती योजनेची दुसरी यादी प्रसिद्ध केल्यानंतर अवघ्या 5 दिवसांत 15 लाख 45 हजार शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. यापैकी 13 लाख 88 हजार कर्जखात्यांमध्ये कर्जमाफीची रक्‍कम शासनाकडून जमा करण्यात आली असून ती सुमारे रुपये 9035 कोटी आहे. शेतकऱ्यांना याबाबतीत कुठलीही अडचण येऊ नये व त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या … Read more

साडेसोळा हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई

तहसील कार्यालयाकडे निधी : 5 कोटी 31 लाख रुपयांची मदत मिळणार कामशेत – गतवर्षी ऑगस्ट महिन्यात झालेला अवकाळी पाऊस आणि त्यानंतर ऑक्‍टोंबर-नोव्हेंबर 2019 मध्ये “क्‍यार’ चक्रीवादळाचा फटका शेतपिकाला बसला. शेत पिकांच्या नुकसानीपोटी नुकसानग्रस्तांना विशेष दराने मदत करण्याच्या शासन निर्णयानुसार मावळातील 16 हजार 419 शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीसाठी मदत मिळणार आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मावळ तालुक्‍यातील … Read more

दोन लाखांच्यावर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

पुणे – राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफीची घोषणा केली. त्याचवेळी दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष योजना जाहीर करण्याचे आश्‍वासन दिले होते. दोन लाखांपर्यंतचे कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पण, दोन लाखांपेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्यासाठी कोणती योजना जाहीर केली जाईल याची प्रतीक्षा आहे. याबाबत शासनाची कुठलीच … Read more

कर्जमाफीसाठी राज्यातील 63 बॅंकांची निवड

पुणे – राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेंतर्गत कर्ज खात्यांची माहिती भरण्यासाठी राज्यातील 63 बॅंकांची निवड केली आहे. त्यामध्ये राष्ट्रीयीकृत आणि सहकारी मिळून 30 आणि खासगी 33 बॅंका आहेत. येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत माहिती भरल्यानंतर अर्जाची छाननी होऊन मार्चपासून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत उचल घेतलेल्या एक किंवा … Read more

शेतकऱ्यांना भरपाईचे दावे पोकळ?

अनेकजण अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत : कागदांवर मात्र मदत पूर्ण पुणे – जिल्ह्यात ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. यात हवेली, वेल्हा, पुरंदर आणि बारामतीवगळात सर्व तहसीलदारांनी शेतकऱ्यांना शंभर टक्के वाटप केल्याचा अहवाल देखील दिला. परंतु, अजूनही अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत. अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. यामुळे हजारो हेक्‍टर क्षेत्रावरील शेत … Read more

‘फेब्रुवारीअखेर बॅंक खात्यात कर्जमाफीची रक्‍कम जमा होईल’

कृषिमंत्री दादा भुसे यांची ग्वाही पुणे – महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यासाठी वेळापत्रक तयार केले आहे. त्यानुसार फेब्रुवारीअखेर लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात कर्जमाफीची रक्‍कम जमा करण्याची ग्वाही कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. पुणे दौऱ्यादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील शेतकऱ्यांना हवामान बदलाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या … Read more

राज्य सरकारचे काम लोकशाहीविरोधात – चंद्रकांत पाटील

पुणे – सध्याचे राज्यातील सरकार हे लोकशाहीविरोधात काम करत आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी फसवी आहे, असा आरोप पाटील यांनी केले. भाजपने बुधवारी “संघटनपर्व’ कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, सरपंचपदाची थेट निवडणूक रद्द करणे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीतून शेतकऱ्यांना वगळणे, हे निर्णय … Read more

फसव्या कर्जमाफीविरोधात हजारो शेतकऱ्यांसमवेत चंद्रकांत पाटलांचा धडक मोर्चा

कोल्हापूर – राज्य सरकारने केलेल्या फसव्या कर्जमाफीच्या विरोधात भाजपनं कोल्हापुरात जोरदार शक्तिप्रदर्शन करत विराट मोर्चा काढला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा धडक मोर्चा कोल्हापूरच्या दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला आहे. महाविकासआघाडी सरकारने केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी-शर्ती रद्द व्हाव्या आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी या प्रमुख मागणीसाठी भाजपनं हजारो शेतकऱ्यांच्या समवेत आज … Read more

कर्जमाफी योजना प्रशिक्षणावर करणार पावणेदोन कोटींचा खर्च

राज्यातील 34 जिल्ह्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये निधी पुणे – राज्य सरकारच्या महात्मा फुले कर्जमुक्‍ती योजना व छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित यंत्रणेला प्रशिक्षण देण्यासाठी एक कोटी 70 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता 34 जिल्ह्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये निधी … Read more